एक्स्प्लोर

चंद्रकांतदादा, तुमच्या 16 भ्रष्ट मंत्र्यांसाठीही जेलमध्ये जागा ठेवा : धनंजय मुंडे

"शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटमध्ये निर्णय घेतात आणि उद्धव ठाकरे राज्यभर विरोध करीत फिरतात, सत्तेचा मलिदा खाण्यासाठी शिवसेना लाचार असून 2019 पर्यंत 5 मंत्रिपदांची तुकडे चघळत राहा, नंतर जनता तुम्हालाही नीटनेटके करणार आहे"

सांगोला : भाजपच्या 16 भ्रष्ट मंत्र्यांसाठी देखील चंद्रकांत पाटील यांनी जेलमध्ये जागा बघून ठेवावी, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. सोलापुरातील सांगोला तालुक्यातील महूद येथे राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत ते बोलत होते. भुजबळांच्या शेजारी दोन कोठड्या ठेवल्या असल्याचा टोला भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून लगावला होता. त्यावरुन धनंजय मुंडेंनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. “आज मुंबईमध्ये स्थापना दिवसानिमित्त भाजप शक्तिप्रदर्शन करत आहे. मात्र त्यांनी त्यांचा स्थापना दिवस 6 एप्रिल ऐवजी 1 एप्रिल रोजी साजरा करायला हवा होता. खोटे बोलून सर्वांना ‘फूल’ बनवणारे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री असून आजवर जनतेला फसवणारे शक्तिप्रदर्शन करुन स्वतःचीच फसवणूक करुन घेत आहेत.” असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटमध्ये निर्णय घेतात आणि उद्धव ठाकरे राज्यभर विरोध करत फिरतात, सत्तेचा मलिदा खाण्यासाठी शिवसेना लाचार असून 2019 पर्यंत 5 मंत्रिपदांची तुकडे चघळत राहा, नंतर जनता तुम्हालाही नीटनेटके करणार आहे, अशा शब्दात धनंजय मुडेंनी शिवसेनेवर केली. मान्यवरांच्या स्वागतासाठी सर्व पदाधिकारी मोठी रॅलीने थांबले असताना, अजित पवार थेट कार्यक्रमस्थळी पोहोचले. कोणीच नेते नसल्याचे पाहून त्यांनी थेट भाषणाला सुरुवात केली. अजितदादांचे भाषण संपत असताना हल्लाबोल यात्रेतील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, चित्रा वाघ, विजयसिंह मोहिते पाटील कार्यक्रमस्थळी पोहोचले. आपल्या आधीच अजितदादा आल्याचे पाहून ही नेते मंडळी बावरुन गेली होती. पवारांच्या भाषणानंतर पुन्हा प्रस्तावनेपासून कार्यक्रमाला सुरुवात झाली. अजित पवार यांचे भाषण सुरु असताना स्टेजच्या शेजारुन होत असलेल्या गोंधळावर आधीच चिडलेले दादा भडकले आणि ‘ऐकायचे नसेल तर बाहेर जा’, अशा भाषेत गोंधळ करणाऱ्यांना समज दिली. मोदींच्या काळात उद्योगपतींनी शेकडो कोटी रुपयांना देशाला फसवल्याचे सांगत, एवढ्या पैशात तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असती, असे अजित पवार म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
Abdul Sattar: भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
Shekhar Gore Satara : ​
​"साहेब, मी नक्की कुठे चुकलो?" विधानपरिषदेची उमेदवारी हुकल्याने शेखर गोरेंची देवेंद्र फडणवीसांना भावनिक साद
Siddharth Jadhav on Ranveer Deepika Reception: 'बायकोला 10 व्या मिनिटांतच म्हणालो .. ' रणवीर-दीपिकाच्या रिसेप्शनमधून तातडीनं बाहेर पडला सिद्धार्थ जाधव; कारणही सांगितलं ..
'बायकोला 10 व्या मिनिटांतच म्हणालो .. ' रणवीर-दीपिकाच्या रिसेप्शनमधून तातडीनं बाहेर पडला सिद्धार्थ जाधव; कारणही सांगितलं ..
Embed widget