एक्स्प्लोर

मोबाईलवर बोलत ड्रायव्हिंग, सिंधुदुर्गात एसटी चालकाचा प्रताप

एसटी बसचा चालक तब्बल दहा मिनिटे मोबाईलवर बोलत ड्रायव्हिंग करत होता.

सिंधुदुर्ग : ‘एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास’ असं ब्रीदवाक्य सांगणाऱ्या एसटी महामंडळाला आपल्याच ब्रीदवाक्याचा विसर पडलेला दिसतोय. कारण सिंधुदुर्गात मोबाईलवर बोलत निष्काळजीपणाने एसटी बस चालवल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार बसमधील एका प्रवाशाने कॅमेऱ्यातही कैद केला. गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलू नये, अशा सूचना एसटी प्रशासनाकडून चालकांना दिल्या जातात. त्यासंदर्भात चालकांचे प्रबोधनही केले जाते. मात्र, चालकच या नियमाला हरताळ फासत असल्याचे समोर आले आहे. सिंधुदुर्गात निष्काळजी एसटी चालक आणि त्याचा बेजबाबदारपणा एका प्रवाशाच्या मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे. एसटी बसचा चालक तब्बल दहा मिनिटे मोबाईलवर बोलत ड्रायव्हिंग करत होता. एसटी बस प्रवाशांनी भरलेली होती. बुधवारची म्हणजे 5 सप्टेंबरची ही घटना असून, 4.30 वाजता सुटणाऱ्या देवगड-बोरिवली बसमध्ये हा प्रकार घडला. या चालकाने एसटी बसमधील सर्वच प्रवाशांचा जीव धोक्यात टाकला होता. ज्याच्याकडे एसटी बसची धुरा असतात, त्या चालकानेच असा निष्काळजीपणा केला, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी घेणार कोण, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे. सिंधुदुर्गातील हा प्रकार प्रवाशाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केल्याने समोर आला आहे, मात्र कित्येक ठिकाणी असे प्रकार घडत असतील, याची नोंदच नाही. त्यामुळे आता तरी एसटी महामंडळ हे प्रकार गांभिर्याने घेत प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा आहे. व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Girish Vyas: भाजपच्या बांधणीसाठी आम्ही आमची तरुणाई घालवली, घरावर तुळशीपत्र ठेवलं अन् आता..; गिरीश व्यास संतापले, पक्षाचा कार्यप्रणालीवरून जाहीर नाराजी, सर्व पदांचा राजीनामा!
भाजपच्या बांधणीसाठी आम्ही आमची तरुणाई घालवली, घरावर तुळशीपत्र ठेवलं अन् आता..; गिरीश व्यास संतापले, पक्षाचा कार्यप्रणालीवरून जाहीर नाराजी, सर्व पदांचा राजीनामा!
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Nashik News: चार महिन्यांपासून नाशिकच्या कारागृहात बंदिस्त, दम्याचा त्रास वाढला अन्...; अहिल्यानगर बँक अपहार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
चार महिन्यांपासून नाशिकच्या कारागृहात बंदिस्त, दम्याचा त्रास वाढला अन्...; अहिल्यानगर बँक अपहार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Embed widget