एक्स्प्लोर

चिमुकल्या विद्यार्थ्यांचा बसला दे धक्का, धुळे-शिरपूर बस बिघाडामुळे प्रवाशांची गैरसोय  

Dhule News Update  : गेल्या काही दिवसांपासून परिवहन महामंडळातील बसेसची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याचे चित्र समोर येत आहे. बसेसमध्ये अनेक तांत्रिक अडचणी देखील निर्माण होत आहेत.

Dhule News Update  : राज्य परिवहन महामंडळाच्या बस पूर्णपणे निकामी झाल्याचे दिसून येत आहे. याचा प्रत्यय आज धुळे बस आगारामधून सुटणाऱ्या धुळे-शिरपूर एसटी बसमुळे आला. ही बस देवपूर परिसरातील  उर्दू हायस्कूल समोरच बंद पडली. बंद पडलेल्या या बसला चिमुकल्या विद्यार्थ्यांनी धक्का देऊन सुरू करण्याची वेळ आली.  

गेल्या काही दिवसांपासून परिवहन महामंडळातील बसेसची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याचे चित्र समोर येत आहे. बसेसमध्ये अनेक तांत्रिक अडचणी देखील निर्माण होत आहेत. यामुळे प्रवाशांना अनेक वेळा त्रास सहन करावा लागतो. याचाच प्रत्यय आज धुळ्यामध्ये आलाय.  

धुळे बस स्थानकातून निघालेली एक बस काही तांत्रिक कारणामुळे बंद पडली. मात्र ही बस सुरू होत नसल्याने थेट प्रवाशांच्या मदतीने धक्का मारत ही बस सुरू करण्याची वेळ प्रवाशांवर आली. यात काही चिमुकल्यांचा देखील समावेश होता. हे चित्र पाहून नागरिकांमधून रोष व्यक्त होत होता. परिवहन महामंडळाच्या बसेसची दुरुस्ती करण्याची आवश्यकता असताना दुसरीकडे मात्र याकडे आगर प्रमुखासहस अधिकारी देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. 

धुळे जिल्ह्यातील बसेसच्या झालेल्या दुरावस्थेबाबत अनेक वेळा वृत्त प्रसारित करून देखील धुळे बस आगर प्रमुखांनी अद्यापही दखल घेतलेली नाही. यामुळे एकीकडे मोठ्या प्रमाणावर भाडे वाढ होत असताना दुसरीकडे परिवहन महामंडळाने प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन बसेसची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

बस बंद पडल्यानंतर त्या ठिकाणी धुळे आगारातील बसेसची दुरुस्ती करणारे कर्मचारी तात्काळ पोहोचणे अपेक्षित होते. परंतु, ते न पोहोचल्याने चिमुकल्यांवर बसला धक्का देण्याची वेळ आली. ज्या उर्दू शाळेसमोर ही बस बंद पडली त्याच उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने आणि बसमधील काही प्रवाशांच्या मदतीने बसला धक्का मारण्यात आला. मात्र, चिमुकल्यांकडून बसला धक्का देत असल्याचे चित्र पाहून यावेळी नागरिकांमधून रोष व्यक्त झाला. 

दरम्यान, बस बिघाडाच्या सततच्या घटनांमुळे विद्यार्थी आणि सतत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे महामंडळाने या बस दुरूस्त करून घ्याव्यात अशी मागणी नागरिसांकस विद्यार्थ्यांनी देखील केलीय. 

महत्वाच्या बातम्या 

बीडसह संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोघांना जन्मठेप, जिल्हा न्यायालयाचा निर्णय 

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget