एक्स्प्लोर

Maharashtra New CM : फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक की शिवसेना संपवण्याचे षडयंत्र? -अमोल मिटकरी

Eknath Shinde Maharashtra New CM : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करून देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली.

Eknath Shinde Maharashtra New CM : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांचा हा मास्टरस्ट्रोक असल्याची चर्चा सुरु झाली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आले होते, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना हाताशी धरत सत्तास्थापनेचा दावा केला. देवेंद्र फडणीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहतील अशी घोषणा करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. फडणवीसांच्या या खेळीला सोशल मीडियावर मास्टरस्ट्रोक असल्याचं म्हटले जातेय. यालाच अनुसरुन राष्ट्रवादीचे आमदार आमोल मिटकरी यांनी ट्वीट केलेय.  फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक की शिवसेना संपवण्याचे षडयंत्र? असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केलाय. 

अमोल मिटकरी यांनी एकामागोमाग दोन ट्विट करत भाजपावर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची केलेली घोषणा हा त्यांचा मास्टरस्ट्रोक आहे की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षडयंत्र? हे येणारा काळ ठरवेल... असा टोला मिटकरी यांनी लगावलाय. तसेच अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी नव्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ किती असणार याचा अंदाजही बांधलाय. महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कारकिर्द कदाचित (30जुन 2022ते 11जुलै 2022)..देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक.. असं ट्विट मिटकरी यांनी केलेय...दरम्यान, सत्तेपायी हपापलेल्या स्वार्थी लोकांसाठी श्री तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत  लिहून ठेवलं होतं. "सत्तेसाठी हपापावे l वाटेल तैसे पाप करावे l जनशक्तीस पायी तुडवावे l ऐसे चाले स्वार्थासाठीll" महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे टेंडर घेणारे आज सरकार स्थापन करत आहेत!सावधान !! असे ट्विटही मिटकरी यांनी केले होते. 

एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. अनेकांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकही केलेय. 

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget