एक्स्प्लोर
राज्यात 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
112 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे.

फाईल फोटो
मुंबई/औरंगाबाद : राज्यातील 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 112 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे. राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरला, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासन परिशिष्ट 'अ' मध्ये नमूद केलेल्या 151 तालुक्यांमध्ये त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे गंभीर/मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करत आहे. दुष्काळ घोषित केल्याचे आदेश 31 ऑक्टोबर (आज) पासून अंमलात येत आहेत. शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहतील. दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांत आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (112) सांगली (5) : जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी, तासगांव सातारा (1) : माण-दहीवडी सोलापूर (9) : करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर पालघर (3) : पालघर, तलासरी, विक्रमगड धुळे (2) : धुळे, सिंदखेडे जळगाव (13) : अमळनेर, भडगांव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल नंदुरबार (3) : नंदुरबार, नवापूर, शहादा नाशिक (4) : बागलान, मालेगांव, नांदगांव, सिन्नर अहमदनगर (11) : कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, रोहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड औरंगाबाद (9) : औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड,सोयगाव, वैजापूर, कन्नड बीड (11) : आष्टी, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, शिरुर (कासार), वडवणी, केज, आंबेजोगाई, परळी, पाटोदा, जालना (7) : अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसांगवी, जाफ्राबाद, जालना, परतूर नांदेड (2) : मुखेड, देगलूर उस्मानाबाद (7) : लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम परभणी (6) : मनवथ, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू हिंगोली (2) : हिंगोली, सेनगाव अमरावती (1) : मोर्शी बुलडाणा (7) : खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा यवतमाळ (6) : बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव चंद्रपूर (1) : चिमूर नागपूर (2) : काटोल, कळमेश्वर मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (39) पुणे (7) - आंबेगाव, पुरंदर, सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, शिरुर-घोडनंदी सातारा (2) - कोरेगांव, फलटण धुळे (1) - शिरपूर नंदुरबार (1) - तळोदे नाशिक (4) - देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड नांदेड (1) - उमरी हिंगोली (1) - कळमनुरी लातूर (1) - शिरुर अनंतपाळ अकोला (5) - बाळापूर, बार्शिटाकळी, मुर्तिजापूर, तेल्हारा, अकोला अमरावती (4) - अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगांव सुर्जी बुलडाणा (1) - मोताळा वाशिम (1) - रिसोड यवतमाळ (3) - केलापूर, मारेगांव, यवतमाळ चंद्रपूर (4) - ब्रम्हपुरी, नागभिर, राजुरा, सिंदेवाही नागपूर (1) - नरखेड वर्धा (2) - आष्टी, कारंजा
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























