जळगाव: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील 'राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे'निमित्त जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत काल शनिवारी दुपारी जळगाव शहर व ग्रामीण मतदार संघाचा मेळावा घेण्यात आला. यावेळी जाहीर भाषणात उघडपणे फलकावरील फोटोवरुन माजी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकरांबाबत नाराजी प्रकट केली. इतकेच नव्हे तर नेत्यांमधील मतभेद मिटवा असे आवाहन केल्याने राष्ट्रवादीमधील गटबाजी प्रदेशाध्यक्षांसमोरच चव्हाट्यावर आली.


बॅनर नाट्यामुळे राष्ट्रवादीचा 'जुने विरुद्ध नवे' वाद चव्हाट्यावर,देवकरांच्या मनात खडसेंना स्थान नाही?


या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव शहर व ग्रामीण मतदारसंघातील पक्ष संघटनाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडून कार्यकारिणीची माहिती जाणून घेतली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना धरणगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी जळगाव ग्रामीण विभागात सुरुवातील राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र, नेत्यांमध्ये मतभेद झाल्याने ताकद कमी झाल्याची माहिती दिली. तसेच गुलाबराव देवकरांकडे उंगलीनिर्देश करीत व्यासपीठावरील फलकावर देखील आमचे फोटो लावले नसल्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली. तसेच नेत्यांना मतभेद मिटविण्यासाठी सांगा अशी सूचनाही त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे केली. यानतंर गुलाबराव देवकर यांनी अश्या छोट्या छोट्या विषयांवरुन नाराजी करु नका, असे ज्ञानेश्वर महाजन यांना सांगतानाच धरणगाव तालुक्यात माझ्या खर्चाने लावलेल्या फलकांवर तुमचा फोटो लावल्याची आठवण त्यांना करुन दिली.


ईडी लावली तर, सीडी लावेन असं गमतीनं म्हटलेलं, पण आता खरंच ईडी लागली मागे, आता सीडी लावण्याचं काम बाकी : एकनाथ खडसे


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे  स्वागत करणारे बॅनर आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडून लावण्यात आले आहेत. मात्र या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील नेत्यांचे फोटो लावण्यात आले असले तरी  भाजपा मधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे तसेच रोहिणी खडसे  यांचे फोटो मात्र या बॅनरवर लावण्यात आलेले नव्हते, त्यामुळे जळगाव  जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गटबाजी असल्याचे बोलले जात होते. त्यातच ज्ञानेश्वर महाजन यांनी उघड नाराजी बोलून दाखवल्याने गटबाजी उघड झाल्याची चर्चा आहे.