एक्स्प्लोर

Exclusive Interview | जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाचा कुठलाही वाद नाही, शिवसेना-भाजप म्हणजे जुळे भाऊ : संजय राऊत

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचं भविष्य, मुख्यमंत्रिपद, जागावाटप यासह विविध विषयांवर संवाद साधला.

मुंबई:  जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपासंदर्भात कोणताही तिढा नाही आणि मुख्यमंत्री पदासाठी कुठलाही वाद नाही. आम्ही जुळ्या भावाप्रमाणे काम करतोय, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.  एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.  यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचं भविष्य, मुख्यमंत्रिपद, जागावाटप यासह विविध विषयांवर संवाद साधला.  प्रश्न :- जन आशीर्वाद यात्रेची फलश्रुती काय? कशासाठी ही आशीर्वाद यात्रा आहे? राऊत -  महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधण्याचे कार्यक्रम आहेत. उद्याच्या निवडणुकांशी यांचा संबंध नाही. आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांचे नातू आहेत. नव्या दमाचा चेहरा आहे. ठाकरेंना फोकस करण्याची गरज नाही. गेल्या 50 वर्षापासून ठाकरेंवर सर्वांचा फोकस आहे.  प्रश्न - आदित्य  ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी / प्रमोट करण्यासाठी ही यात्रा आहे का? राऊत -   देशात अनेक युवा नेते आले आणि गेले पण आदित्य प्रवाहात आहेत. आदित्य हे सर्व क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी  युवा वर्ग मोठ्या प्रमाणात जोडला आहे. त्यांना प्रश्न सोडवायला आवडतात. ते अनेकांच्या भेटीगाठी घेतात.  प्रश्न - आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात कधी उतरणार? उत्तर - तो निर्णय पक्ष घेईल. संपूर्ण पक्ष त्याचं नेतृत्व मान्य करतं. उद्या ते पक्षाचं भविष्य आहेत.  आतापर्यंत ठाकरेंमध्ये कुणी निवडणूक  लढलं नाही. अनेकांना पदं दिली. आदित्य हे नवीन पिढीतले नेते आहेत. आमचा हट्ट आहे हि इतिहासाची शृंखला मोडावी.  प्रश्न - आदित्य ठाकरेंना याबद्दल काय वाटतं? राऊत -   पक्ष हा पक्षप्रमुखांवर चालतो. त्याशिवाय ते त्यांचे वडील आहेत. मला आशा आहे उद्धव ठाकरे हे आदित्यबद्दल सकारात्मक निर्णय घेतील.  प्रश्न - तुम्हाला वाटतं का, भाजपकडून तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं  जाईल?   राऊत -  मीडियानं कितीही प्रयत्न केलं तरी आम्ही यावर काहीही बोलणार नाही. अमित शाह, मुख्यमंत्री किंवा नवीन अध्यक्ष याबाबत काहीही बोलले नाहीत. दोघांमध्ये कुठेही मतभेद नाही. जागावाटप झालेलं आहे. चंद्रकांत दादा आता अध्यक्ष झालेले आहेत. त्यांच्यापर्यंत काही विषय आले नसतील. जागा वाटपसंदर्भात कोणताही तिढा नाही आणि मुख्यमंत्री पदासाठी कुठलाही वाद नाही.  मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे.  याबाबत उद्धव ठाकरे, अमित शाह, आणि मुख्यमंत्री एका सूरात हे बोलले आहेत. हा सूर बेसूर होणार नाही. 2014 ची पुर्नरावृत्ती होणार नाही. दोन्ही पक्ष हातात हात नाही तर गळ्यात गळे घालून काम करतील.   प्रश्न :- आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदी विराजमान होतील? राऊत -  जसं आम्हाला वाटलं की पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असावेत तर भविष्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा असं भाजपचे लोक ही बोलतील. राज्याच्या राजकारणात सर्वोच्च पद सर्वांनाच हवं असतं.  प्रश्न -: राजकारणात तुमचा अनुभव मोठा आहे, तुम्हाला वाटतं आपल्या पक्षाचं मुख्यमंत्री पद हे दुसऱ्या पक्षाला दिलं जाईल? राऊत -   मुख्यमंत्रीपदासाठी बहुमत असावं लागतं. जसं केंद्रात जसं बहुमत आहे तसं इकडेही लागेल. आम्ही राज्यात जुळ्या भावाप्रमाणे काम करतोय. लोकं आश्चर्याने पाहत आहेत. आता आम्ही जुळे भाऊ आहोत. महाराष्ट्राच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत.

महत्त्वाच्या बातम्या

बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Embed widget