एक्स्प्लोर

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दर्जा घसरला!

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दर्जा घसरल्याचं आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या विद्यापीठ मानांकनातून समोर आले आहे. या मानांकनात अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 48 व्या क्रमांकावर घसरलं आहे. या घसरगुंडीमुळे विद्यापीठ आणि संबंधित यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दर्जा घसरल्याचं आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या विद्यापीठ मानांकनातून समोर आले आहे. या मानांकनात अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 48 व्या क्रमांकावर घसरलं आहे. या घसरगुंडीमुळे विद्यापीठ आणि संबंधित यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.

अमेरिकन नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून नुकतेच या विदापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांना पदमुक्त करण्यात आलं. राज्याच्या राज्यपालांनी ही कारवाई केली होती.

डॉ. दाणी यांच्याच कार्यकाळात विद्यापीठ अनेक आघाड्यांवर मागे राहिल्याचं चित्र गेल्या पाच वर्षांच्या काळात पहायला मिळालं आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिस्वीकृती समितीने राज्यातील कृषी विद्यापीठांचा आढावा यावर्षीच्या सुरूवातीलाच घेतला होता. आयसीएआरच्या अधिस्वीकृती समितीने सात ते आठ वर्षांनंतर आढावा घेतला आहे. आढाव्यात कृषी विद्यापीठांचे शिक्षण, संशोधन व विस्तार काम समाधानकारक दिसले नाही. म्हणूनच आयसीआरने या कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती रद्द केली होती. त्याचे चांगलेच पडसाद उमटले होते. ही अधिस्विकृती हटवून कृषी विद्यापीठांना संशोधनासाठीचा निधी मिळावा, यासाठीचे प्रयत्न शासनाकरवी करण्यात आले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दर्जा घसरला!

2014 पर्यंत राज्यात खासगी कृषी महाविद्यालयांची संख्या भरमसाठी वाढली. पण कृषी विद्यापीठांचे संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापक इत्यादी अनेक पदं रिक्त होती. शासनाने रिक्त पदेच न भरल्याने शिक्षण, संशोधन व कृषी विस्तार कार्यांचा ताण हा अपुर्‍या मणुष्यबळावर पडला.

कृषी विद्यापीठाचे शासकीय महाविद्यालय तसेच खासगी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, उत्तर पत्रिका तपासणी आदी अतिरिक्त कामे करावी लागत असल्याने शैक्षणिक गुणवत्ता ढासळली, संशोधनावरही परिणाम झाला. आयसीएआरच्या अधिस्वीकृती समितीला हे सर्व ठळकपणे दिसले. त्याचाच परिणाम समोर आला असून, राज्यातील कृषी विद्यापीठांचा दर्जा घसरला आहे. परिणामी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी प्रचंड मागे पडले आहे.

टॉप टेनमध्ये राहणारे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मानाकंनात 48 व्या क्रमाकांवर पोहोचले आहे.

अलिकडेच संचालक, विभाग प्रमुख, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ व कनिष्ठ संशोधन सहाय्यकांची पदे भरण्यात आली आहेत. त्यामुळे पुढे परिस्थिती सुधारण्यास मदत होणार असल्याचे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला वाटतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन'
Ashadhi Wari : गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन'
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget