Ashok Chavan : यूपीएचा (UPA) सदस्य नसणार्‍यांनी यूपीएबद्दल बोलू नये, असा खोचक टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan)  यांनी शिवसेनेला लगावला आहे. "यूपीएचे अध्यक्ष आणि काँग्रसचे अध्यक्ष हे दोन वेगळे विषय आहेत. युपीए ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. सध्या यूपीए आहे की नाही अशी शंका येत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल केलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.  


"संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं व्यक्तीगत मत असू शकतं. शिवसेनेने आधी युपीएमध्ये सामील व्हावे. कारण शिवसेना अद्याप युपीएमध्ये सामील नाही. त्यामुळे युपीएमध्ये समील नसणार्‍यांनी युपीएच्या रचनेसंदर्भात काही टिप्पणी करण्यापेक्षा आधी युपीएचे सदस्य व्हावे, असा खोचक टोला अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला लागावला आहे. 


अशोक चव्हाण म्हणाले, "युपीएचा अध्यक्ष ठरवण्याचा विषय हा सदस्यांचा आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल युपीएमध्ये वेगळ्या प्रकारचा मत प्रवाह नसून सोनिया गांधी यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे."  


काय म्हणाले होते संजय राऊत? 


यूपीएचे अध्यक्ष आणि काँग्रसचे अध्यक्ष हे दोन वेगळे विषय आहेत. युपीए ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. सध्या यूपीए आहे की नाही अशी शंका येत आहे. आताच्या परिस्थितीत यूपीएचं नेतृत्व करायचे असेल तर त्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घ्यायला हवा. परंतु, काँग्रेस याबाबत पुढाकार घ्यायला तयार नाही.  2024 ची तयारी करायची असेल तर यूपीए मजबूत करावीच लागेल. त्यासाठी यूपीएच्या सातबाऱ्यावर अनेक नावे टाकावीच लागतील.  काँग्रेसने यूपीएच्या जिर्णोधाराची तयारी करायला हवी, असे संजय राऊत म्हणाले होते.  


गेल्या काही दिवासंपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली आहे. के. चेंद्रशेखर राव हे युपीएचे नेतृत्व करण्यास इच्छुक नाहीत. परंतु, जे नेतृत्व करेल त्यांच्या पाठिशी ते खंबरीपणाने उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार हे या सर्व घडामोडींमध्ये आघाडीवर आहेत. सध्या यूपीए संदर्भात काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नाही, हे दुर्दैवी आहे. काँग्रेसनं यूपीएच्या जिर्णोधाराची तयारी करायला हवी असे, संजय राऊत यांनी म्हटले होते. 


महत्वाच्या बातम्या