Eknath Shinde : कट, करप्शन आणि कमिशन हाच काँग्रेसचा त्रिसूत्री विचार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर बोचरी टीका
Nagpur : पंतप्रधान मोदींवर आतापर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. त्यामुळे काँग्रेसला घोटाळा आणि करप्शन वर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. अशी बोचरी टीका एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केली आहे.
Eknath Shinde on Congress : काँग्रेसच्या (Congress) काळात राज्यात आणि देशात किती मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आहेत. त्यात चारा घोटाळा, कॉम्प्युटर घोटाळा, कोळसा घोटाळा, टू जी स्कॅम घोटाळा, अशी घोटाळ्यांची मोठी यादी इथे सांगता येईल. त्यामुळे जनतेने 2014 मध्ये त्यांचे तोंड काळे केले आहे. 2019 मध्ये देखील त्यांना तेच भोगावे लागला आहे. तीच परिस्थिती 2024 मध्ये देखील बघायला मिळाली. पण काँग्रेसने केलेले घोटाळे आज जनतेसमोर आहे. कट कमिशन आणि करप्शन ही त्रिसूत्री काँग्रेसचा विचार आहे. त्यामुळेच 2024 ला जंग जंग पछाडून देखील त्यांना मोठा पराभव स्विकारावा लागला.
परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होता आलं. आज पंतप्रधान मोदींवर आतापर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. घोटाळ्याचा डाग कोणी लावू शकले नाही. त्यामुळे काँग्रेसला घोटाळा आणि करप्शन वर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. अशी बोचरी टीका एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काँग्रेसवर केली आहे. मुख्यमंत्री आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून नुकतेच ते नागपूर विमानतळावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
वरळी हिट अँड रन प्रकरणी कुणालाही अभय दिले जाणार नाही
वरळीतील हिट अँड रन प्रकरणात कुणालाही अभय दिले जाणार नाही. कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक दिला जाईल. मग तो कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता असो. सरकार आणि कायद्यापुढे सर्व समान असल्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे वरळीत घडलेल्या घटनेला आम्ही काही वेगळा न्याय देणार नसून जे होईल ते कायद्यानुसारच होईल. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा घटना वारंवार होऊ नये यासाठी सरकार आणि गृह विभाग नक्कीच योग्य त्या उपाययोजना करतील, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. सध्या घडीला विरोधी पक्षाकडे कुठलेही काम राहिले नाही. त्यामुळे या घटनेमध्ये असे समजण्याचे कुठलेही कारण नाही की, कोण कोणाला पाठीशी घालत आहे. तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी सर्वांना समान न्याय देण्याची आमची मनीषा आहे. राज्यातलं सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. कोणी कितीही आरोप केले तरी त्यात फार अर्थ नाही. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच महायुतीची बैठक पार पडली यामध्ये विधानसभा निवडणुकीत जागावाटपसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. यावेळी ते म्हणाले की,आगामी विधान परिषदेसाठी आमच्या असून या सर्व जागा आम्ही मोठा मताधिक्याने जिंकू असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी बोलताना व्यक्त केला.