एक्स्प्लोर

पीककर्जासाठी शरीरसुखाची मागणी प्रकरण, प्रशासनाकडून गंभीर दखल

ही घटना कानावर पडताच, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी पोलिस अधीक्षकांशी संपर्क करुन तत्काळ आरोपींच्या अटकेसाठी कारवाई करण्यास सांगितल्याची माहिती देण्यात आली.

मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाने पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीशी अश्लील संभाषण केल्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. स्वत: जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत. ही घटना कानावर पडताच, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी पोलीस अधीक्षकांशी संपर्क करुन तत्काळ आरोपींच्या अटकेसाठी कारवाई करण्यास सांगितले. या प्रकरणात एका आरोपीला अटक झाली असून, बँक व्यवस्थापक फरार असल्याने त्याच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले आहे. या बँक व्यवस्थापकाविरुद्धचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून तयार केला जात आहे. त्याच्या निलंबनासाठीही बँक व्यवस्थापनाकडे प्रस्ताव पाठवला जात आहे. असे प्रकार जिल्हा प्रशासन खपवून घेणार नाही आणि त्याच्याविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई होईल, असं जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी स्पष्ट केलं. काय आहे प्रकरण? पीककर्जासाठी बँक मॅनेजरने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात घडला. महिलेच्या तक्रारीवरुन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर आणि शिपायाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या माहितीप्रमाणे, शेतकरी आणि त्याची पत्नी पीककर्जासाठी दाताळातल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या. तिथं बँक मॅनेजरने कागदपत्रांची चाळणी करुन तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना केली. त्यावर संबंधित शेतकऱ्यानं त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. नंतर मॅनेजरने शेतकरी पत्नीसोबत अश्लील संभाषण करत त्यांना शरीरसुखाची मागणी केली. मोबदल्यात पीककर्जासोबत वेगळं पॅकेजही देण्यात येईल, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठवला. याप्रकरणी मॅनेजर आणि शिपाई या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस  फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut Narayan Rane Defamation Case: नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Embed widget