एक्स्प्लोर

2023 मध्ये काय काय चांगलं घडणार, पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितल्या महत्वाच्या गोष्टी

New Year's Eve: 2023 मध्ये तब्बल 8 महिने लग्नाचे मुहूर्त आहेत.  यावर्षी गणेश चतुर्थीला ‘ अंगारक योग ‘ आलेला आहे. त्याशिवाय 2023 मध्ये ब्लूमून आणि सूपरमूनसह चंद्रगृहण आणि सुर्यगृहण असणार आहे.

Da Kru Soman: आज जगभरात 2022 वर्षाला निरोप दिला जातोय.  नवीन वर्षात अनेकजण नवे संकल्प करतात..   तर काहींना नव्या वर्षात काय काय घडणार आहे..याची उत्सुकता असते. खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी 2023 मध्ये काय काय घडणार...याबाबत सांगितलं आहे. 2023 मध्ये तब्बल 8 महिने लग्नाचे मुहूर्त आहेत.  यावर्षी गणेश चतुर्थीला ‘ अंगारक योग ‘ आलेला आहे. त्याशिवाय 2023 मध्ये ब्लूमून आणि सूपरमूनसह चंद्रगृहण आणि सुर्यगृहण असणार आहे. पाहूयात काय सांगितलेय खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी..

(1१) यावर्षी सन 2022 मध्ये 31 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता लीप सेकंद पाळला जाणार नाही. त्यामुळे शनिवार 31  डिसेंबर 2022 च्या  मध्यरात्री ठीक 12 वाजता नूतन वर्ष 2023 चा प्रारंभ होणार आहे.

(२)  सन 2023 हे लीपवर्ष नसल्याने  फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस आहेत. त्यामुळे संपूर्ण  वर्षाचे दिवस 365 असणार  आहेत.

(३) सन 2023 मध्ये चाकरमान्यांसाठी सुट्ट्यांची चंगळ असणार आहे. कारण 24 पैकी तीन सुट्ट्या शनिवारी आणि दोन  सुट्ट्या रविवारी येणार आहेत. महाशिवरात्र 18 फेब्रुवारी, रमझान ईद  22 एप्रिल आणि मोहरम 29 जुलै हे दिवस   शनिवारी आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी आणि दिवाळी लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबर      हे दिवस रविवारी येणार आहेत.

(४) सन 2023 मध्ये 18 जुलै ते 16 ॲागस्ट 2023 अधिक श्रावण महिना येणार आहे. त्यामुळे नागपंचमी पासून सर्व सण साधारण 19 दिवस उशीरा येणार आहेत.

(५) विवाहेच्छुकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे जुलै, ॲागस्ट, सप्टेंबर, ॲाक्टोबर हे चार महिने वगळता इतर आठ महिन्यात विवाह मुहूर्त देण्यात आले आहेत.

(६) गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सन 2023 मध्ये श्रीगणेश चतुर्थी मंगळवार 19 सप्टेंबरला आली असल्याने यावर्षी गणेश चतुर्थीला ‘ अंगारक योग ‘ आलेला आहे. या नूतन वर्षी मंगळवार  10  जानेवारी रोजी   एकच ‘ अंगारकी संकष्ट चतुर्थी ‘ आहे.

(७) सोने खरेदी करणारांसाठी सन 2023 या नूतन वर्षामध्ये एकूण चार गुरुपुष्य योग आले आहेत. 30 मार्च,   27 एप्रिल, 25 मे आणि 28 डिसेंबर रोजी गुरुपुष्य योग असणार आहेत.

(८) सन 2023 मध्ये दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे अशी एकूण चार ग्रहणे होणार आहे. पण 20 एप्रिल आणि 14 ॲाक्टोबरची दोन्ही सूर्यग्रहणे  भारतातून दिसणार नाहीत. मात्र पाच मे रोजीचे छायाकल्प चंद्रग्रहण आणि  28 ॲाक्टोबरचे खंडग्रास चंद्रग्रहण ही दोन्ही चंद्रग्रहणे भारतातून दिसणार आहेत.

(९) एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा आल्या तर दुस-या पौर्णिमेच्या चंद्रहास ‘ ब्ल्यू मून ‘ म्हणतात. सन 2023 मध्ये एक ॲागस्ट आणि 31 ॲागस्ट रोजी पौर्णिमा आल्याने 31 ॲागस्ट रोजी ‘ ब्ल्यू मून ‘ योग आला आहे.

(१०) पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला असेल तर ‘ सुपरमून ‘ योग असतो. त्या दिवशी चंद्रबिंब 14 टक्के मोठे व 30 टक्के जास्त प्रकाशित दिसते. सन 2023 मध्ये एक ॲागस्ट आणि 31 ॲागस्ट असे दोन  ‘ सुपरमून योग ‘ येणार आहेत.

(११) सन 2023 मध्ये तिथीप्रमाणे शुक्रवार दोन जून रोजी  आणि तारखेप्रमाणे मंगळवार 6 जून रोजी शिवराज शक 350 सुरू होणार आहे.

(१२) सन 2023 मध्ये रविवार 12 नोव्हेंबर रोजी  दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजन  एकाच दिवशी  येणार आहे. बलिप्रतिपदा मंगळवार  14 नोव्हेंबर रोजी आणि भाऊबीज बुधवार 15 नोव्हेंबर रोजी आहे.
 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीकाDevendra Fadnavis : धुळे लोकसभेत फक्त मालेगाव मध्यमुळे महायुतीचा उमेदवार गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
Embed widget