मुंबई : अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव आपला प्रवेश घेता आला नाही आहे, त्यांना प्रवेश निश्चित करता यावेत यासाठी, 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत FCFS 2.0 ला मुदतवाढ देण्यात आलेली आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे.


Participate in FCFS मधून अर्ज करणे व allotment घेणे 16 फेब्रुवारी 2021 रात्री 10:00 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर Allotment मिळालेल्या मुलांनी आपला प्रवेश विद्यालयात निश्चित करण्यासाठी 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

तर प्रवेश रद्द करण्यासाठी 15 फेब्रुवारी रोजी रोजी सायंकाळी 06:00 वा.पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी मिळालेल्या वाढीव वेळेत आपला प्रवेश घ्यावा. ही 2020-21 साठी शेवटची संधी असेल असं दत्तात्रय जगताप यांनी सांगितलं आहे.

अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर, मुंबई विभागातून 59,322 विद्यार्थ्यांना मिळाले महाविद्यालय