नागपूर : हे ढोंगी सरकार आहे, मुंबईत आलेल्या आदिवासींच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचे आंदोलन सांगून आदिवासींची दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कृषी कायद्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार देऊ पाहत आहेत. मात्र, काही ढोंगी लोक या शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत आलेला मोर्चा हा आदिवासींचा आहे. ते सोमवारी भंडारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.


हे भ्रष्ट सरकार : फडणवीस
आजचा मोर्चा पाहून सरकारचे डोळे उघडलीत एवढे लोक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. मला कोणी विचारले ठाकरे सरकारची सर्वात प्रभावी योजना कोणती तर माझे उत्तर आहे, माल कमवा. वाळू, दारू आणि इतर अनेक बाबतीत हे सरकार भ्रष्टाचार करत आहे. आम्ही कधीच धान खरेदी थांबविली नाही, कधीच धान उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकविले नाही. मात्र, हे सरकार धान खरेदीत भ्रष्टाचार करत आहेत, याची चौकशी झाली तर काँग्रेस, राष्ट्रवादीचे अर्धे नेते जेलमध्ये जातील, असे टिकास्त्र फडणवीसांनी सोडले.


Maharashtra Farmers Protest: शेतकऱ्यांचा मोर्चा अडवला, आंदोलक आक्रमक, 'राज्यपाल पळून गेले', आंदोलकांचा आरोप


पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांना अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी या सरकारने अवघे 16 कोटी रुपये दिले. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. आम्ही एक एक तालुक्याला त्यापेक्षा जास्त दिले होते. आणि हेच (उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता) शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगायचे हेक्टरी 50 हजार द्या. आता का देत नाही?


वीज ग्राहकाला सूट नाही पण बिल्डर्सवर मेहरबानी : फडणवीस
गरीब वीज ग्राहकाला सूट देण्यात किती कोटी लागतात? अरे तुम्हीच गरिबांना, शेतकऱ्यांना वीज बिलात सूट देण्याची घोषणा केली होती. गरिबांना वीज बिलात सूट न देणारे हे सरकार मुंबई, पुण्यातील बिल्डर्सला 5 हजार कोटीचे प्रिमियम देते. तिन्ही पक्षाचे मंत्री त्या पैशाची वाटणी करून घेतात. माझे एवढे, तुझे तेवढे अशी वाटणी मंत्री करून घेतात, असे गंभीर आरोप फडणवीस यांनी केले आहेत.


'देशाच्या शेतकऱ्यांबद्दल केंद्रातील सत्ताधाऱ्यांना कवडीची आस्था नाही', शरद पवारांचा आरोप


त्या मृत्यूंना तुम्ही जबाबदार..
भंडारा रुग्णालयातील आगीत जळालेल्या त्या बालकांवर काय परिस्थिती बेतली असेल. जे दोषी अधिकारी निलंबित केले गेले. त्यांना दोनच दिवसात वर्ध्यात पोस्टिंग देता. जनाची नाही तर किमान मनाची तरी ठेवा. भंडाऱ्यातील रुग्णालयात गेलेले जीव अपघातात नाही तर तुमच्या चुकांमुळे घडलेले मृत्यू असल्याचे फडणवीसांनी सांगितले.


दरम्यान, शिसेनेचा एकही नेता मुबंईत आजाद मैदानातील आंदोलनात सहभागी नाही या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, की पंतप्रधान मोदींना वाढता प्रतिसाद आहे, मला माहित नाही पण कदाचित हेच शिवसेनेच्या नेत्यांना लक्षात आलं असेल आणि सुबुद्धी आली असेल. राज्यात अनेक वर्षांपासून शेतकरी कायदे लागू आहेत, हे काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांना माहीत आहे, तरीही ते आंदोलनाच्या नावावर ढोंगीपणा करत आहेत.


Bhandara Hospital Fire | भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपचा मोर्चा