एक्स्प्लोर
औरंगाबादेत ग्राहकांची दुकानदाराला बेदम मारहाण
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये दुकानदार आणि ग्राहकांमध्ये चांगलाच वाद झाला. दोन तरुणांनी धुडगूस घालत दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
औरंगाबादमधील सिडको एन- 4 भागामध्ये रिद्धी डेली निड्स नावाचं किराणा दुकान आहे. दुपारी अचानक एका ग्राहक आणि दुकानदारामध्ये वाद झाला. त्यानतंर दोन तरुणांनी येऊन दुकानदाराला बेदम मारहाण केली.
याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ग्राहकाची दुकानदाराशी वादावादी चालू होती. मात्र ग्राहकाचे दोन्ही मुलं दुकानात आले आणि त्यांनी थेट मारहाण सुरु केली. यामध्ये महिला दुकानदाराला देखील धक्काबुक्की करण्यात आली.
पाहा व्हिडिओः
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement