एक्स्प्लोर

Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदी डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदासाठी मागील अनेक दिवसांपासून दिग्गज प्रयत्न करत होते. मात्र शेवट डॉ. पराग काळकर यांनी बाजी मारली आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रक काढून ही घोषणा केली आहे.  प्र-कुलगुरूपदासाठी मागील अनेक दिवसांपासून दिग्गज प्रयत्न करत होते. मात्र शेवट डॉ. पराग काळकर यांनी बाजी मारली आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुरेश गोसावी यांची निवड झाल्यानंतर आता प्र-कुलगुरू म्हणून कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. 

विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ.संजय चाकणे यांची नावं प्र-कुलगुरूपदासाठी चर्चेत होती. त्यामुळेच या पदावर नेमकी कोणाची वर्णी लागते, हे पाहणं महत्त्वाचं होतं. मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांच्यादेखील नावाची चर्चा होती. 

त्यामुळे प्र-कुलगुरू पदी कोणाची नियुक्ती होणार याबाबत शिक्षण क्षेत्रात चर्चेला उधाण आलं होतं. गेल्या महिन्यात मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र काही कारणांमुळे त्यांचे नाव मागे पडलं. त्यानंतर डॉ. पराग काळकर यांची प्र - कुलगुरू पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

कोण आहेत डॉ. पराग काळकर?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून डॉ. पराग काळकर हे काम पाहत आहे. कुलगुरु पदासाठीदेखील त्यांची चर्चा सुरु होती. ते पहिल्या पाच उमेदवारांमध्येदेखील होते. मात्र त्यांना आता  प्र-कलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. 

स्टुडंट हेल्पींग हँडस अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांचा आक्षेप

 त्याच्या या निवडीवर किंवा नियुक्तीवर मात्र स्टुडंट हेल्पींग हँडस अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी आक्षेप घेतला आहे. प्र-कुलगूरुपदी पराग काळकर या गुन्हेगार व्यक्तीची निवडविद्यापीठानी राजकीय दबावातून निर्णय घेतला का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांच्या नियुक्तीला विरोधा केला आहे. त्यांच्यावर अनेक आरोपही केले आहेत. 

फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय?

'आज विद्यापीठाच्या इतिहासातील प्रथमच अशी घटना घडली असे म्हणावं लागेल. त्यांच्या आजपर्यतच्या परंपरेला आणि प्रतिष्ठेला मोठे गालबोट लागले आहे. डॉ.पराग काळकर हे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे डीन होते. 2017 ते18 या कालावधीत त्यांनी आर्थिक गुन्हा केला होता. पिंपरी चिंचवड येथील पोलीस ठाण्यात IPC 406,409,420 असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यांवर दाखल आहेत. असं असताना कुलगुरु आणि व्यवस्थापण परीषदेने त्यांची निवड केली कशी?कोणी सांगितले त्यांना हे गुन्हे असताना नियुक्ती करायला? कुठल्या नैतिकतेत बसतं हे?  ही अत्यंत शरमेची बाब आहे.निवडीसाठी ठिकभर लोक होतेच ना. त्यांना संधी द्यायची.सध्या विद्यापीठाची वाटचाल कुठे चाललीय? रसातळास घेऊन जाता काय? देशभर ज्या विद्यापीठाचा डंका संशोधन आणि गुणवत्तेमुळे आहे. या विद्यापीठात अशा व्यक्तीची नियुक्ती करणे अत्यंत घातक आहे. एकंदरीत ही प्र-कुलगूरु निवड प्रक्रिया उशीरा राबवण्याचे कारण एकच होते. मोठ्या रक्कमेची ठरलेली डिल कुलगूरु पदासाठी आधीच दिली होती. ती प्र-कुलगूरु पदावरती त्यांनी समाधान मानावे. यासाठी त्यांच्या राजकीय वरदहस्तांनी इच्छा पुर्ण केली. यासाठी आम्ही राज्यापालास भेटून सर्व बाबी पुरावेनिशी सांगणार आहोत. नियुक्त रध्द करावी.अशी मागणी करणार आहोत', असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : शिक्षणाच्या माहेरघरात चाललंय काय? पुण्यात डीआरआयची मोठी कारवाई, 50 कोटींचे ड्रग्स जप्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशाराOmraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषणSuresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Embed widget