अमरावती : यंदाची दिवाळी कोरोना संकटात साजरी करण्यात येत आहे. पण तरि मात्र दिवाळीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. दिवाळी निमित्त बाजारात हटके आकाश कंदील, पणत्या आणि फराळ यांची आवाक वाढली आहे. अशातच अमरावतीतील एका मिठाईच्या दुकानात दिवाळीसाठी एक हटके मिठाई तयार करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे, ही मिठाई सोन्यापासून तयार करण्यात आली आहे.
दिवाळी निमित्त अमरावतीच्या नामांकित रघुवीर मिठाई यांनी यावर्षी तब्बल सात हजार रुपये किलो असलेली शुद्ध सोनेरी वर्ख असलेली 'सोनेरी भोग' ही मिठाई बाजारात आणली आहे. विदर्भातीलच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांकरिता 'सोनेरी भोग' (Gold Mithai) उपलब्ध करून दिली जाणार आहे. पिस्ता, केसर आणि हेझलनट या ड्रायफ्रुट्सपासून ही मिठाई तयार करण्यात आली असून या मिठाईवर खास दिल्लीतील नोएडा येथून मागवलेला सोन्याचा 24 कॅरेट सर्टिफिकेटसह वर्ख लावलेला आहे. तसेच मिठाई खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिठाई तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या 24 कॅरेट सोन्याच्या वर्खाचं सर्टिफिकेटही दिलं जाणार आहे.
राजस्थानमधील कारागिरांनी 'सोनेरी भोग' (Soneri Bhog) ही विशेष मिठाई खास दिवाळीसाठी तयार केली आहे. शुद्ध सोन्याचा वर्ख असलेल्या या मिठाईची किंमत 7000 रुपये प्रति किलो इतकी असून रघुवीर मिठाईच्या राजापेठ येथील प्रतिष्ठानात ही मिठाई विक्रीकरिता उपलब्ध करण्यात आली आहे.
दर्जेदार आणि गोडपणामुळे रघुवीर स्वीट मार्टने अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात यंदा दीपावलीसाठी खास सोन्याची मिठाई केली आहे. शुद्ध 24 कॅरेट गुणवत्ता प्रमाणपत्रासह बनविलेली ही मिठाई ग्राहकांना आकर्षित करते. रघुवीर स्वीट मार्ट हे अमरावती शहरातील मिठाई आणि नमकीनसाठीचे एक सुप्रसिद्ध नाव आहे. दरवर्षी दीपावली सणानिमित्त रघुवीर स्वीट मार्ट आपल्या ग्राहकांना नवीन मिठाई उपलब्ध करुन देत असतं. यापूर्वी गोल्डन बिस्किट, सोनरी पॅन आणि आता सोनरी भोग या मिठाई ग्राहकांची दिवाळी खास करणार आहेत.
पाहा व्हिडीओ : दिवाळीनिमित्त अमरावतीत 7 हजार रुपयांची 'सोनेरी भोग' मिठाई
सुमारे 7 हजार रुपयांच्या या गोड वस्तूच्या प्रत्येक बॉक्ससह 24 कॅरेटच्या सोन्याचं प्रमाणपत्रही ग्राहकांना देण्यात येत आहे. रघुवीर स्वीट मार्टचे संचालक चंद्रकांत पोपट यांच्या म्हणण्यानुसार, सोन्याची मिठाई बदाम, शुद्ध केशर, शुद्ध पिस्ता, शुद्ध हेझलनट यापासून बनवल्या आहेत. ही गोड मिठाई ग्राहकांना आकर्षित करते, तसेच बंगाली मिठाईमध्ये छेना ड्राईफूड, वर्ख सँडविच, तिरंगा, चेरी बदाम, बदाम भोग, चिना टरबूज यांचा समावेश आहे. दिवाळीच्या निमित्ताने करंजी, अनारसा, कच्छ चिवडा, लसन चिवडा, शंकरपाडा, बदाम बर्फी, स्ट्रॉबेरी कसारा यांसारख्ये पदार्थही उपलब्ध आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :