एक्स्प्लोर

दुर्दैवानं, पंकजा मुंडेंसोबत काही नातं राहिलं नाही: धनंजय मुंडे

मुंबई: 'पंकजा मुंडेंसोबत आता काही नातं राहिलेलं नाही. हे दुर्दैव आहे पण ही खरी गोष्ट आहे. राजकारण वेगळं आणि नातं वेगळं. राजकारणापलीकडं नातं राहावं या मताचा मी आहे.' असं मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'वर बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांची रोखठोक उत्तरं दिलं. 'राजकारण वेगळं आणि नातं वेगळं' 'पंकजा मुंडेंसोबत आता काही नातं राहिलेलं नाही. हे दुर्दैव आहे. नातं व्हावं निखळ असावं अशी माझी इच्छा आहे. राजकारण वेगळं आणि नातं वेगळं. राजकारणात नातं आणू नये आणि नात्यात राजकारण या मताचा मी आहे. भाजप मी सोडलं नव्हतं. तर आम्हाला बाजूला सारण्यात आलं. भगवानगडावरुन मुंडेसाहेब म्हणाले होते की, आजपासून माझं माझ्या भावाशी असलेलं नातं संपलं. त्यानंतर माझ्या वडिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. म्हणून आम्ही भाजप सोडली.' असं म्हणत धनंजय मुंडेंनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. 'चिक्की घोटाळा झाला यावर मी आजही ठाम' पंकजा मुंडेंना क्लीनचीट मिळलेली असली तरीही त्यांनी चिक्की घोटाळा केला यावर मी ठाम आहे. चिक्की घोटाळ्याचे मी सर्व पुरावे सभागृहात सादर केले आहेत. 22 हजारांचं बील असलेल्या कारखान्यात कोट्यवधीची चिक्की तयार होतेच कशी. असा सवालही त्यांनी उपस्थिती केला. 'मुंडे साहेबांची साथ सोडण्याची माझी इच्छा नव्हती' 'मुंडे साहेबांची साथ सोडण्याची माझी इच्छा नव्हती. भाजपमध्ये मी कार्यकर्ता म्हणून 10 वर्ष काम केलं होतं, त्यामुळे माझं नेतृत्व लादलेलं नाही.  पंकजा, प्रीतम मुंडे यांचं नेतृत्व लादलेलं आहे की नाही याबाबत मात्र, मी काहीही बोलणार नाही. विधानसभा निवडणुकीत माझा अवघ्या 20 हजार मतांनी पराभव झाला. याला मी काही पराभव मानत नाही.' असं धनंजय मुंडे म्हणाले. 'मला वाटलं नव्हतं की पक्ष पुन्हा माझ्यावर काही जबाबदारी सोपवेल' 'मी विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मला वाटलं नव्हतं की, पक्ष पुन्हा माझ्यावर काही जबाबदारी देईल. पण याआधी मी भाजपमध्ये विरोधी पक्षात काम केलं होतं. त्याचा मला अनुभव होता. त्यामुळेच माझ्यावर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सोपावण्यात आली.' असं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं. 'पुन्हा भाजपत जाण्याची इच्छा नाही' 'माझ्या काहीही आकांक्षा नाहीत. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण समर्थपणे पार पाडू. माझी पुन्हा भाजपत जाण्याची इच्छा नाही. मी जिथं आहे तिथं सुखी आहे. मोठ्या मनानं काम केलं तर नक्कीच फायदा होतो' असंही धनंजय मुंडे म्हणाले. 'भाजपशी कसलंही साटंलोटं नाही' जनतेच्या प्रश्नासंबंधी लढताना समोर कोण आहे हे कधी मनात आलं नाही यापुढेही येणार नाही. त्यामुळे भाजपशी काहीतरी साटंलोटं असल्याचे आरोप चुकीचे आहेत. भाजपशी कसलंही साटंलोटं नाही. माझा कट्टावरील महत्त्वाचे मुद्दे: भाजपने आमच्या नेत्यांवर केलेले आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत : धनंजय मुंडे मी विधानसभेच्या निवडणुकीत पडल्यानंतर मला वाटलं नव्हतं की, पक्ष माझ्यावर पुन्हा काही जबाबदारी देईल: धनंजय मुंडे आधी विरोधी पक्षातला काम करण्याचा अनुभव असल्यानं मला पद देण्यात आलं: धनंजय मुंडे जनतेच्या प्रश्नासंबंधी लढताना समोर कोण आहे हे कधी मनात आलं नाही यापुढेही येणार नाही: धनंजय मुंडे भुजबळसाहेब जेलमध्ये गेल्यानं नाशिक जिल्ह्यात थोडासा परिणाम झाला आहे. हे मान्य: धनंजय मुंडे मी स्वत: पक्ष सोडला नाही, मला पक्षानं बाजूला सारलं, त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो: धनंजय मुंडे भाजपमध्ये मी कार्यकर्ता म्हणून 10 वर्ष काम केलं होतं, त्यामुळे माझं नेतृत्व लादलेलं नाही: धनंजय मुंडे पंकजा, प्रीतम मुंडे यांचं नेतृत्व लादलेलं आहे की नाही याबाबत मी काहीही बोलणार नाही: धनंजय मुंडे विधानसभा निवडणुकीत माझा अवघ्या 20 हजार मतांनी पराभव झाला: धनंजय मुंडे मुंडे साहेबांची साथ सोडण्याची इच्छा नव्हती: धनंजय मुंडे पंकजांसोबत तसं काही नातं राहिलेले नाही, हे दुर्दैव आहे: धनंजय मुंडे नातं हे नातं राहिलंच पाहिजे, या मताचा मी आहे. राजकारण वेगळं आणि नातं वेगळं: धनंजय मुंडे भाजपमध्ये परत जाणार नाही, मी इथं खूश आहे: धनंजय मुंडे पंकजा मुंडेंना क्लीनचीट मिळलेली असली तरीही त्यांनी चिक्की घोटाळा केला यावर मी ठाम आहे: धनंजय मुंडे चिक्की घोटाळ्याचे सर्व पुरावे मी सभागृहात सादर केले आहेत: धनंजय मुंडे 22 हजारांचं बील असलेल्या कारखान्यात कोट्यवधीची चिक्की तयार होतेच कशी?: धनंजय मुंडे माझ्या काहीही आकांक्षा नाहीत. पक्ष जी जबाबदारी देणार ती पार पाडू: धनंजय मुंडे राजधर्म जिथं पाळायचा असतो तिथं नातं समोर येत नाही: धनंजय मुंडे भाजपशी कसलंही साटंलोटं नाही: धनंजय मुंडे मोठ्या मनानं काम केलं तर फायदा होतोच: धनंजय मुंडे मुंडे साहेबांनंतर मराठवाड्यात नेतृत्वाची पोकळी आहे: धनंजय मुंडे संबंधित बातम्या: पवारांच्या सल्ल्यानं संजय राऊत शकुनी मामाची भूमिका पार पाडतात- निलंगेकर

शिवसेना-भाजपचं भांडण सत्तेसाठी, दोघंही कौरवच: धनंजय मुंडे

कुठलीही गोष्ट मला वारसा हक्कानं मिळालेली नाही: धनंजय मुंडे

महादेव जानकर यांना बडतर्फ करा : धनंजय मुंडे

पंकजा खरं बोलल्या, हा घ्या पुरावा : धनंजय मुंडे

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget