एक्स्प्लोर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड : आरोपींविरोधात अजूनही आरोपपत्र नाही!

पुण्यातील दंडाधिकारी न्यायालयानं नोव्हेंबर 2018 मध्ये अंदुरे आणि कळसकर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 45 दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्याला दिलेलं आव्हान हायकोर्टात प्रलंबित असतानाही गेल्या आठवड्यात तपासयंत्रणेला आणखीन 45 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी त्यांच्याविरोधात सीबीआयला आरोपपत्र दाखल करण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीला हायकोर्टात आव्हान दिलं आहे. या दोघांवर युएपीए कलमाखाली आरोप असताना विशेष कोर्टात यावर सुनावणी होणं अपेक्षित होतं. त्यामुळे पुणे दंडाधिकारी न्यायालयानं अधिकार नसतानाही तपासयंत्रणेला दिलेली ही मुदतवाढ बेकायदेशीर असल्याचा दावा या दोघांच्यावतीनं त्यांचे वकिल संजीव पुनाळेकर यांनी केला आहे. पुण्यातील दंडाधिकारी न्यायालयानं नोव्हेंबर 2018 मध्ये अंदुरे आणि कळसकर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 45 दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्याला दिलेलं आव्हान हायकोर्टात प्रलंबित असतानाही गेल्या आठवड्यात तपासयंत्रणेला आणखीन 45 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. गुरूवारी या याचिकेवर न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली. तेव्हा या निर्देशांवर नाराजी व्यक्त करत हायकोर्टानं हा आदेश रद्द करत असल्याचं सरकारी वकिलांना सांगितलं. मात्र सरकारी वकिलांनी विनंती केली की, सीबीआयतर्फे सॉलिसिटर जनरल अनिल सिंग हे या प्रकरणी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे तूर्तास या प्रकरणाची सुनावणी 23 जानेवारीपर्यंत तहकूब केलीय. मात्र पुढच्या सुनावणीला आपणं या प्रकरणाचा निकाल देऊ याची स्पष्ट कल्पना सरकारी वकिलांना दिली. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला एटीएसनं अटक करण्यात आली होती. त्यानंतर यांच्या चौकशीत एटीएसला पुण्यातील डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडाचे धागेदोरे सापडले. त्यानंतर दाभोलकरांवर गोळ्या झाडणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर अंदुरे आणि कळसकर हेच दोघे असल्याची कबुली खुद्द आरोपींनी दिल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या दोघांचा ताबा सीबीआयनं घेतला आणि त्यांच्याविरोधात तपास सुरू केला. मात्र पाच महिने उलटून गेले तरीही सीबीआयनं यांच्याविरोधात अजूनही आरोपपत्र दाखल केलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Kohinoor Apartment Building Collapsed in Bhiwandi: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली, 9 जणांचा मृत्यू; रात्री 12 वाजता हादरवणारं घडलं, कुटुंबीयांचा आक्रोश
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली, 9 जणांचा मृत्यू; रात्री 12 वाजता हादरवणारं घडलं, कुटुंबीयांचा आक्रोश
Ahilyanagar Crime News : संतापजनक! खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकानं चक्क तिसरीतल्या चिमुकल्याच्या हाताचा चावा घेतला, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
संतापजनक! खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकानं चक्क तिसरीतल्या चिमुकल्याच्या हाताचा चावा घेतला, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Vijay Chaudhari Audio Clip: 'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Chaudhari Audio Clip: 'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
Pune Rain Alert : पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Embed widget