दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. 'ज्या मशिदींवर भोंगे लागतील, त्याच्या समोर हनुमान चालिसा लावू', शिवाजी पार्कवरील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचा इशारा


2. राज ठाकरे 3-4 महिने भूमिगत असतात आणि मग लेक्चर देतात, त्यांच्या भूमिकेत सातत्य नसतं, शरद पवार यांचं राज ठाकरे यांना प्रत्युत्तर 


3. राज ठाकरे सत्य बोलतायत, क्रमांक एकचा पक्ष सत्तेबाहेर, राज ठाकरे यांच्या भाषणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया


4. मुंबै बँकेमधील बोगस मजूर प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांची नोटीस, सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश


5. देशात इंधन दरवाढीचा भडका कायम, पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, 13 दिवसांत 8 रुपयांची दरवाढ


6. महागाईवरुन काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा, वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांवर 1.25 लाख कोटींचा बोजा पडणार; रणदीप सुरजेवाला यांचा दावा


7. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आकाशातल्या गूढ दृश्यांनी थरकाप, उपग्रहाचे अवशेष कोसळल्याचा खगोलशास्त्रज्ञांचा अंदाज


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 03 एप्रिल 2022 : रविवार



8. सेल्फी काढण्याच्या नादात तोल जाऊन पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू, बीडच्या कवडगावमधील धक्कादायक घटना


9. इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा


इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना रमजानचा आज पहिला दिवस म्हणजेच पहिला उपवास आहे. रविवारी चंद्र दिसल्यानंतर रमजानच्या महिन्याला सुरुवात झाली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव महिनाभर उपवास करतात. महिनाभर उपवास केल्यानंतर, ईदचा चंद्र पाहिल्यानंतर पुरुष आणि मुले ईदगाहमध्ये आणि महिला घरांमध्ये ईदची नमाज अदा करतात.पवित्र महिन्याचा चंद्र पाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून रमजान महिन्याला सुरुवाती झाल्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी ट्विट केले की, 'हा पवित्र महिना लोकांना गरीबांची सेवा करण्याची प्रेरणा देईल. यामुळे आपल्या समाजात शांतता, सौहार्द आणि करुणेची भावना अधिक वाढण्यास मदत होईल.'


10. यू ट्यूबर भुवन बामच्या व्हिडीओवरुन नवा वाद; महिलांचा अपमान केल्याचा आरोप, राष्ट्रीय महिला आयोगाची कठोर कारवाईची मागणी