Unseasonal Rain in Hingoli : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. हिंगोली जिल्ह्यातील नांदापूर येथील शेतकरी भूषण देशमुख यांच्या अडीच एकर शेत जमिनीवर लावलेल्या आंब्याच्या बागेचे रात्री झालेल्या पावसाने आणि वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वारे आणि पावसामुळे आंबे जमिनीवर पडले आहेत.


दरम्यान, यावर्षी आंब्याचा बहर थोडा उशीर आणि कमी लागला आहे. त्यात रात्री झालेल्या वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणावर झाडाची फळे तुटून जमिनीवर पडली आहेत. तुटलेल्या फळांना आता कवडीमोलानेसुद्धा कोणी खरेदी करत नाही. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आंब्याचा झाडाची 60 ते 70 टक्के फळे तुटून पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करावे आणि मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांची केली आहे.


माझी 13 वर्ष जूनी केशर आंब्याची बाग आहे. दोन वर्ष कोरोनाचे बाग कमी प्रमाणात फुटली होती. त्यामध्ये दरही कमी मिळाला होता. आता यावर्षीही आंबे कमी प्रमाणात आले पण दर चांगला मिळेल अशी अपेक्षा होती. परंतू काल आलेल्या आस्मानी संकटाने 70 ते 80 टक्के आंबा बागांचे नुकसान झाल्याचे शेतकरी भूषण देशमुख यांनी सांगितले. पूर्ण वर्षभराचे नियोजन या दोन महिन्यावर अवलंबून असते. पण अवकाळी पावसाने शेतीचे नियोजन कोलमडल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्याने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. 


राज्यातील सांगली, सोलापूर, मराठवाड्याचा काही भाग तसेच विदर्भातही काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात देखील अवकाळी पावसाने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
सांगलीमध्ये पावसासोबत जोरदार वारा सुटल्याने रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: