एक्स्प्लोर

माझा इम्पॅक्ट | सांगलीतील 400 वर्ष जुन्या वटवृक्षासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा पुढाकार

सांगली जिल्ह्यातील चारशे वर्ष पुरातन वटवृक्ष वाचविण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. सांगली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा वटवृक्ष वाचविण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना दिल्यात.

मुंबई : सांगली येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा चारशे वर्ष पुरातन असलेला वटवृक्ष वाचवण्यासाठी अनेक पर्यावरण प्रेमींनी मोहीम हाती घेतली आहे. एबीपी माझानेही हा प्रश्न उचलून धरला होता. याची दखल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही घेतली आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली आहे. त्याचबरोबर सांगली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा वटवृक्ष वाचविण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना दिल्या.

आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन व्यापक कार्य करीत आहे. वृक्षसंवर्धनही त्याअनुषंगाने फार महत्वाचे आहे. सांगली जिल्ह्यातील संबंधीत वटवृक्ष पुरातन असून त्याचे जतन होणे गरजेचे आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्या विभागामार्फत रत्नागिरी - कोल्हापूर - मिरज - सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 चे काम सुरु आहे. या नियोजित रस्त्याच्या कामामुळे परिसरातील शेतकरी बांधव आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. याबद्दल ठाकरे यांनी आभार व्यक्त केले.

400 वर्षे जुन्या वटवृक्षाची कत्तल वाचवण्यासाठी सांगलीत उभे राहिले 'चिपको आंदोलन'

हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा 

मिरज ते पंढरपूर या शहरांच्या दरम्यान हा महामार्ग मोजे भोसे (तालुका मिरज, जि.सांगली) या गावातून देखील जातो. मोजे भोसे गावातील गट क्र. 436 येथे यल्लमा देवीचे पुरातन मंदीर असून या मंदिरासमोरच सुमारे 400 वर्षापूर्वीचा महाकाय वटवृक्ष आहे. त्याचा विस्तार सुमारे 400 चौ.मी. इतका व्यापक आहे. हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच, त्याचबरोबर ते वटवाघुळ आणि इतर दुर्मिळ पक्षी यांच्याकरीता नैसर्गिक निवासस्थान देखील आहे.

नियोजित राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 च्या कामामुळे या पुरातन वटवृक्षास बाधा पोहोचत असल्याने वटवृक्ष तोडावे लागेल किंवा पर्यायी जागेवरुन रस्ता करावा लागेल असे मिरज उपविभागीय अधिकारी यांच्या अहवालात नमूद केलेले आहे. या वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तसेच परिसरातील पर्यावरणाच्या होणाऱ्या -हासाचा विचार करता मोजे भोसे येथील संबंधीत जागेवरील महामार्गाचे संरेखन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचे जतन होण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Shetkari Karjmukti Yojna | सांगलीतील 141 शेतकऱ्यांकडून कर्जमुक्ती योजनेचा गौरफायदा

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Tukaram Mundhe : विद्यार्थ्यांचा पोषण आहार सकस आणि दर्जेदारच हवा, तुकाराम मुंढेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला!
विद्यार्थ्यांचा पोषण आहार सकस आणि दर्जेदारच हवा, तुकाराम मुंढेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला!
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
Parth Pawar Kayinaat Dara Marriage : पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Embed widget