एक्स्प्लोर

Datta Jayanti 2021 : राज्यभर श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष! दत्तजयंतीनिमित्त नरसोबाची वाडी, अक्कलकोटसह प्रमुख मंदिरात गर्दी

Datta Jayanti 2021 : राज्यभर दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. नरसोबाची वाडी, अक्कलकोटसह राज्यातील प्रमुख दत्त मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

Datta Jayanti 2021 : राज्यभर दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. नरसोबाची वाडी, (Narsobachi Wad)अक्कलकोटसह (Akkalkot ) राज्यातील प्रमुख दत्त मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. दत्त जयंतीनिमित्त सर्व मंदिरांना आकर्षक रोषणाई करण्यात आलीय. गेल्या वर्षी दत्त जयंतीवर कोरोनाचं सावट होतं. मात्र यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानं दत्त जयंती उत्साहात साजरी होताना दिसून येत आहे. 

श्री दत्त जयंती निमित्त अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी देखील भाविकांची मोठी गर्दी असते. संध्याकाळी सहा वाजता अक्कलकोटच्या स्वामी समर्थ (swami samarth)मंदिरात दत्तजन्म सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी केवळ महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक, आंध्र, तेलंगाना इत्यादी राज्यातून देखील भाविक मोठ्या प्रमाणात अक्कलकोट येथे येत असतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. 

भाविकांची गर्दी पाहता वाहतूककोंडीची समस्या होऊ नये म्हणून ठीक ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्स राखून टप्याटप्प्यांमध्ये भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जातोय. श्री दत्ताचा अवतार समजल्या जाणाऱ्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अगदी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या शिंगवे येथील एकमुखी दत्त जयंती यात्रा असते. कोरोनामुळे यात्रा रद्द झाली असली तरी दर्शनाला मात्र सुरू ठेवण्यात आले आहे. तीन दिवस ही यात्रा सुरू असते.

शिर्डीमध्येही दत्तजयंती व सलग सुट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी झाली आहे. सकाळपासून शिर्डीत भाविकांची मांदियाळी आहे. अनेक पायी पालख्या दत्त जयंती निमित्त शिर्डीत दाखल झाल्या आहेत. साईनामाच्या जयघोषाने शिर्डी नगरी दुमदुमली आहे. दत्त जयंतीच्या निमित्तानं मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

इतर महत्त्वाच्या बातम्या :

 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
Vidhan Parishad Election 2026: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा कसा सुटला, तिन्ही पक्षांच्या विविध जागांवर दावा असताना मार्ग निघाला, इनसाईड स्टोरी
महायुतीचा जागा वाटपाचा तिढा कसा सुटला, तिन्ही पक्षांच्या विविध जागांवर दावा असताना मार्ग निघाला, इनसाईड स्टोरी
Yavatmal News : केंद्रीय महामंडळावर नियुक्तीसाठी तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी; भाजप समन्वयकाची आर्थिक फसवणूक, यवतमाळमध्ये तिघांवर गुन्हा दाखल
केंद्रीय महामंडळावर नियुक्तीसाठी तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी; भाजप समन्वयकाची आर्थिक फसवणूक, यवतमाळमध्ये तिघांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; अहिल्यानगरमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; अहिल्यानगरमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahendra Singh Dhoni: धोनी 3 कोटींच्या कारमधून लेकीच्या अॅडमिशनसाठी मसुरीला पोहोचला; फोटोसाठी पोझ देत चाहत्यांशी शेकहँड
धोनी 3 कोटींच्या कारमधून लेकीच्या अॅडमिशनसाठी मसुरीला पोहोचला; फोटोसाठी पोझ देत चाहत्यांशी शेकहँड
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
Solapur : दळणाच्या जात्याचा दगड डोक्यात घातला, मोठ्या भावाला झोपेत असताना संपवलं; दारुच्या नादात सगळंच संपलं, सोलापुरातील घटना
दळणाच्या जात्याचा दगड डोक्यात घातला, मोठ्या भावाला झोपेत असताना संपवलं; दारुच्या नादात सगळंच संपलं, सोलापुरातील घटना
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांच्या लॉटरीसाठी किती अर्ज आले? अनामत रक्कम किती जणांनी भरली? आकडेवारी समोर
म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांच्या लॉटरीसाठी किती अर्ज आले? अनामत रक्कम किती जणांनी भरली? आकडेवारी समोर
Rule Change: LPG ते पेट्रोल-डिझेलपर्यंत... उद्यापासून देशात बदलणार 'हे' पाच मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
LPG ते पेट्रोल-डिझेलपर्यंत... उद्यापासून देशात बदलणार 'हे' पाच मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
Impact Player नियम काढा, एका गोलंदाजाला 5 ओव्हर द्या...; सचिन तेंडुलकरने IPL साठी सुचवले 3 नवीन नियम!
Impact Player नियम काढा, एका गोलंदाजाला 5 ओव्हर द्या...; सचिन तेंडुलकरने IPL साठी सुचवले 3 नवीन नियम!
RCB vs GT IPL 2026 Final Rain Update : गुजरातमध्ये तुफान पाऊस, हवामान खात्याकडून यलो अलर्ट; IPL च्या फायनलआधी क्रिकेटप्रेमींना धडकी भरवणारी अपडेट, सामना रद्द झाल तर...
गुजरातमध्ये तुफान पाऊस, हवामान खात्याकडून यलो अलर्ट; IPL च्या फायनलआधी क्रिकेटप्रेमींना धडकी भरवणारी अपडेट, सामना रद्द झाल तर...
Kalyan Banerjee Attack Allegation: कल्याण बॅनर्जींच्या हल्ल्याच्या दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा फक्त आणि फक्त ड्रामा...'
कल्याण बॅनर्जींच्या हल्ल्याच्या दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा फक्त आणि फक्त ड्रामा...'
Embed widget