बॅनर नाट्यामुळे राष्ट्रवादीचा 'जुने विरुद्ध नवे' वाद चव्हाट्यावर,देवकरांच्या मनात खडसेंना स्थान नाही?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे संवादयात्रेनिमित्त जळगावमध्ये येत आहेत, त्यांचे स्वागत करणारे बॅनर आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यलयाबाहेर माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडून लावण्यात आले आहेत. मात्र या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील नेत्यांचे फोटो लावण्यात आले असले तरी भाजपा मधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे तसेच रोहिणी खडसे यांचे फोटो मात्र या बॅनरवर लावण्यात आलेले नाही, त्यामुळे जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गटबाजी असल्याचे बोलले जात आहे.