एक्स्प्लोर

ज्यांना हिंदुत्ववाद हवा, ते सोबत येतील, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला इशारा

भाजप-शिवसेनेच्या युतीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, युतीवर बोललो नाही तर मीडिया माझ्या भाषणाला किंमत देणार नाही.भाजपा लाचार नाही, ज्यांना हिंदुत्ववाद हवा ते सोबत येतील, अथवा त्यांच्याशिवाय, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिला.

जालना : 'ज्यांना हिंदुत्ववाद हवा आहे, त्यांना सोबत घेऊन, ज्यांना नको, त्यांच्याशिवाय' असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला. जालन्यात झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी युतीबाबत शिवसेनेला इशारा देतानाच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवरही हल्लाबोल केला. युतीवर बोललो नाही, तर मीडिया माझ्या भाषणाला किंमत देणार नाही. भाजप लाचार नाही, ज्यांना हिंदुत्ववाद हवा आहे, ते सोबत येतील, ज्यांना नको, त्यांच्याशिवाय भाजप निवडणुका लढवेल. आता आपलं सैन्य तयार करुन लोकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. युती असली-नसली तरी तुम्ही कामाला लागा, असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना केलं. विकासकामांची माहिती या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या विकासकामांची माहिती दिली. कर्जमाफी, सिंचन, पीक विमा, उद्योग अशा अनेक क्षेत्रातील कामांचा पाढा त्यांनी वाचला. जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही, तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. लोकसभा निवडणुकीपूर्वीची आजची शेवटची बैठक, यानंतरची बैठक विजयानंतरची होईल, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचीही आठवण काढली. महागठबंधन केलं तरी भाजपला काही फरक पडत नाही नेतृत्वहीन विरोधक पंतप्रधान मोदींना रोखू शकणार नाहीत. भाजपला रोखण्यासाठी विरोधक एकत्र आले पण विरोधकांची ही महाआघाडी कुचकामी ठरेल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जे एकमेकांचे तोंड पाहत नव्हते, ते भाजपविरोधात एकमेकांसोबत युती करत आहेत. यांच्या पक्षांना नीती नाही, धोरण नाही, नियम नाही. पण नरेंद्र मोदींच्या भीतीपोटी हे लोक एकत्र आलेत. महागठबंधन केलं तरी भाजपला काही फरक पडत नाही, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तरी नगरपालिकेत पराभव नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निकालावरुनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला. राष्ट्रवादीने संघर्ष यात्रा की परिवर्तन यात्रा रायगडावरून सुरु केली आणि तिथल्या कर्जतमध्ये भाजपने त्यांना पराभूत केलं. गडचिरोलीच्या आरमोरी नगरपालिकेतही काँग्रेसला जनतेने जागा दाखवली. जनतेने त्यांना दिलेला हा प्रतिसाद आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तरी नगरपालिकेत त्यांचा पराभव झाला. त्यांचे मिळून जितके नगरसेवक निवडून आले, त्यापेक्षा जास्त नगरसेवक भाजपचे निवडून आले, असं फडणवीस म्हणाले. भारतमातेची सेवा करण्यासाठी मोदींना साथ द्या राफेल प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसच्या थोबाडीत मारली. पण सुधारेल ती काँग्रेस कसली? अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी काँग्रेसवर केली. जे मोदींसाठी हात वर करतील त्यांना निवडून आणू. सत्ता नाही, भारतमातेची सेवा करण्यासाठी मोदींना साथ द्या, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
दुष्काळ पाहण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या डोळ्यातच धूळफेक; रातोरात बसवली पर्जन्यमापक यंत्रणा? बीडच्या पाली गावातील धक्कादायक प्रकार
दुष्काळ पाहण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या डोळ्यातच धूळफेक; रातोरात बसवली पर्जन्यमापक यंत्रणा? बीडच्या पाली गावातील धक्कादायक प्रकार
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Embed widget