(Source: ECI/ABP News/ABP Majha)
यवतमाळमध्ये पावसामुळे 30 हजार हेक्टरवरील शेतीचं नुकसान
यवतमाळ जिल्ह्यातील 7 तालुक्यातील शेतीला पावसाचा मोठा बसला आहे. जवळपास 30 हजार हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाल्याची माहिती.
यवतमाळ : राज्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यवतमाळमध्ये गेल्या दोन-तीन दिवसात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. अनेक नद्या, छोटे नाले, ओढ्यांना पूर आला आहे. या पावसामुळे यवतमाळमध्ये पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
यवतमाळमध्ये मागील चार दिवसात 99.73 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पूरपरिस्थिती आता निवळली आहे आणि कृषी विभाग पंचनामे करीत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील 7 तालुक्यातील शेतीला पावसाचा मोठा बसला आहे. जवळपास 30 हजार हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. यवतमाळमधील दारव्हा तालुक्यातील खोपडी येथे पीक उघडे पडल्याने पऱ्हाटीची दयनीय अवस्था झाली आहे. तर महागाव तालुक्यातील वाकन, तिवरंगमध्येही पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतातील कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.
अनेक ठिकाणी वाहत्या पाण्यामुळे पीकं मुळासकट आडवे पडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतीच्या नुकसानीची सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.
यवतमाळमध्ये मागील चार दिवसात 99.73 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पूरपरिस्थिती आता निवळली आहे आणि कृषी विभाग पंचनामे करीत आहे.