एक्स्प्लोर

Nanar : 'नाणार'चं पुनरुज्जीवन होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्र्यांचं सूतोवाच; संजय राऊत म्हणाले...

Dharmendra Pradhan On Nanar : स्थानिकांच्या विरोधामुळे रखडलेला नाणार रिफायनरी प्रकल्प पुनरुज्जीवनाच्या मार्गावर असल्याचं सूतोवाच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय.

Nanar Konkan Refinery Project : कोकणात स्थानिकांच्या विरोधामुळे रखडलेला नाणार रिफायनरी प्रकल्प पुनरुज्जीवनाच्या मार्गावर असल्याचं सूतोवाच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. नाणार प्रकल्पाबाबत महाराष्ट्र सरकारचं मनपरिवर्तन होत असल्याचं दिसत असल्याचं प्रधान यांनी म्हटलंय. दैनिक लोकसत्ताच्या मुंबईतील कार्यक्रमात प्रधान यांनी हे वक्तव्य केलंय. नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत लाखो कोटी रुपयांचं आणि रोजगाराचं योगदान देण्याची क्षमता आहे, असं प्रधान म्हणाले. 
 
धर्मेंद्र प्रधान यांच्या या वक्तव्याबाबत आज विचारलं असता नाणारच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, स्थानिकांचं मतपरिवर्तन झाल्याचं ऐकलं नाही. धर्मेंद्र प्रधान आता देशाचे शिक्षणमंत्री आहेत. त्यांनी त्याकडे लक्ष द्यावं, ते चांगले मंत्री आहेत, असं राऊत म्हणाले. 

काय म्हणाले धर्मेंद्र प्रधान...
धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्या सहकार्यानं कोकणच्या  किनारपट्टीवर 60 लाख टन क्षमतेचा नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचं नियोजन होते. मात्र दुर्दैवानं त्याला विरोध झाला. त्यात बहुमूल्य वेळ  वाया गेला आहे. पण आता महाराष्ट्र सरकारचे मतपरिवर्तन होत असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रकल्पाचा आकार कमी करून तो कोकणातच उभारण्याचा विचार सुरू आहे. देर आए लेकिन दुरुस्त आए या न्यायानं सरकारच्या मतपरिवर्तनाचं स्वागतच केलं पाहिजे.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे लाखो कोटी रुपये पुढील काही वर्षांत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत येतील. या प्रकल्पाशी निगडित पूरक उद्योग उभे राहतील आणि त्यातूनही मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल. देशालाही पेट्रोकेमिकल क्षेत्रातील या मोठ्या प्रकल्पामुळे ऊर्जा सुरक्षिततेचे ध्येय गाठण्यासाठी मदत होईल, असे धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी स्पष्ट केले.

  • LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

इतर संबंधित बातम्या

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: दुष्काळाचा फटका, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा संघर्ष
Maharashtra Live News Updates: दुष्काळाचा फटका, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा संघर्ष
Chandrashekhar Bawankule: शिक्षकांना कुणी धमकवलं तर थेट माझ्याकडे तक्रार करा, SIT चौकशी केली जाईल; चंद्रशेखर बावनकुळेंचा कडक शब्दात इशारा, म्हणाले, कोण कितीही मोठा असला तरी...
शिक्षकांना कुणी धमकवलं तर थेट माझ्याकडे तक्रार करा, एसआयटी चौकशी केली जाईल; चंद्रशेखर बावनकुळेंचा कडक शब्दात इशारा, म्हणाले, कोण कितीही मोठा असला तरी...
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाव दत्तक अभियान, मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलं अंतरवली सराटी गाव दत्तक 
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाव दत्तक अभियान, मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलं अंतरवली सराटी गाव दत्तक 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget