रत्नागिरी : कोरोना योद्ध्यांवर होणारे हल्ले काही नवीन नाहीत. या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान, डॉक्टरांनी सांगितल्यानंतर देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांकडून नियमांचं उल्लंघन किंवा डॉक्टरांवर धावून जाण्याचे प्रकार देखील आता वाढताना दिसत आहेत. अशाच प्रकारची घटना रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात घडली आहे. डॉक्टर आणि परिचारक यांनी सांगितल्यानंतर देखील कोरोनाबाधिताचा मृतदेह जबरदस्तीनं नेत त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. रविवारी रात्री 8 वाजताची ही घटना असून याबाबत आता रत्नागिरी शहरात चिंता व्यक्त केली जात आहे.


शनिवारी रत्नागिरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राजीवडा या भागातील एका रुग्णाला जिल्हा रूग्णालयात दाखल केले गेले. रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावेळी 25 ते 30 नातेवाईकांनी थेट आयसीयुमध्ये घुसून मृतदेह ताब्यात घेतला. या साऱ्या प्रकरणामध्ये डॉक्टर आणि परिचारिका यांना हस्तक्षेप करत मृतदेह नेता येणार नाही. याच्यावर कोरोनामुळे मृतदेहावर ज्या प्रमाणे अंत्यसंस्कार केले जातात त्याच प्रमाणे ते केले जातील असं सांगितले गेले. पण, यावेळी अरेरावी करत नातेवाईकांनी हा मृतदेह नेत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.


नेमकं काय घडलं?


शनिवारी रात्री रत्नागिरी शहरातील राजीवडा या भागातील एका रूग्णाला जिल्हा रूग्णालयात दाखल केले गेले. त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसत होती. शिवाय, त्याची तब्येत देखील खालावली होती. त्यामुळे त्याला आयसीयुमध्ये दाखल केले गेले. पण, रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. यावेळी उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी राडा, अरेरावी करत या व्यक्तिचा मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, उपस्थित असलेले डॉक्टर आणि परिचारीका यांनी नातेवाईकांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण, 25 ते 30 नातेवाईक डॉक्टरांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होते. तसेच, आमच्या नातेवाईकावर तुम्ही नीटपणे उपचार केले नाहीत. कोरोना झाला तरी मेलेल्या माणसामुळे कोरोनाचा काहीही धोका नाही. आम्ही हा मृतदेह घेऊन जाणार अशी आक्रमक भूमिका यावेळी नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे वातावरण बिघडू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे होते. आम्ही परोपरी या नातेवाईकांना समजवण्याचा प्रयत्न केला. कोरोना बाधितचा मृत्यू झाल्यास कशाप्रकारे अंत्यसंस्कार केले जातात याची देखील माहिती दिली. पण, नातेवाईक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी जबदस्तीनं मृतदेह नेला आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्याची माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली आहे.


कोरोना योद्ध्यांवर वाढत आहेत हल्ले


कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांकडून डॉक्टर,परिचारीका यांच्यावर हल्ले किंवा अरेरावी करणं या घटना जिल्ह्यात सध्या वाढत आहेत. यापूर्वी देखील जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांवर धावून जात, अरेरावी केली गेली आहे. तसेच राजापूर तालुक्यातील साखरीनाटे या ठिकाणी कोरोनाबाधितांना आणण्याकरता गेलेल्या कोरोना योद्ध्यांवर हल्ल्याची देखील घटना घडली आहे. यामध्ये पोलिसांच्या गाडीवर हल्ला करत. तिची देखील तोडफोड केली गेली होती. दरम्यान, अशा प्रकारे कोरोना योद्ध्यांवर हल्ले होत असतील तर कडक कारवाईची मागणी जिल्हावासि करत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या : 


निसर्ग चक्रीवादळग्रस्त महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठाचा मदतीचा हात; आपत्ती व्यवस्थापन निधीतून 56 लाखांची मदत


'या' आमदाराच्या गाडीवर वाहतूक पोलिसांची एकाच महिन्यात दोनदा कारवाई


आरोग्याची चौकशी करणाऱ्या परिचारिकेस चाबकाने मारहाण; जत तालुक्यातील घटना