एक्स्प्लोर

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षिकेची व्यथा, चक्रीवादळात पत्रे उडून गेल्याने उघड्यावर राहण्याची वेळ

सुमन लक्ष्मण रणदिवे (87 वर्ष) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे बंधु राज ठाकरे यांच्यासहित मुंबई आणि आसपासच्या परिसरातील अनेक बड्या राजकीय नेत्यांना शिक्षणाचे धडे दिले आहेत.

वसई : तोक्ते चक्रीवादळाने अनेकांचं बरंच काही हिरावून घेतलं आहे. वसई-विरार परिसरात या वादळाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. फळबागा, शेती, मत्सप्रमाणे अनेकांच्या घरांचं देखील नुकसान झालं आहे. तर तिकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिकविणाऱ्या शिक्षिका यांनादेखील या वादळाचा फटका बसला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ज्या शिक्षिकेने घडवलं, राज ठाकरे यांना जीने  शिकवलं अशा शिक्षिका वसईतील एका वृद्धाश्रमात सध्या तुटलेल्या पत्राचा आधार घेऊन दिवस काढत आहेत.

सुमन लक्ष्मण रणदिवे (87 वर्ष) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे बंधु राज ठाकरे यांच्यासहित मुंबई आणि आसपासच्या परिसरातील अनेक बड्या राजकीय नेत्यांना शिक्षणाचे धडे दिले आहेत. सुमन लक्ष्मण रणदिवे या दादरच्या शिवाजी पार्क येथील बालमोहन विद्यामंदिर शाळेत शिक्षिका होत्या. मात्र पतीच्या मृत्यूनंतर तसेच मुलगाही नियतीने हिरावून घेतल्याने सध्या त्या वसईतील सत्पाळा गावातील “न्यू लाईफ केअर” या वृद्धाश्रमात वास्तव करत आहेत.

सोमवारी आलेल्या तोक्ते चक्रीवादळात या वृद्धाश्रमाचे सर्व पत्रे उडाले आहेत. सुमन यांच्यासारखे तब्बल 29 वृद्ध येथे राहतात. अचानक वादळ आले, त्यामुळे त्यांना काहीही हालचाल करायला वेळ देखील मिळाला नाही. सर्व वयोवृद्ध नागरिकांचे कपडे, जवळील सामान, बिछाने, त्यांची कागदपत्र सर्व या पावसात भिजलं आहे. सर्व पत्रे तुटल्याने थेट उंच आकाशाकडे पाहत त्यांना दिवस काढावे लागत आहेत. वादळ थांबून नऊ दिवस झाले आहे, मात्र या आश्रमात अद्याप पत्रे लागले नाहीत. जवळपास आठ ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचं आश्रमाच्या संचालकांनी सांगितलं आहे.

चक्रिवादळाने झालेल्या नुकसानीमुळे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेसेजही केला आहे. “उद्धव बेटा, मला तुला भेटायच आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असताना मी तुला शिकवत होते. इथली परिस्थिती खुप खराब झाली आहे. कृपया आम्हाला मदत कर..” 1991 साली रणदिवे टिचर निवृत्त झाल्या. त्यानंतर 2014 साली त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे आता हे वृद्धाश्रमच रणदिवे यांच्यासोबतच इतर अनेक वृद्ध नागरिकांचं आश्रयस्थान आहे.

आयुष्यातील शेवटच्या घटकेला यातना कमी व्हाव्यात म्हणून आधारासाठी वृद्धाश्रमात आले आहेत. मात्र इथे देखील त्यांच्या यातना कमी होताना दिसून येत नाहीत. त्यांना आर्थिक मदत नको मात्र वस्तू, सामानाची मदत केली तरी हे आश्रम उभारी घेण्यासाठी पुन्हा तयार होईल. त्यामुळे आशा आहे की या आश्रमासाठी लवकर मदत मिळेल.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा
कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget