Devendra Fadnavis Majha Katta : एक दिवस मराठी माणूस नक्कीच दिल्लीच्या तख्तावर बसेल, पण कोण असेल....पाहा काय म्हणाले फडणवीस
एक दिवस नक्कीच मराठी माणूस दिल्लीच्या तख्तावर बसेल. कारण दिल्लीच्या तख्ताला सगळ्यात पहिले आव्हान मराठी माणसानेच दिले होते असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Devendra Fadnavis Majha Katta : दिल्लीच्या पदावर कधी ना कधी मराठी माणूस बसेलच, मराठी माणसाला कोण थांबवू शकते. एक दिवस नक्कीच मराठी माणूस दिल्लीच्या तख्तावर बसेल. कारण दिल्लीच्या तख्ताला सगळ्यात पहिले आव्हान मराठी माणसानेच दिले होते आणि दिल्लीचा तख्तही मराठी माणसानेच काबीज केला होता, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. मात्र, आता ती वेळ नाही. कारण आता आपल्या देशाला इतके चांगले पंतप्रधान मिळाले आहे की, ते देश बदलवत आहेत. आपल्या देशाला जगात गौरव मिळत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र देखील त्यांच्या पाठीशी उभा आहे. आपण 2014 आणि 2019 ला देखील बघितले असल्याचे फडणवीस म्हणाले.
एक दिवस मराठी माणूस दिल्लीच्या तख्तावर नक्की बसेल, पण तो कोण असेल ही त्यावेळची परिस्थिती ठरवेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जे दिल्लीच्या तख्ताचे स्वप्न बघत होते, अशा मराठी माणसाच्या पाठिशा महाराष्ट्र उभा राहिला नाही तो मोदींच्याच पाठिशीच उभा राहिला असल्याचे फडणवीस म्हणाले. जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत मला वाटत नाही की दुसऱ्या कोणाला संधी आहे. पण एक दिवस मराठी माणूस दिल्लीच्या तख्तावर बसेल असे ते म्हणाले. मला कोणत्याच पदाची महत्वकांक्षा नाही. ज्या दिवशी नगरसेवक झालो, त्यादिवशी असे वाटले की यापेक्षा मोठे काय असू शकतो. परत महापौर झालो, आमदार झालो असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री होईल असे कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते. मी फार समाधानी आहे. जे काही मिळाले ते भरपूर आहे. क्षमतेपेक्षा पक्षाने मला जास्त दिले असल्याचे फडणवीस म्हणाले. पक्ष जी जबाबदारी देऊल त्यामध्ये 100 टक्के द्यायचे असेच माझे काम असल्याचे फडणवीस म्हणाले.
एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बरेच राजकीय आणि आपल्या खासगी आयुष्यातील किस्से सांगितले आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन', असं म्हटलं होत. त्यांचं हे वाक्य महाराष्ट्रात खूपच गाजलं. त्यावर अनेक मीम्स देखील बनले. मात्र ते असे का म्हणाले होते, यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले आहेत की, ''मी पुन्हा येईन म्हटलं होत ते जनतेच्या विश्वासावर म्हटलं होत. जनतेने पुन्हा आणलं. पण त्यावेळी हे माहित नव्हतं, मी पुन्हा येईनमध्ये काही लोक मधेच खोडा घालू शकतात. पण हरकत नाही. मी पुन्हा येईन असं म्हटलं होत, पण कधी हे म्हटलं नव्हतं. मात्र येईन हे नक्की.
महत्त्वाच्या बातम्या: