मुंबई : पहिल्या लाटेच्या तुलनेत महाराष्ट्रात होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ऑक्सिजन सिलेंडर घरच्या घरी मागवले जात आहेत. त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरची मागणी सुद्धा हळूहळू वाढत आहे. नाशिक शहरामध्ये महिन्याला साडेतीन हजार वैद्यकीय ऑक्स्जन सिलेंडरची गरज होती. रूग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्यानं हे प्रमाण 25 हजारापर्यंत पोहोचले आहे. संपूर्ण राज्यामध्ये अजूनही अशीच स्थिती आहे. 


एका सिलेंडरमध्ये सात किलो ॲक्स्जन असतो. आयसीयूमध्ये मिनिटाला चार ते आठ लिटर ॲक्स्जन रुग्णाला दिला जातो. मात्र कोरोना रुग्णाला 40 ते 80 लिटर ऑक्सिजनची आवश्यकता असते. सध्या अनेक रुग्ण घरी ऑक्सीजन सिलेंडर घेऊन जात आहेत. गेल्या वर्षी जून-जुलै महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यानंतर राज्यभरात ऑक्सीजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. मागणी अधिक उत्पादन कमी अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यातच उद्योगांनाही मुबलक ऑक्सिजनची गरज असल्यानं रुग्ण आणि उद्योग अशा दोन्ही पातळ्यांवर ऑक्सिजन उत्पादनाची कसरत करावी लागली होती. 


होम आयसोलेशन वाढले..
दुसरीकडे या वेळेला होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. लातूर शहरांमध्ये 28 हजार कोरोना बाधितवर उपचार केला जाऊ शकतो. परंतु बहुतांश रुग्ण हे होम आयसोलेशन मध्ये राहत असल्यामुळे लातूर शहरांमध्ये ज्यांच्या वरती उपचार सुरू आहेत अशा रुग्णांची संख्या अवघी 200 आहे. राज्यात 40 टक्के बाधित रूग्ण घरी उपचार घेत आहेत. 


दुसरीकडे औरंगाबाद शहरातील परिस्थिती मात्र बिकट होता दिसते आहे. औरंगाबाद शहरातील कोरोना रुग्णसंख्याचा आकडा दररोज हजारी पार करणारा आणि उपलब्ध खाटा फार फार तर शंभर. औरंगाबाद शहरात 13 गंभीर रुग्णावर उपचार करणारी रुग्णालये आहेत. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 637 खाटा असून त्याच्या 534 घाटावर रुग्ण आहेत. व्हेंटिलेटरची सुविधा असणारे आणि प्राणवायू सुविधा असणाऱ्या 72 खाटा रिकाम्या आहेत. मात्र अन्य बारा खाजगी रुग्णालयांमध्ये केवळ नऊ खाटा शिल्लक आहेत.


सावधान आर फॅक्टर वाढतोय...
देशात कोरोनाचा आर फॅक्टर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आर फॅक्टर म्हणजे विषाणूचे पुनरुत्पादन. ज्या योगे कुठलीही संक्रमित व्यक्ती अन्य काही रुग्णांमध्ये प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरते. विशेष म्हणजे कोरोनाचा हा आर फॅक्टर महाराष्ट्रात आणि केरळ पंजाब सर्वाधिक वाढलेला आहे. या दोन्ही राज्यात एका कोरोना बाधिताकडून पाच जणांना प्रादुर्भाव होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष साथ रोग विशेषज्ञ कडून काढण्यात आला आहे. त्यामुळेच देशात अचानक वाढलेल्या रुग्णसंख्याने येणाऱ्या दिवसांसाठी संकटाचे संकेत दिलेत. शनिवारी देशात 43 हजार 815 नवे रुग्ण आढळले तत्पूर्वी 115 दिवसांत ही सर्वाधिक दैनंदिन रुग्ण वाढ संख्या होती महाराष्ट्र, पंजाब तसेच केरळमध्ये कोरोनाचा आर फॅक्टर पाच पर्यंत पोहोचला आहे असा आमचा प्राथमिक निष्कर्ष असल्याची माहिती प्राध्यापक नरेंद्र अरोरा चेअरमन ऑपरेशन अंड रिसर्च ग्रुप कोरोना टास्क फोर्स आयसीएमआर यांनी दिली आहे. 


नवी रूग्ण वाढीचा वेग अफाट...
संपूर्ण राज्यात गेल्या एका महिन्यात दिनांक 20 फेब्रुवारी 23 मार्च तब्बल साडेतीन लाख नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 66 हजार रुग्ण हे एकट्या पुणे जिल्ह्यातील आहेत. एका महिन्यातील रुग्णांची ही वाढ चिंताजनक आहे. रुग्ण बरे होण्याचा दर घटला आहे. राज्यात महिन्यापूर्वी रुग्ण बरा होण्याचा दर 95 टक्के होता. मात्र महिन्याभरात साडेतीन लाख नवीन रुग्ण आढळल्याने आता रुग्ण बरे होण्याचा दर 89 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. राज्यात पुण्यात सर्वाधिक चार लाख 64 हजार, मुंबईत तीन लाख 58 हजार, ठाण्यात तीन लाख तीन हजार, नागपुरात एक लाख 92 हजार आणि नाशिक मध्ये एक लाख 47 हजार रुग्ण आढळून आले आहेत. हे महाराष्ट्रातील टॉप फाइव्ह जिल्हे आहेत. 


सोलापूर पुन्हा वेगात...मराठवाडाही पुढे..
सोलापुरातील परिस्थिती मात्र हळूहळू गंभीर होताना दिसते आहे. सोलापूरचे सिव्हिल सर्जन एस एल व्ही प्रसाद यांच्या मते, गेल्या आठवडाभराच्या आधी ते रोज तीन रुग्णांना तपासत होते. त्यांच्यावर उपचार करत होते. आता ही संख्या दीडशे पार पोहोचले आहे सिलेंडरची ऑक्सिजन सिलेंडरची मागणी सुद्धा वाढली आहे. मृत्युदर सुद्धा अधिक आहे. त्यामुळे परिस्थिती कधीही गंभीर होऊ शकते. मराठवाड्यात कोरोना रुग्णांची चार हजाराचा टप्पा ओलांडला आहे. चार दिवसापूर्वी तीन हजारांच्या संख्येत असणारे मराठवाड्यातले रुग्ण आता चार हजारावर पोहोचले आहेत. औरंगाबाद मध्ये 1406 जालन्यामध्ये 562 परभणी मध्ये 315 नांदेडमध्ये 1291 हिंगोली मध्ये 91 बीडमध्ये 239 लातूर मध्ये 240 आणि उस्मानाबाद मध्ये 173 उघडा वरती सध्या उपचार सुरू आहेत. राज्यात 53 हजार तीनशे 99 लोकांचा बळी गेला आहे. आज घडीला राज्यामध्ये दोन लाख दहा हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


डॉ. फेरोज सय्यद,चेस्ट फिजिशियन आणि डॉ. एच. बी. प्रसाद, औषधशास्त्र विभागप्रमुख यांनी या विषयावर आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या मते, मागील लाटेत आणि यंदाच्या लाटेत कोरोना रुग्णामध्ये जास्त फरक नाही. यंदाच्या लाटेत रुग्ण लवकर हॉस्पिटलमध्ये येत नाही येत त्यामुळे रुग्णांचं सिरीयस होण्याचं प्रमाण जास्त आहे. ऑक्सिजनला मागील वेळेस देखील जितकी मागणी होती यंदाही तितकीच मागणी आहे. रुग्णांमध्ये होम आयसोलेशनची मागणी जास्त आहे, मात्र यंदा कोरोना अधिक वेगाने पसरत असल्या कारणाने होम आयसोलेशन करणे सुरक्षित नाही.


महत्वाच्या बातम्या :