नागपूर : नागपूर महापालिकेचे वादग्रस्त वैदकीय अधिकारी डॉ प्रवीण गंटावार हे महापालिकेसाठी अडचणीचे कारण ठरण्याची शक्यता आहे. कारण एलेक्सिस रुग्णालयात झालेली तोडफोड आणि तिथल्या व्यवस्थापनावर दबाव आणण्याच्या प्रकरणात डॉ गंटावार यांची भूमिका असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. याशिवाय नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि महापालिकेत भाजपचे वरिष्ठ नेते दयाशंकर तिवारी यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासंदर्भातल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणातही त्यांची भूमिका असल्याचे पुरावे पोलिसांना तपासादरम्यान मिळाले आहेत. त्यामुळे डॉ. प्रवीण गंटावार यांच्यासह महापालिकेला प्रशासनाची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
या दोन्ही प्रकरणी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरु होता. अनेक आठवडे तपास केल्यानंतर साहिल सय्यद नावाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला हाताशी धरुन डॉ. प्रवीण गंटावार यांनी कट रचल्याचे समोर आले. विशेष म्हणजे पोलिसांनी या प्रकरणी आधीच साहिल सय्यदला अटक केली होती. साहिल सय्यदने नागपूरच्या नामांकित खाजगी रुग्णालयांवर विविध आरोप करत वादात ओढले होते. तर नंतर चौकशीच्या फेऱ्यात अडकवून डॉ प्रवीण गंटावार यांनी त्या रुग्णालयावर दबाव वाढवला होता.
Alexis Hospital | नागपुरातील एलेक्सिस रुग्णालयात गोंधळ घालत टोळक्याची डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी
यामागे गुन्हेगारांमार्फत रुग्णालय प्रशासनाला ब्लॅकमेल करुन खंडणी वसूल करण्याचा कट असल्याचा संशय पोलिसांना होता. तपासात त्यास बळकटी देणारे पुरावे समोर आल्यानंतर आता पोलिसांनी त्यांच्या तपासाला डॉ प्रवीण गंटावार यांच्यापर्यंत नेण्याचे ठरवले आहे. लवकरच नागपूर पोलिसांकडून या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळए आता महापालिका या वादग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार हे पाहण्यासारखे असणार आहे.
Alexis Hospital Issue | 'एलेक्सिस' विरोधात नागपूर महापालिकेची कारवाई बेकायदेशीर : मुंबई हायकोर्ट