एक्स्प्लोर
शिक्षण विभागाच्या प्रत्येक निर्णयावर टीका, विनोद तावडे भावूक
''शिक्षण विभागाच्या निर्णयावर विरोधकांकडून नेहमी टीका केली जाते. मात्र एवढे उपक्रम राबवले, त्याचं कुणी एक शब्दानेही कौतुक केलं नाही,'' अशी खंत तावडेंनी बोलून दाखवली.
मुंबई : ‘खता तो जिंदगीभर मैं करता आया, धुल चेहरे पे थी, आयना पुच्छता रहा’, असं म्हणत शिक्षणमंत्री विनोद तावडे विधान परिषदेत बोलताना भावूक झाले. ''शिक्षण विभागाच्या निर्णयावर विरोधकांकडून नेहमी टीका केली जाते. मात्र एवढे उपक्रम राबवले, त्याचं कुणी एक शब्दानेही कौतुक केलं नाही,'' अशी खंत तावडेंनी बोलून दाखवली.
''थ्री इडियट पाहायला छान वाटतो. फुंसूक वांगडू इथे आले, त्यांनी चर्चा केली. लेह-लडाखच्या वांगडूंना आम्ही जे प्रयोग केले ते दिसले, पण तुम्हाला दिसत नाही,'' असं म्हणत तावडेंनी विरोधकांवर निशाणाही साधला.
''नापास विद्यार्थ्यांना त्याच वर्षी परीक्षा द्यायची व्यवस्था केली. अनेकांचं आयुष्य वाचवलं. पोलिसांनीही या निर्णयाचं कौतुक केलं. कारण, ही मुलं शरमेने व्यसनाच्या आहारी जायचे. 70 हजार मुलं पहिल्या वर्षी पास झाले. या मुलांचं वर्ष वाचवलं हे तुम्हाला दिसलं नाही का,'' असा सवालही तावडेंनी केला.
''गुढी पाडव्याला शिक्षकांचे पगार देता आले नाही, वाईट वाटलं''
दरम्यान, शिक्षकांच्या समस्यांवरुन तावडेंच्या विभागावर सतत टीका केली जाते. मात्र यावरही त्यांनी मत मांडलं. ''काही शिक्षकांच्या समस्या आहेत. शिक्षणाची वारी केली आणि शिक्षकांचं कौतुक केलं. या वर्षी उर्दू शिक्षिकांनी विचारलं आमची का वारी नाही, उर्दू माध्यमातील शिक्षकांसाठीही वारी सुरू केली,'' असं त्यांनी सांगितलं.
''शिक्षकांचं अनुदान महत्त्वाचं आहे का? तर नक्कीच आहे. शिक्षकांच्या पगाराचा विषय आला, सहकारी बँका जगाव्या अशी अपेक्षा होती. कोर्टाचे निकाल आले, पगार महत्त्वाचा आहे, की बँक? गुढी पाडव्याला शिक्षकांचे पगार झाले नाही, त्याबद्दल माफी मागतो, त्याचं मला वाईट वाटलं. एका बँकेत पगार नको हा अट्टाहास होता म्हणून हे झालं,'' असंही तावडे म्हणाले.
''जबाबदारी पाळतो, जबाबदारीपासून पळत नाही''
''एका विद्यार्थ्यासाठी एक शिक्षक शाळेवर जातो, शिक्षक म्हणतो मी गेलो की तो विद्यार्थी झाडामागे लपतो, मला मित्र नाही अशी तक्रार करतो. मग हा विद्यार्थी 60 विद्यार्थ्यांमध्ये गेला तर खुश होतो. पालघर विभागात आठवीनंतर मुलं शाळा सोडतात, कारण दहावीपर्यंत शाळा नव्हत्या. आम्ही तिथे शाळा सुरू केली, आम्ही जबाबदारी घेतो, जबाबदारीपासून पळत नाही,'' असं म्हणत तावडेंनी विरोधकांवरही निशाणा साधला.
''कितीही कुटा, काहीही करा , शाहू महाराज यांचे आशीर्वाद आमच्या मागे आहेत. गुणवत्तेचा ध्यास घेत शाहू, फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेत मुलांना चांगलं शिक्षण मिळावं याची जबाबदारी मी घेतली आहे,'' असं तावडेंनी सांगितलं.
''महाराष्ट्रातील माणसं प्रामाणिक आहेत, मात्र त्यातली काही मतांसाठी, टाळ्यांसाठी खोटं बोलतात, असा टोलाही तावडेंनी लगावला. चांगलं शिक्षण देताना पाठिंबा देणार की आडकाठी करणार? कितीही टीका झाली तरी प्रश्न सोडवू, सगळ्या अडचणी, अडथळे उभे राहिले तरी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवू,'' असं तावडेंनी सांगितलं.
सेल्फीच्या निर्णयावर तावडे म्हणतात...
''सेल्फीचा निर्णय चांगला आणि शुद्ध होता. शाळाबाह्य मुलं जर आणली, दाखल केली तर सेल्फी काढायचा. मुलं दिसली नाही, तर अधिकारी मुलं शोधतील, मुलं जिथे जातील तिथे शाळेत दाखल करतील. मात्र हा निर्णय रद्द केल्यामुळे नुकसान माझं किंवा आमदार कपिल पाटील यांचं नाही, तर मुलांचं झालं. निर्णयाची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली, व्हॉट्सअॅपवर जोक फिरवण्यात आले,'' अशा तीव्र शब्दात तावडेंनी नाराजीही बोलून दाखवली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement