Narayan Rane : "राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही तर फक्त बेबंदशाही चालली आहे. सत्तेत आहेत तेच धिंगाणा घालत आहेत. पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येवून सूड उगवण्याचं काम करत आहेत. राज्यात खून होत आहेत,  दरोडे पडत आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले जात नाहीत. त्यामुळे अशा काळात राज्यात राष्ट्रपती राजवट येणं गरजेचं आहे, असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी आलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यावरूनही नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेवर कडाडून टीका केली. "या देशात लोकशाही आहे, कोणी हनुमान चालिसा पठण करण्यासाठी येत असेल विरोध का? याबरोबरच एका व्यक्तीला एक कायदा आणि दूसऱ्याला दूसरा कायदा का? असा प्रश्न यावेळी नारायण राणे यांनी उपस्थित केला. 


नारायण राणे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांचा कोणावरही अंकूश नाही. नवनीत राणा या खासदार आहेत तर रवी राणा हे आमदार आहेत. मुख्यमंत्री सक्षम आहेत का? त्यांना राज्याचे प्रश्न माहित नाहीत. त्यांचं शेवटचं भाषण अंतिम आठवडा प्रस्तावावार झालं. पण हे भाषण कलानगरच्या नाक्यावरच्या भाषणासारखं होतं. त्यांनी महाराष्ट्राला दहा वर्ष मागे नेले आहे. 89 हजार कोटी तूट असून राज्याची व्यवस्था पूर्ण बिघडली आहे."


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवले नाहित तर मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करू असे म्हटले होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानाबाहेर येऊन हनुमान चालिसाचे पठण करणार असे आव्हान दिले होते. त्यानुसार राणा दाम्पत्य शुक्रवारी मुंबईत आले. परंतु, शिवसैनिकांनी यावेळी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर राणा दाम्पत्याने आपला निर्णय मागे घेतला. त्यानंतर या दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. खार पोलिसांनी काल त्यांना अटक केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेले होते. परंतु, शिवसैनिकांनी यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यामुळे राज्यातील वातावरण सध्या चांगलच तापलं आहे. हाच मुद्दा पकडून नारायण राणे यांनी राष्ट्रपती राजवट लागू व्हावी अशी मागणी केली आहे.   


 


महत्वाच्या बातम्या


Chandrakant Khaire  : किरीट सोमय्या म्हणजे शक्ती कपूर ; चंद्रकांत खैरेंचा हल्लाबोल  


Kirit Somaiya PC : माझ्यावर झालेला हल्ला ठाकरे सरकारकडून स्पॉन्सर्ड : किरीट सोमय्या


Kirit Somaiya : मुंबईत राडा सुरूच, शिवसैनिकांच्या हल्ल्यामध्ये किरीट सोमय्या जखमी