Sunil Gavaskar on Anderson-Tendulkar Trophy : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचं नाव बदलल्यानंतर सुरु झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. पटौदी ट्रॉफीचं नाव बदलून अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी करण्यात आल्यानंतर महान फलंदाज सुनील गावसकर यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित करत क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले आहे.
गावसकरांचा सवाल आहे की, "सचिन तेंडुलकरचं नाव अँडरसनच्या नंतर का?"
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी या नव्या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. दोन्ही देशांसाठी खेळातील दिग्गज मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांच्या नावाने ट्रॉफीचं नामकरण करण्यात आलं. परंतु ट्रॉफीच नाव अँडरसन -तेंडुलकर ही गावसकरांना पटलेली नाही.
सुनील गावसकर यांनी मिड-डे मध्ये लिहिले की, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) त्यांच्या इच्छेनुसार ट्रॉफीचे नाव देण्याचा अधिकार असला तरी, भारतीय क्रिकेट चाहत्यांना तेंडुलकरच्या आधी जेम्स अँडरसनचे नाव पाहणे आश्चर्यकारक आहे. ते म्हणाले, 'सचिन हा केवळ भारताच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक नाही, तर वय आणि कारकिर्दीत तो अँडरसनपेक्षा 12 वर्षांपेक्षा जास्त मोठा आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावा आणि शतकांच्या बाबतीत तेंडुलकरची तुलना करता येत नाही.'
गावसकर यांनी अँडरसनचे कौतुक केले आणि ते म्हणाले की, तो एक उत्तम गोलंदाज आहे. पण अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्याचा रेकॉर्ड एकदिवसीय क्रिकेटमध्ये तेंडुलकरइतका चांगला नाही. तेंडुलकर हा वर्ल्ड कप विजेत्या संघाचा देखील भाग आहे, जो अँडरसन नव्हता. अँडरसन एक हुशार गोलंदाज होता, परंतु प्रामुख्याने इंग्लिश परिस्थितीत आणि परदेशात त्याचा रेकॉर्ड तेंडुलकरइतका चांगला नाही. एवढेच नाही तर त्यांनी भारतीय चाहत्यांना तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी म्हणण्यास सांगितले आहे.
पतौडी ट्रॉफी नाव बदलल्यावर केली होती नाराजी व्यक्त...
यापूर्वी गावसकर यांनी पतौडी ट्रॉफी नाव बदलल्यावर नाराजी व्यक्त केली होती. 2007 ते 2021 पर्यंत इंग्लंडमध्ये झालेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेसाठी पतौडी ट्रॉफी देण्यात आली होती, ज्यामध्ये मन्सूर अली खान पतौडी आणि त्यांचे वडील इफ्तिखार अली खान पतौडी यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला होता. त्याच वेळी, आता पतौडी मेडल विजेत्या कर्णधाराला दिले जाईल. त्याऐवजी प्रत्येक कसोटी सामन्याच्या मॅन ऑफ द मॅचला दिले जावे. यामुळे पतौडी कुटुंबाचा वारसा प्रत्येक सामन्यात लक्षात राहील.