ED : राज्यात शिवसेना राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) अशा तीन पक्षांचे सरकार असले,  तरी राज्यभर ठिकठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा संघर्ष कायम समोर येताना दिसत आहे.


राष्ट्रवादी आमदारांच्या मागे ईडी चौकशीचा ससेमिरा


सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेचे संजय कोकाटे यांनी केलेल्या तक्रारीनंतर शिंदे यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला असून यात त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना देखील या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. माढा तालुक्यातील उपळाई येथील नागेश कदम यांनी आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात एका सूतगिरणी खरेदी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार अंमलबजावणी संचालनालय , केंद्रीय लाचलुचपत विभाग, सेबी, आयकर विभाग अशा विविध ठिकाणी तक्रारी दिल्या होत्या.


400 कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणात तक्रारी दाखल


यानंतर शिवसेनेचे संजय कोकाटे यांनी देखील आमदार शिंदे यांच्या विरोधात साखर कारखान्यातील 400 कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणात तक्रारी दाखल केल्या होत्या. यानंतर कोकाटे यांच्या पाठपुराव्यानंतर आमदार शिंदे याना ईडीकडून नोटीस मिळून त्यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे . आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे जेष्ठ पुत्र यांची ईडी कडून जबाब घेण्याचे काम फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात करण्यात आले असून आता ईडीच्या कारवाईला सुरुवात होईल असे शिवसेनेचे संजय कोकाटे यांनी सांगितले आहे . 


महत्वाच्या इतर बातम्या