एक्स्प्लोर

सत्ताधारी आमदारांकडूनच नियमांची पायमल्ली, शिवसेना आमदार बांगर यांच्यासह 40 जणांविरुद्ध गुन्हा

शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ प्रभुंची पालखी काढली. पालखीमध्ये हजारो भाविक दाखल झाले. या प्रकरणी विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्यासह इतर चाळीस जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली : दसऱ्याच्या दिवशी कोरोनामुळं तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ प्रभुंचा पालखी सोहळा रद्द होईल असे वाटले होते. मात्र ऐनवेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी पालखी काढली. पालखीमध्ये हजारो भाविक दाखल झाले. या प्रकरणी विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्यासह इतर चाळीस जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंपरागत पद्धतीने दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन सोहळा पार पडत असतो. या दिवशी तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ प्रभुंना पालखीतून फिरवले जाते. नागनाथ मंदिरातून नागनाथाची बहीण महाकाली यांचा झेंडा घेऊन पालखी मार्गस्थ होत असते. दरवर्षी या पालखीमध्ये मानकरी, भजनी मंडळ, विश्वस्त वाजंत्री , पंचक्रोशीतील भक्तांची उपस्थिती असते  मंदिरातून निघालेली पालखी बाजारातून कालिका मातेचे दर्शन घेतल्यानंतर सोनं लुटण्यासाठी ही पालखी सीमोल्लंघन करून शमीच्या झाडाची सोने लुटण्यासाठी मार्गस्थ होत असते.

यावर्षी पालखीचा हा सोहळा कोरोनामुळं रद्द होईल असे वाटले होते. मात्र ऐनवेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी ही पालखी काढली. पालखीमध्ये हजारो भाविक दाखल झाले होते. मात्र सत्ताधारी आमदारांकडूनच नियमांची पायमल्ली होत असल्याने हिंगोली जिल्ह्यात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वीही संतोष बांगर यांनी औंढा नागनाथ मंदिरात सपत्नीक नागनाथाची पूजा केल्यामुळे चर्चेला उधाण आले होते.

टाळेबंदीचे नियम कुणासाठी? राजकीय नेत्यांना नियम नाहीत का? पालखी काढल्याप्रकरणी विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्यासह इतर चाळीस जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंढा नागनाथ पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 बांगर यांनी आधीही केली होती पूजा आमदार संतोष बांगर यांनी सपत्नीक औंढा नागनाथ येथे पहाटे जाऊन पूजा केली होती. या पूजेच्या वेळी सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळला नव्हता. या संदर्भात एबीपी माझाने वृत्त दिले होते. या पूजेवेळी ना पुजाऱ्याच्या तोंडावरती मास्क होता ना आमदार साहेबांच्या तोंडावर.  यासंदर्भात आम्ही मंदिर संस्थांचे पदाधिकारी म्हणून तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता तरी आमदार संतोष बांगर हे मंदिर संस्थानचे एक सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना पूजेची परवानगी दिली असा युक्तिवाद केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget