एक्स्प्लोर
Advertisement
मालवणच्या समुद्रकिनारी तब्बल 30 फूट लांबीचा देवमासा मृतावस्थेत
सिंधुदुर्गमधील मालवण समुद्रकिनारी आज (शनिवार) सकाळी भला मोठा देवमासा मृतावस्थेत आढळून आला.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधील मालवण समुद्रकिनारी आज (शनिवार) सकाळी भला मोठा देवमासा मृतावस्थेत आढळून आला. तब्बल ३० फुटांचा हा देवमासा असल्याची माहिती समजते आहे.
प्रचंड भलामोठा देवमासा किनाऱ्यावर आल्यानंतर स्थानिक मच्छिमारांनी या माशाची पाहणी केली. त्यावेळी हा मासा दोन ते तीन दिवसांपूर्वीच मृत झाल्याचं समजलं.
सध्या या माशाला प्रचंड दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांनी याची माहिती प्रशासनाला कळवली आहे. दरम्यान, या माशाची विल्हेवाट कशा पद्धतीने करता येईल यासाठी प्रशासनाकडून सध्या चर्चा सुरु आहे. या माशाची दुर्गंधी तब्बल एक ते दीड किमीच्या परिसरात पसरली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
हा देवमासा तब्बल 30 फूट लांबीचा आहे. त्यामुळे आता या माशाची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्याचं मोठं आव्हान स्थानिक प्रशासनासमोर आहे.
दरम्यान, या प्रचंड मोठ्या देवमाशाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत नेमकी माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
आयपीएल
टेलिव्हिजन
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets