धुळे : शहरात कोरोना विषाणूचे सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून एका जणाचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संक्रमण रोखण्यासाठी धुळे शहरात महानगरपालिकेच्या हद्दीत 23 एप्रिल मध्यरात्रीच्या बारा वाजेपासून ते 27 एप्रिलच्या मध्य रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन (संचारबंदी) लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी जारी केले आहेत. या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक गोष्टींची दुकाने ही सकाळी 8 ते दुपारी 2 या कालावधीत सुरु राहणार आहेत.


धुळे शहरातील किराणा दुकाने, भाजीपाला, फळ विक्रीची दुकाने ही सकाळी 8 ते दुपारी 2 या कालावधीत तर, दूध विक्रेत्यांसाठी पहाटे 5 ते दुपारी 12 आणि पेट्रोल पंप चालकांसाठी ही वेळ सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात आली आहे. ही संचारबंदी नागरिकांच्या हितासाठीच असून नागरिकांनी घाबरून न जाता संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केलं आहे. धुळे शहरात सहा, तर शिंदखेडा, साक्री तालुक्यात प्रत्येकी एक कोरोना विषाणूबाधित असे एकूण आठ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग पाहता नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावं म्हणून संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय या शासनाने घेतला आहे.


शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा, एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात होणार


जिल्ह्याच्या सीमाभागात कोरोनाचा शिरकाव
धुळे जिल्ह्याला लागू असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात तसेच मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा गावात कोरोना संसर्गाची लागण झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत. त्याचप्रमाणे धुळे शहरात सहा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी एक कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार एका व्यक्तीपासून अन्य व्यक्तीस होण्याची शक्यता असल्याने जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार धुळे महानगरपालिका क्षेत्रासाठी कोविड19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेले प्रतिबंधित क्षेत्र वगळून ही संचारबंदी लागू राहील.


उद्योगधंदे, शेती व्यवसाय वाचवण्यासाठी केंद्राच्या मदतीची आवश्यकता : रोहित पवार


संचारबंदीचं उल्लघन केल्यास कठोर कारवाई
या संचारबंदीतून सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा व त्या अनुषांगिक सेवा, औषधे विक्रीची दुकाने, किराणा दुकाने, दूध, भाजीपाला व फळ विक्री दुकाने, अतितातडीचे शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा व कायदा सुव्यवस्था हाताळणारी यंत्रणा, बँक यंत्रणा, महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा माहिती अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी, दूरध्वनी, इंटरनेट सेवा पुरविणारे अधिकारी वगळता अन्य सर्व व्यवहार हे दिलेल्या कालावधीत व अटीस अधीन राहून बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय योग्य ती कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असं जिल्हाधिकारी संजय यादव यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केलंय.


special story | बाळाला कुशीत घेण्यासाठी आई आतुर, आईची पहिल्यांदा डोळे उघडलेल्या लेकीशी व्हिडीओ कॉलद्वारे भेट