एक्स्प्लोर

धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण यांनी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांकडून माहिती जाणून घेतली.

धुळे: संपादित जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धर्मा पाटील या 80 वर्षीय शेतकऱ्याच्या घरी आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार रजनी पाटील, माजी मंत्री हेमंत देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांकडून माहिती जाणून घेतली. काय आहे संपूर्ण प्रकरण? धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला. धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला पृथ्वीराज चव्हाण इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी मंत्रालयातच 22 जानेवारीला विषप्राशन केलं. 80 वर्षीय पाटील यांनी विष प्राशन केल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. धर्मा पाटील यांच्यावर मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. योग्य मोबदल्यासाठी धर्मा पाटील गेल्या तीन महिन्यांपासून मंत्रालयाचे उंबरे झिजवत आहेत. मात्र त्यांना कुणीही प्रतिसाद देत नसल्याने हतबलतेतून त्यांनी अखेर स्वतःला संपवण्याच प्रयत्न केला. सानुग्राह अनुदान नाकारलं संपादित जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 80 वर्षीय आजोबांना 15 लाखांचं सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील याने हे अनुदान नाकारलं आहे. मोबदला वाढवून देण्याच्या मागणीवर नरेंद्र पाटील ठाम आहे, म्हणूनच त्याने हे अनुदान नाकारलं. धुळ्याच्या धर्मा पाटील यांना अनुदान देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. सानुग्रह अनुदान एक महिन्याच्या आत मिळेल असं आश्वासनही बावनकुळे यांनी दिलं होतं. संबंधित बातम्या 15 लाखांचं अनुदान धर्मा पाटलांच्या मुलाने नाकारलं मंत्रालयात 80 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

महत्त्वाच्या बातम्या

लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
आषाढी एकादशीपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार, द्वादशीपासून उघडीप, राज्यात नेमकं कसं असणार हवामान?
आषाढी एकादशीपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार, द्वादशीपासून उघडीप, राज्यात नेमकं कसं असणार हवामान?

व्हिडीओ

Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget