एक्स्प्लोर
Advertisement
संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण होणार!
नवी मुंबई : दुर्गम भागात धावणारी कोकण रेल्वे आता कात टाकणार आहे. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण होणार आहे. यासाठी दहा हजारपैकी चार हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी दिल्याची माहिती कोकण रेल्वेने पत्रकार परिषदेत दिली.
कोकण रेल्वेला दिलेला फंड मागील काही वर्षापासून खर्च झाला नव्हता. परंतु आता कोकण रेल्वेला दिलेल्या 10 हजार कोटींपैकी चार हजार कोटींच्या कामांना रेल्वेमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.
यामध्ये रोहा-वीर मार्गाचं दुपदरीकरण, नवीन रेल्वे स्थानकांची निर्मिती तसंच पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा चिपळूण-कराड हा नवा मार्ग उभाण्यात येणार आहे, असं कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी सांगितलं.
त्यामुळे येत्या काळात कोकण रेल्वे अधिक सुसज्ज होईल आणि समस्या येणार नाहीत, अशी अपेक्षा चाकरमानी करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
सोलापूर
Advertisement