एक्स्प्लोर

Video: पहिली नव्हे, तिसरीपासून हिंदी भाषेची पुस्तके; दादा भुसेंनी सांगितला शिक्षण धोरणातला मुद्दा

राज ठाकरे यांची आम्ही भेट घेतली, 1967 पासून प्रवास आणि निर्णय आम्ही त्यांना सांगितले, सर्व बाबी आम्ही त्यांच्या समोर ठेवल्या आहेत, वस्तुस्थिती त्यांच्या समोर ठेवली आहे.

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सुत्रीवरुन सुरू असलेल्या वादासंदर्भात शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada bhuse) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांना सरकारची भूमिका समाजावून सांगितली. मात्र, आपल्याला सरकारची भूमिका मान्य नाही, शाळेत (School) पहिलीपासून तिसरी भाषा देण्यास आमचा विरोध असल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केले. त्यानंतर, आता दादा भुसेंनी पत्रकार परिषद घेत सरकारची बाजू पालक व जनतेपुढे मांडली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, अनेक बाबींचे अभ्यासपूर्ण धोरण ठेवण्यात आले आहे. एखादी तिसरी भाषा (Marathi) बंधनकारक म्हणून सरकारने निर्णय घेतलेला नाही, पालकांना जे योग्य वाटेल ते करायचे आहे. शैक्षणिक धोरणात काही बाबी या राज्य सरकारवर ठेवल्या आहेत, साधारण 2 ते 8 वयात मुले भाषा लवकर शिकतात, हे वैज्ञानिकांच मत आहे.

राज ठाकरे यांची आम्ही भेट घेतली, 1967 पासून प्रवास आणि निर्णय आम्ही त्यांना सांगितले, सर्व बाबी आम्ही त्यांच्या समोर ठेवल्या आहेत, वस्तुस्थिती त्यांच्या समोर ठेवली आहे. सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक आहे, यापूर्वीच करण्यात आले आहे, मराठी आपली मातृभाषा, राज्यभाषा आहे. केंद्राने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, प्रत्येक भाषेचे महत्व असते. आपण कोणाला कमी लेखत नाही, मराठी भाषेचे महत्त्व किंचितही कमी होऊ शकणार नाही, असे दादा भुसे यांनी म्हटलं.   

पहिली आणि दुसरीमध्ये कोणतेही पुस्तक नसेल, त्यांना भाषेची परीक्षा द्यावी लागणार नाही, तिसरीपासून त्यांना औपचारिकपणे तिसरी भाषा शिकवली जाईल, असे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. लहान वयात चित्र दाखवून मौखिक शिक्षण भाषेचे दिले जाते. इयत्ता 1 आणि 2 साठी मौखिक शिक्षण देतील. पुस्तके शिक्षकांसाठी असतील. राष्ट्रीय शिक्षण धोरणात लिहिल्याप्रमाणे 3 ऱ्या इयत्तेपासून मुलांचे तिसऱ्या भाषेबाबत लेखन शिक्षण होणार आहे. मध्यप्रदेश, सिक्कीम अशा राज्यात तिसरीपासून त्रिभाषा सूत्र आहे, आपल्याकडे देखील आनंददायी मौखिक शिक्षण दिले जाणार आहे, असे दादा भुसे यांनी सांगितले. मराठी भाषेच्या शाळेत पाचवीपासून हिंदी शिकवली जाते आहे, आता टप्प्याने पहिलीपासून इंग्रजी शिकवली जात आहे. जी पुस्तके आहेत ती आधीपासून बाजारात आलेली आहेत, नवीन निर्णयानुसार नवीन पुस्तके आली नाहीत, असेही त्यांनी सांगितले. 

राज्यातील 1 लाख 8 हजार 757 शाळा

भारतीय 20 ते 22 भाषा आहेत, त्यापैकी विद्यार्थी हवी ती भाषा निवडू शकतील. पण, 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सांगितले तरच शिक्षक ती भाषा शिकवतील. अन्य मुलांना इ-प्रणालीचा वापर करून आम्ही शिक्षण देऊ. महाराष्ट्रात गेल्या 30-40 वर्षापासून वेगवेगळ्या भाषेच्या शाळा सुरू आहेत. राज्यात 1,08 757 शाळांची संख्या आहे, 2 कोटी 11 लाख 79 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आहे. मराठी भाषेच्या शाळा 85 हजारांपेक्षा जास्त तर 1 कोटी 47 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आहे. 15 हजारांपेक्षा जास्त इंग्रजी शाळा आहेत, अशी माहितीही दादा भुसेंनी दिली. 

मुंबईत 4085 शाळा आहेत

मुंबईत 4085 शाळा असून 930 मराठी शाळा, 2121 इंग्रजी, 474 हिंदी शाळा आणि गुजराती 105 शाळा आहेत. 

20 ते 25 टक्के विद्यार्थ्यांना त्रिभाषा सुत्रानुसार आधीच शिक्षण

दरम्यान, इतर माध्यमाच्या शाळेत आधीपासून तीन भाषा आहेत, मराठी सक्ती केल्यापासून, याचा अर्थ असा की, त्रिभाषा सूत्रापासून गेल्या काही वर्षात 20 ते 25 टक्के विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. तिसऱ्या भाषेबाबत 20 ते 22 भाषांपैकी पालक आणि मुले जी भाषा  निवडणार त्यासाठी साप्ताहिक 5 तासिका निश्चित केल्या आहेत, अशी माहितीही भुसेंनी दिली. 

हेही वाचा

राजकीय पदाधिकाऱ्यांवर कारवाई करताना पुणे पोलीस कच खातात; महिला पोलिसाचा विनयभंग, तरीही अटक नाही

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

Embed widget