एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, फडणवीसांचा टोला

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळं त्यांच्या पक्षाचा काय निर्णय आहे हे मला माहिती नाही. ते मेळावा घेणार की नाहीत याचीही मला कल्पना नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मेळावा घेणार का नाही याची देखील मला कल्पना नाही. पण गृहमंत्री म्हणून मी एवढच सांगू शकतो की, दसरा मेळाव्याबाबत जे नियमात असेल ते करु असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. एकनाथ शिंदे यांच्याकडून दसरा मेळावा हायजॉक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याबाबत फडणवीस यांनी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. तसेच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असा टोलाही फडणवीसांनी लगावला. 

देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर विमानतळावर त्याचे आगमन झाल्यावर प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. मात्र, जे नियमात असेल ते करु असे वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे. तसेच यावेळी फडणवीसांनी काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेसची स्थिती ही बुडत्या नावेसारखी झाली आहे. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. त्यासंदर्भात देखील फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी काँग्रेस म्हणजे बुडती नाव असल्याचे फडणवीस म्हणाले. अनेक लोक काँग्रेस सोडत आहेत. त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. मी त्यावर जास्त बोलणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि शिंदे  गटात जोरदार रस्सीखेच

दरम्यान, शिंदे गटाकडून शिवसेनेचा  'दसरा मेळावा' (Dasara Melava) हायजॅक करण्याच्या तयारी सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेकडून (BMC) मेळाव्याला परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेनं अर्ज दाखल केला असताना, महापालिकेनं मात्र हात आखडता घेतल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केला आणि शिवसेनेत उभी फूट पडली. एकापाठोपाठ एक आमदार, खासदार, नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर आमचीच खरी शिवसेना हा दावा शिंदे गटाकडून केला जाऊ लागला. राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठ्या बंडानं अख्खा महाराष्ट्र हादरला. शिंदे गटाकडून दिवसागणिक नवनवे दावे होऊ लागले. काहीच दिवसांत हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशातच आता शिवसनेसाठी महत्त्वाचा असलेला दसरा मेळावाच हिसकावण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याची माहिती मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Uddhav Thackeray: राम मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा; 5 जुलैला दादरमध्ये 'रामरक्षा' आंदोलन, उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात रणशिंग फुंकलं!
राम मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा; 5 जुलैला दादरमध्ये 'रामरक्षा' आंदोलन, उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात रणशिंग फुंकलं!
Uddhav Thackeray: राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Pune Crime News : बिश्नोई गँगने केलेल्या गोळीबार अन् खंडणी प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई; राजस्थानमधून एक जण ताब्यात
बिश्नोई गँगने केलेल्या गोळीबार अन् खंडणी प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई; राजस्थानमधून एक जण ताब्यात

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case: केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
Hind Al-Abbasi Viral News: सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
Kolhapur Rain Update: पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
Cristiano Ronaldo : डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
Maharashtra Rain: पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
Embed widget