Doctor Strike: वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यभरातील सात हजारपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर, आंदोलन मागे घेण्याचं सरकारचं आवाहन
Doctor Strike: विविध मागण्यांसाठी मागील एका वर्षापासून मंत्र्यांसोबतच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका होऊनही प्रतिसाद न दिल्याने निवासी डॉक्टरांनी आजपासून संपाचा हत्यार उगारले आहे.
मुंबई: राज्यातील सात हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर आजपासून संपावर (Doctor Strike) आहेत. रखडललेल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार आहे. अतिदक्षता विभाग वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मागील एका वर्षांपासून कित्येक बैठका होऊनही अजुन कोणतीच मागणी मान्य न झाल्याने डॉक्टरांनी आंदोलन सुरु केले आहे.
सेन्ट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना पत्र देण्यात आले आहे. विविध मागण्यांसाठी मागील एका वर्षापासून मंत्र्यांसोबतच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका होऊनही प्रतिसाद न दिल्याने निवासी डॉक्टरांनी आजपासून संपाचा हत्यार उगारले आहे मुंबईतील केईएम ,नायर ,सायन, कूपर रुग्णालयात काम करणारे निवासी डॉक्टर्स नायर रुग्णालय बाहेर जमले होते.
ठाण्यातील 117 डॉक्टर संपावर
ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टर मार्ड संघटनेने पुकारलेल्या संपात सामील झाले. कळवा हॉस्पिटलमधील 117 डॉक्टर संपावर आहेत. विद्या वेतनसह विविध मागण्यांसाठी डॉक्टरांचा संप पुकारला आहे.
यवतमाळमध्ये 130 डॉक्टर संपावर
विविध मागण्यासाठी आज पासून महाराष्ट्रातील मार्ड या संघटनेचे निवासी डॉक्टर संपावर आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालतील 130 डॉक्टर सुद्धा संपावर आहे. अत्यावश्यक सेवा विभाग सुरू ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे इतर रुग्ण सेवा विस्कळित होण्याची शक्यता निर्माण झाली. या पूर्वी मार्डच्या डॉक्टरांनी आपल्या मागण्यासाठी अनेक वेळा संप पुकारले. मात्र शासनाने त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांना संपाचं शस्त्र उगारवे लागले. मागण्या मान्य न झाल्यास सुरू असलेल्या सेवाही बंद करण्याचा इशारा मार्ड संगटनेने दिला आहे.
अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील दीडशे डॉक्टर संपावर
राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर गेलेत आणि या डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे रुग्णूसवेवर या संपाचा परिणाम होताना पाहायला मिळाला. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रोज पाच ते सात हजार रुग्ण तपासणीसाठी येत असतात. मात्र या रुग्णसेवेमध्ये कार्यरत असणारे दीडशे डॉक्टर आजपासून संपावर गेले आहेच. त्यामुळे सकाळपासूनच रुग्णांच्या चेकअप पासून इमर्जन्सी वार्ड पर्यंत सगळ्याच ठिकाणी पेशंटला वेटिंग करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर सध्या संपावर आहेत मात्र सगळ्याच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्या इमर्जन्सी सर्व्हिस चालू आहेत. मात्र दोन दिवसांमध्ये सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही चालू असलेले इमर्जन्सी सर्व्हिससुद्धा बंद करू असा पवित्रा अंबाजोगाई मधल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी घेतला आहे. आज मार्डच्या डॉक्टरांनी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या गेटवर निदर्शने सुरू केले आहेत
औरंगाबादेतील 300 पेक्षा अधिक निवासी डॉक्टर संपावर
औरंगाबादमध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन करण्यात आले आहे. अतिदक्षता विभाग वगळता इतर सेवा बंद करण्यात आल्या आहेत