एक्स्प्लोर

कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी 20 मेपर्यंत मुदतवाढ

1 मेपर्यंत मुदत असलेल्या या योजनेला 20 मेपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही पात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले नसतील, तर अर्ज करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफीच्या योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही घोषणा केली. 1 मेपर्यंत मुदत असलेल्या या योजनेला 20 मेपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही पात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले नसतील, तर अर्ज करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. शिवाय वन टाईम सेटेलमेंट योजनेसाठीची मुदत यापूर्वीच 30 जूनपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. यापूर्वी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत देण्यात आली, त्यानंतर ही मुदत 1 मेपर्यंत वाढवण्यात आली आणि आता ही मुदत 20 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल. http://csmssy.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज भरता येणार आहेत. कर्जमाफीच्या अर्जासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. अर्ज भरताना शेतकऱ्यांना आधार नंबरच्या साहाय्याने बायोमेट्रिक पद्धतीने किंवा वन टाईम पासवर्डच्या माध्यमातून आपलं प्रमाणीकरण करावं लागणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, तालुका सहाय्यक निबंधक, जिल्हा बँक किंवा सबंधित राष्ट्रीयकृत बँक यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी https://csmfs.mahaonline.gov.in/PDF/CSMFS_User_Manual.pdf  या लिंकला भेट द्या. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत 14,388 कोटी रुपयांच्या कर्जाचं वाटप केलं आहे. यात 46 लाख 52 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याचा दावाही सरकारने केला. मात्र माहिती अधिकारात जिल्हानिहाय माहिती शासनाकडे उपलब्ध नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शेतकरी कर्जवाटपाबाबत पारदर्शी असलेल्या सरकारच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2025 | शनिवार
फक्त 1200 रुपये घेऊन मुंबईत आला, 300 कोटी रुपयांचा मालक झाला, जाणून घ्या 'कॉमेडी किंगची' यशोगाथा 
फक्त 1200 रुपये घेऊन मुंबईत आला, 300 कोटी रुपयांचा मालक झाला, जाणून घ्या 'कॉमेडी किंगची' यशोगाथा 
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर भाजपला विचारावं लागेल; सुनील तटकरेंचे वक्तव्य
राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर भाजपला विचारावं लागेल; सुनील तटकरेंचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech Mira Bhayandar फडणवीसांना इशारा, दुबेंना धमकी,मीरा भाईंदरमधील आक्रमक भाषण
Sambhajinagar Bondu Baba : काठीने चोप ते लघुशंका पाजणे; भूत उतरवणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड
Raj Thackeray on Marathi language | अमराठींना इशारा, हिंदीचा धोका, Mumbai मतदारसंघ षड्यंत्र
Mumbai Gujarat Merger Row | राज ठाकरे यांचा Mumbai Gujarat विलीनीकरणाचा दावा
Marathi language row | Raj Thackeray चा Nishikant Dubey ला थेट इशारा: मुंबईत डुबवून मारणार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2025 | शनिवार
फक्त 1200 रुपये घेऊन मुंबईत आला, 300 कोटी रुपयांचा मालक झाला, जाणून घ्या 'कॉमेडी किंगची' यशोगाथा 
फक्त 1200 रुपये घेऊन मुंबईत आला, 300 कोटी रुपयांचा मालक झाला, जाणून घ्या 'कॉमेडी किंगची' यशोगाथा 
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर भाजपला विचारावं लागेल; सुनील तटकरेंचे वक्तव्य
राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर भाजपला विचारावं लागेल; सुनील तटकरेंचे वक्तव्य
Shashikant Shinde : कोणी भाजपला काय विचारायचे, कोणाला काय करायचं हा त्यांचा प्रश्न, शशिकांत शिंदे यांचं विलिनीकरणाच्या चर्चेवर रोखठोक मत
कोणी भाजपला काय विचारायचे, कोणाला काय करायचं हा त्यांचा प्रश्न : शशिकांत शिंदे
शेतात काम करायला गेल्या, थकून दमून जेवायला बसताच काळ आला, नागपुरात वीज पडून दोन महिलांचा मृत्यू, 5 महिला जखमी
शेतात काम करायला गेल्या, थकून दमून जेवायला बसताच काळ आला, नागपुरात वीज पडून दोन महिलांचा मृत्यू, 5 महिला जखमी
Vaishnavi Hagawane Case : अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताय, 'आपल्याच' माणसांवर का कारवाई करतील? वैष्णवी हगवणे प्रकरणावरून रोहिणी खडसेंचा हल्लाबोल
अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताय, 'आपल्याच' माणसांवर का कारवाई करतील? वैष्णवी हगवणे प्रकरणावरून रोहिणी खडसेंचा हल्लाबोल
शक्तिपीठ महामार्गाच्या कोणी आडवा आल्यास त्याच्या आडवं उभा राहणार : राजेश क्षीरसागर
शक्तिपीठ महामार्गाच्या कोणी आडवा आल्यास त्याच्या आडवं उभा राहणार : राजेश क्षीरसागर
Embed widget