एक्स्प्लोर
रामनवमी निमित्त साईंच्या चरणी 71 लाखांचे सुवर्णदान
गुरुस्थापन मंदिरासाठी 32 लाख 30 लाख रुपये किंमतीच्या 1133 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पादुका साईचरणी अर्पण करण्यात आल्या.
![रामनवमी निमित्त साईंच्या चरणी 71 लाखांचे सुवर्णदान Devotee donated more than 70 lacs rupees gold to Saibaba Temple in Shirdi रामनवमी निमित्त साईंच्या चरणी 71 लाखांचे सुवर्णदान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/25221707/Saibaba-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
शिर्डी : रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी हजेरी लावतात. रामनवमी उत्सवानिमित्त साईभक्तांनी साईंच्या चरणी जवळपास 71 लाखांचे सुवर्णदान अर्पण केले आहे.
गुरुस्थापन मंदिरासाठी 32 लाख 30 लाख रुपये किंमतीच्या 1133 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पादुका साईचरणी अर्पण करण्यात आल्या. या सुवर्ण पादुका आंध्र प्रदेशमधील नेल्लुगर येथील साईभक्त चन्ना रेड्डी यांनी दान केल्या आहेत.
रामनवमीच्या पार्शवभूमीवर साईबाबांवर सोन्याच्या दानाचा वर्षाव होत असून आज सकाळी साईबाबांच्या नियमित आरतीकरिता मुंबई येथील दानशूर साईभक्त जयंतभाई यांनी 39 लाख 1 हजार 688 रुपये किंमत असलेली 1351 ग्रॅम वजनाची सोन्याची पंचारती देणगी स्वरुपात दान केली.
आज दिवसभरात साईचरणी 71 लाखांचे सोन सुवर्णदान प्राप्त झालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
विश्व
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)