Eknath Khadse : एकनाथ खडसे यांची गुडघेदुखी 'बी वेनम थेरपी'मुळे बरी, नेमकी काय आहे ही थेरपी?
Eknath Khadse : मधमाश्यांच्या डंखाला आपण सारेच घाबरतो. पण प्रत्यक्षात मधमाश्यांचे विष बऱ्याचशा आजारांवर रामबाण औषध असते.
Eknath Khadse : मधमाश्यांच्या डंखाला आपण सारेच घाबरतो. पण प्रत्यक्षात मधमाश्यांचे विष बऱ्याचशा आजारांवर रामबाण औषध असते यावर आपला विश्वास बसणार नाही. अशाच मधमाशांच्या डंकाद्वारे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे उपचार घेत आहेत आणि त्यांची गुडघेदुखी 80 टक्के बरी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या उपचार पद्धतीने आपली गुडघेदुखी 80 टक्के कमी झाल्याचा दावा, माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. या उपचार पध्दतीचे नाव आहे 'बी वेनम थेरेपी' (Be Venom Therapy). या उपचार पद्धतीला अपे थेरेपी असंही म्हणतात.
पाहा हा व्हिडीओ :
एकनाथ खडसे यांना गेल्या काही वर्षांपासून गुडघे दुखीसह सांधे विकाराचा त्रास होता. यावेळी त्यांनी देश विदेशातील अनेक तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेतले होते. त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचा आराम मिळत होता. मात्र, हा आराम काही काळासाठी असायचा. मागील दोन महिन्यांपूर्वी त्यांनी औरंगाबाद येथील डॉ. नांदेडकर यांच्या मधमाशी दंश थेरेपीची माहिती घेत खडसे यांनी स्वतः डॉक्टरांकडून मधमाशी दंश थेरेपी करून घेतली होती. दोन वेळेस घेतलेल्या उपचार पद्धतीचा आपल्याला 80 टकके फायदा झाल्याचा दावा खडसे यांनी केला आहे.
एकनाथ खडसे यांनी त्यांना ज्या प्रकारे फायदा झाला तसा फायदा नागरिकांना व्हावा यासाठी त्यांच्यावतीने आज मुक्ताईनगर येथील निवासस्थानी निसर्गोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मोठ्या प्रमाणात रुग्णांनी प्रतिसाद दिला आहे. मागील काळात मधमाशी दंश थेरेपी घेतलेल्या रुग्णांना चांगला फायदा झाल्याचा दावा रुग्णांनी ही यावेळी केला आहे.
नेमकी काय आहे ही 'बी वेनम थेरपी' ?
निसर्गोपचाराच्या माध्यमातून मधमाशी 'बी वेनम थेरपी' उपचार पद्धतीने म्हणजेच मधमाशी दंश करून घेत विविध आजारांवर औरंगाबाद येथील वरद निसर्गोपचार केंद्राचे वतीने डॉ.आलोक नांदेडकर हे गेल्या पाच वर्षांपासून या पद्धतीने उपचार करीत आहेत. अतिशय किचकट आणि गंभीर आजारांवर कोणताही दुष्परिणाम न होता उपचार केले जात असल्याचं डॉ. आलोक नांदेडकर यांचं म्हणणं आहे. एकूण चारशे प्रकारच्या आजारावर या अमेरिकन म्हणजेच फ्लोरिडा नावाच्या माशीकडून चावा घेऊन हे उपचार केले जातात. या माशीच्या दंशातून आपल्या शरीरात एक विशिष्ट प्रकारचे विष आपल्या शरीरात सोडले जाते. यामुळे आपली शरीररचना त्याला प्रतिकार करण्यासाठी जागृत होऊन आपली प्रतिकारशक्ती वाढत असल्याने विविध आजार हे कमी होत असतात असे डॉ. आलोक नांदेडकर यांनी म्हटले आहे. या बी वेनम थेरपीमध्ये रुग्णाच्या प्रकृतीनुसार आणि वयानुसार त्याला उपचार दिले जातात. पहिल्या वेळेस दोन माशांचा दंश दिला जातो. त्याचबरोबर रुग्णाच्या आजाराचा पाठपुरावा लक्षात घेऊन काही आयुर्वेदिक औषधं दिली जातात. पहिल्या उपचारानंतर रुग्णाला किती प्रमाणात फायदा होतो याचा विचार करीत पुढील दहा-दहा दिवसांचे तीन ते चार सेटिंग रुग्णाला घ्यावे लागतात. ही उपचार पद्धती मोफत असली तरी सोबत दिल्या जाणाऱ्या औषधांसाठी साधारण तीनशे ते आठशे रुपये पैसे आकारण्यात येतात. या पद्धतीनुसार, आतापर्यंत डॉ. आलोक नांदेडकर आणि त्यांचे गुरू डॉ. श्रीराम कुलकर्णी यांनी गेल्या काही वर्षांत लाखो रुग्ण बरे केल्याचा दावा केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- न्यायालयावर दबाव असल्याने त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही, उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावरील कारवाईवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- Uddhav Thackeray : ईडीची थेट उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावर कारवाई; 6.45 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच
- Maharashtra: घोटाळेबाजांना सोडणार नाही! उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावर झालेल्या ईडी कारवाईनंतर किरीट सोमय्या आक्रमक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha