LIVE UPDATES | ब्रम्हपुरी तालुक्यातील चिचगाव (डोर्ली) येथे 2 लोकांचा जीव घेणाऱ्या बिबट्या जेरबंद

14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा! महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तारखा जाहीर करमाळ्यात नरभक्षक बिबट्याचा थरार सुरूच, तीन फायर चुकवून, ट्रॅप भेदून पुन्हा वन विभागाला चकवा मेट्रोचा प्रकल्प सर्वसामान्य जनतेच्या पैशातून आणि ती जागाही नागरीकांचीच : हायकोर्ट दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Dec 2020 10:29 PM
उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमधील शेतकरी दिल्लीकडे कुच करणार. रविवारी सकाळी 11 वाजता जयपूर-दिल्ली महामार्गामार्गावरुन 'दिल्ली चलो' पदयात्रा सुरूवात.
पालघर : वाढवण बंदराच्या विरोधात 15 डिसेंबरला किनारपट्टी वरील मुंबई कफपरेड ते झाई पर्यंतच्या सर्व गाव व कोळीवाड्यांची बंदची हाक. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती आणि नॅशनल फिश वर्कर्स फोरम करणार नेतृत्व.
ब्रम्हपुरी तालुक्यातील चिचगाव (डोर्ली) येथे 2 लोकांचा जीव घेणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश. गावाजवळ लावलेल्या लाईव्ह बेट वर संध्याकाळी बिबट आला होता, वनविभागाने डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध केले, जेरबंद करण्यात आलेला बिबट मादी असून त्याचे वय अंदाजे 3 ते 4 वर्ष आहे. या बिबट्याला वैद्यकीय तपासणी नंतर नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला रवाना करण्यात आले आहे. या बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या एका आठवड्यात सायत्रा ठेंगरी (60) आणि ताराबाई ठाकरे (55) या दोन महिलांचा मृत्यू झाला होता.
नागपूर: मानलेल्या बहिणीसोबत का बोलतो एवढ्या रागातून एका गुंडाने नागपुरात 30 वर्षीय विवाहित तरुणाचा खून केला आहे, यशोधरा नगर पोलीस स्टेशन अंतर्गत आज सकाळी माजरी रेल्वे अंडर ब्रिज जवळ झाली हत्येची घटना, किशोर नंदनवार असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव, तर शेख सिराज उर्फ शेरखान असं आरोपीचे नाव, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी शेर खानवर शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे आहेत, विशेष म्हणजे 36 तासांपूर्वीच नागपुरात कथित एकतर्फी प्रेमातून दुहेरी हत्याकांड घडले होते, आता मानलेल्या बहिणीसोबत बोलतो या रागातून गुंडाने एकाची हत्या केली आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारला तलासरी जवळ भीषण अपघात, गुजरातहुन मुंबईकडे जाताना घडली घटना. कारने चार पलटी खाऊनही सर्व प्रवाशी सुखरूप.
अहमदनगर : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे प्रकरणात महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती. फरार आरोपी बाळ बोठेंच्या घरी पोलिसांचा छापा. बोठेंच्या घरात आणि ऑफिसमध्ये महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती. तर या प्रकरणात कोणाला माहिती असल्यास पोलिसांना कळवावी, असेही आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे.
वाशिम : अकोला हैद्राबाद महामार्गावर वाशिमच्या पोस्ट ऑफिस चौकात शिवसेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमतीत दरवाढ करून जनतेला वेठीस धरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच रावसाहेब दानवेंच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा देखील निषेध करण्यात आला. या आंदोलनामुळे काही काळ अकोला हैदराबाद महामार्गाची वाहतूक खोळंबली होती.
गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथगडावर पंकजा मुंडेंचं रक्तदान, महादेव जानकर यांनीही रक्तदान केले
LIVE UPDATES | रायगड : मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावनजीक शिवसैनिकांची निदर्शने, रावसाहेब दानवे यांचं शेतकरी विरोधी वक्तव्य आणि वाढते पेट्रोल डिझेलच्या दर या विरोधात महामार्गावर निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसैनिकांनी माणगावनजीक महामार्ग काही काळ रोखून धरला होता.
शरद पवार यांच्याबद्दल बोलताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ भावूक,

मिरज दंगलीनंतर निवडून आल्यावर शरद पवार यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख,

शरद पवार यांच्याबद्दल बोलताना मुश्रीफ यांना अश्रू अनावर
पेट्रोल दरवाढ विरोधी सोलापुरात शिवसेनेने आंदोलन केलं. बैलगाडीत मोटारसायकल ठेवत चाकाला रावसाहेब दानवे यांचे फोटो लावण्यात आले. तर सोलापुरातील चार पुतळा चौक ते डफरीन चौकापर्यंत सायकल रॅली यावेळी काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या दानवेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केली.
सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ परिसरात विधिमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहाय्यक, अधिकारी, कर्मचारी, पोलिस, यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यासाठी विधिमंडळ परिसरात कोरोना चाचणी केंद्र उभारण्यात आलंय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची गर्दी झालेली आहे.
शरद पवार यांच्याबद्दल 'ते' वक्तव्य म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीत भांडण लावण्याचा प्रयत्न,

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू होती.

मात्र पवार साहेबांनी त्याचे खंडन केले आहे. हे वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य
पालघर : पालघर जिल्ह्यात आजही पहाटे पासून ढगाळ वातावरण निर्माण झालं असून काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. कालपासून हे अवकाळी संकट पुन्हा सुरू झालं असून जिल्ह्यातील शेतकरी आणि गवत पावळी व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. पश्चिम किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात मिर्ची लागवड होते. रब्बी बरोबरच मिरची उत्पादकांवर ही मोठं संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री आज औरंगाबाद दौऱ्यावर; राज्यातील सर्वात मोठ्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ
LIVE UPDATES | शिर्डी : अंगणवाडी सेविकांच नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर जवळ हिवरगाव टोल नाक्यावरआंदोलन, सेविकांच मानधन वाढवण्याची मागणी, तर शेतकरी आंदोलनाला पाठींबा
LIVE UPDATES | शिर्डी : अंगणवाडी सेविकांच नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर जवळ हिवरगाव टोल नाक्यावरआंदोलन, सेविकांच मानधन वाढवण्याची मागणी, तर शेतकरी आंदोलनाला पाठींबा
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजा नुसार नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील पश्चिम परिसरात कनाशी, जयदर, बोरगाव,या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी. अवकाळी पडणाऱ्या या पावसाने शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कांदा रोपांवर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव वाढून रोप खराब होण्याची भीती व्यक्त होते आहे.
नाशिक-पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात शिवसेना आक्रमक, शिवसेनेच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालया बाहेर आंदोलन,
मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी,रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील केला निषेध, पेट्रोल दरवाढ आणि महागाई विरोधात शिवसेना आक्रमक,

दरवाढ मागे घ्या अन्यथा मोठं आंदोलन छेडणार, शिवसेनेचा इशारा
बेळगाव रेल्वे स्थानकावर पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका चिमुकलीचा जीव वाचला.हा थरारक प्रसंग रेल्वे स्टेशनवरील सी सी टी व्ही मध्ये कैद झाला आहे. बेळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबली समजून एका लहान मुलीने प्लॅटफॉर्म वर उडी मारली.पण पुन्हा रेल्वे जात असल्याचे पाहून त्या मुलीने रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला.यावेळी ती रेल्वे डब्याच्या पायरीवर पडली.एका होमगार्ड ने प्रसंगावधान दाखवत तिला बाजूला काढताना स्वतःही पडला.यावेळी रेल्वे स्थानकावर सेवा बजावत असलेल्या पोलिसाने दोघानाही ओढून काढून जीवदान दिले .
औरंगाबाद : सिल्लोडच्या केळगाव पोलीस पाटील आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणांनतर काल केळगावमध्ये रात्री चांगलाच राडा झाला. रात्री उशिरा जमावाने आरोपीच्या घरावर दगडफेक केली आणि पोलिसांच्या ताफ्यावरही दगडफेक केली. यात 2 पोलिसांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. लाठीचार्जही करावा लागला. तेव्हा जमाव पांगला. केळगावच्या पोलीस पाटील महिलेने गावातील काही लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर विष प्राशन केलेल्या या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते तिच्यावर उपचार सुरु आहेत, या प्रकरणात 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांची जामिनावर सुटकाही केली आहे. या प्रकरणी 55 गावकरी ताब्यात, 4 हवेत फायर, एक अधिकारी 3 कर्मचारी जखमी, पोलिसांच्या 2 गाड्या फोडल्या
करमाळ्यात नरभक्षक बिबट्याचा थरार सुरूच, तीन फायर चुकवून, ट्रॅप भेदून पुन्हा वन विभागाला चकवा
महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री आज औरंगाबाद दौऱ्यावर; राज्यातील सर्वात मोठ्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ, भाजप-शिवसेनेत पोस्टर वॉर
राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.
विरार : सकाळी अचानक सुरू झालेल्या रिमझिम अवकाळी पावसाने विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्या वरील मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. समुद्र किना-यावर सुकण्यास घातलेला जवला आणि सुके बोंबील पावसाने भिजल्याने त्या पूर्णपणे निकामी झाल्या आहेत.
महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मारहाण. प्राचार्य धनाजी गुरव यांना जबर मारहाण, गुरव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शनिवारी 81 किलोचा केक कापण्यात येणार असून यावेळी फिल्म इंडस्ट्री मधील राजबाबू गोविंदा याची विशेष उपस्थिती असणार आहे .विरार का छोरा परळी चा दौरा करणार असल्याने परळी करांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे .

शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यात अनेक ठिकाणी जय्यत तयारी केली जात आहे. धनंजय मुंडे यांनी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त 81 किलोच्या केकची ऑर्डर दिली आहे. अभिनेता गोविंदा याच्या प्रमुख उपस्थितीत हा केक कापला जाणार आहे.
पालघर जिल्ह्यात पहाटे पासून अवकाळी पावसाने सुरुवात केली असून शेतकरी आणि गवत पावळी व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली होती. तर गवत पावळी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून गवत पावळीची खरेदी केली होती. मात्र आज सुरू झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान करायला सुरुवात केली आहे
कोल्हापूर जिल्हा परिषदेत राडा,

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाची चौकशी करावी यासाठी पंचायत समिती सदस्य अर्धनग्न आंदोलन,

कोल्हापूर जिल्हा जिल्हा परिषद सीईओ यांच्या दालनासमोर पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट,

हातकणंगले पंचायत समिती सदस्य,प्रवीण वसंत जनगोंडा आणि सहकारी यांचं अर्थनग्न आंदोलन ,

एका हातकणंगले तालुक्यात बांधण्यात आलेल्या 2250 शौचालयात पैकी अनेक शौचालय बेकायदेशीर आणि बोगस बांधण्यात आल्याचा आरोप ,


पंचायत समिती सदस्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा,

अनेक महिन्यापासून शौचालय बांधणी मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी जनगोंडा यांची मागणी
वरळी, दादर, प्रभादेवी, लालबाग परिसरात रिमझिम पाऊस सुरु, मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण
धक्कादायक! झाडावर लटकलेले आढळले आईसह तीन मुलांचे मृतदेह; वडिलांचाही आत्महत्येचा प्रयत्न, दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह झाडाला सडलेल्या अवस्थेत लटकलेले आढळले, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पत्नी आणि तिन्ही मुलांच्या मृतदेह पाहून वडिलांनाही केले विष प्राशन आत्महत्येचा प्रयत्न केला.. भिवंडी तालुक्यातील उंबरखांड पाच्छापूर जंगलात ही धक्कादायक घटना घडली. श्रीपत बच्चू बांगरी असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तर पत्नी रंजना (30), मुलगी दर्शना (12), रोहिणी (6) आणि मुलगा रोहित (9) असे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या चौघांची नावे आहेत. 21 ऑक्टोबरला केली होती बेपत्ता असल्याची तक्रार..
रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍याबद्दल केलेल्या विधानाचे माफी मागावी यासाठी सुरू असलेले आंदोलन अजूनही सुरु आहे. प्रहार संघटनेचे कार्यकर्ते औरंगाबाद शिवाजीनगर भागातील पाण्याच्या टाकीवर अजूनही बसलेले आहेत. काल एक वाजल्यापासून सूर आहे. या आंदोलकांनी रात्र पाण्याच्या टाकी वरच काढली.
संत नामदेव यांच्या पादुका फुलांनी सजवलेल्या एसटी बसमधून पहाटे आळंदीकडे आज होणाऱ्या वद्य एकादशीच्या सोहळ्यासाठी रवाना झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्यासाठी संत नामदेव, भक्त पुंडलिक आणि विठुरायाच्या पादुका आळंदीला भेटीसाठी घेऊन जायची शेकडो वर्षाची परंपरा आहे.
वायफाय बुथ हे लोकांचा डेटा चोरण्यासाठी, राष्ट्रवादीचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
मुंबईची लाईफलाईन लोकल सुरु करण्याचा विचार आता ख्रिसमस आणि न्यू ईयर नंतरच : आयुक्त इकबालसिंग चहल
तृप्ती देसाई यांना सुपा पोलिस स्टेशनमधून सोडून देण्यात येतंय. त्या पुण्याला परत जातील या बोलीवरती त्यांची सुटका करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतलाय. त्या पुण्यात त्यांच्या घरी पोचेपर्यंत अहमदनगर पोलिस त्यांच्या सोबत असतील.
संगणक प्रिंटरच्या मदतीने ग्राहक सेवा केंद्रात शंभर, दोनशे आणि दोन हजाराच्या बनावट नोटा तयार करून त्या साथीदाराच्या मदतीने विविध जिल्ह्यात कमी दरात विकणारी टोळीतील तिघांच्या औरंगाबाद मधील सिडको पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील केळगावच्या महिला पोलिस पाटलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तसा व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलाय. काही लोक आपल्या घरी येऊन असलेले शिवीगाळ करत असल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. आपल्या आत्महत्येला पोलीस आणि छळ करणारा व्यक्ती जबाबदार असेल, असे त्यांनी म्हटले आहे. या सदरील महिलेने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, सिल्लोड शहरातील एका खाजगी रुग्णालयात या महिलेवर ती उपचार सुरू आहेत.
यूपीएचं नेतृत्व करणार या बातमीत तथ्य नाही, शरद पवार यांची 'एबीपी माझा'ला माहिती
रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर तेलाच्या टँकरला आग, बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ टँकरला आग, ड्रायव्हर केबिन जळून खाक.
तृप्ती देसाईंना अहमदनगर पोलिस पुणे - अहमदनगर रस्त्यावरील सुपे गावात पोलिस अडवण्याची शक्यता आहे. तृप्ती देसाईं आणि त्यांच्या सोबतच्या महिलांना घेऊन येणारी बस अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करताच अहमदनगर पोलिसांची एक गाडी त्यांच्या पाठीमागे आहे . तर पोलिसांची दुसरी टीम सुपे गावात थांबलेली आहे. सुप्यापासुन शिर्डीचे अंतर जवळपास शंभर किलोमीटर आहे. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून अहमदनगर पोलिसांनी तृप्ती देसाईंना आधीच रोखण्याचा निर्णय घेतलाय.
बुलढाणा : शेतकरी विरोधी कायदा रद्द करा, दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी बुलढाणा येथे कोंग्रेसच्या वतीने माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात भव्य ट्रक्टर रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत 300 ट्रक्टर सहभागी झाले होते, बुलढाणा शहराच्या मुख्य रस्त्यावरुन ही ट्रक्टर रॅली जिल्ह्याधिकारी कार्यलयासमोर नेण्यात आली. शेतकऱ्यांच्या न्यायासंबधित मागण्याचे निवेदन राष्ट्रपती यांना जिल्ह्याधिकारी मार्फ़त पाठवण्यात आले आहे.
नांदेड: जिल्ह्यातील बिलोली येथे माणुसकीला काळिमा फासनारी घटना, मूकबधिर मुलीवर बलात्कार करून हत्या, या प्रकरणात रात्री उशिरा बिलोली पोलिस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक येथील पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी उमेदवारांना आठ दिवसांची सुट्टी द्या, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विनंती केली आहे
नागपूरसह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या राणे कुटुंबियांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर.

व्यक्तिक आयुष्यातील नैराश्य, पतीच्या वाईट सवयी, कौटुंबिक कलहामुळे डॉ सुषमा राणे यांनीच पती प्रा. धीरज राणे आणि दोन्ही मुलांना विषाचे इंजेक्शन देऊन स्वतः गळफास घेतल्याचे पोलिसांच्या तपासात आले समोर.

घरचा कुत्रा त्रास देतो असे सांगून डॉ सुषमा यांनी त्यांच्याच रुग्णालयातून कुत्र्याला मारण्याचे इंजेक्शन आणले होते,

कुटुंबाला त्या विषाचे इंजेक्शन देऊन स्वतः गळफास लावला होता...

मुख्यमंत्री रत्नागिरी पोफळीत पोहोचले, चौथ्या टप्प्याची पाहाणी केली. त्याठिकाणी असलेल्या जीर्ण मशनरी दुरुस्तीसाठी तातडीने प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

त्याच बरोबर कोयना धरणाच्या डाव्या तीरावर 40 मेगावॅटचा प्रकल्प असून उजव्या तीरावर ओझर्डे येथे गेले पंधरा वर्षे 80 मेगावॅट प्रकल्पाचे काम सुरु आहे ते अद्याप पूर्ण झाले नाही यापूर्वी जयंत पाटील यांनी पाहाणी केली होती.
नागपूरचे महापौर संदीप जोशी कोरोना पॉझिटिव्ह, ट्वीट करून दिली माहिती, संदीप जोशी यांचा नुकतंच विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत झाला होता पराभव
अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्रकिनारी निळ्या लाट, बुधवारी रात्रीच्या सुमारास समुद्रकिनारी दिसल्या निळ्या लाटा, रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी प्रथमतःच निळ्या लाटा दिसून आल्या
अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्रकिनारी निळ्या लाट, बुधवारी रात्रीच्या सुमारास समुद्रकिनारी दिसल्या निळ्या लाटा, रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी प्रथमतःच निळ्या लाटा दिसून आल्या
तृप्ती देसाईंपाठोपाठ ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनाही अहमदनगर पोलिसांनी नोटीस बजावलीय . शिर्डीमधे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं काहीही करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी ब्राम्हण महासंघाच्या आनंद दवे यांना नोटीशीद्वारे सांगितलंय . शिर्डीच्या साई बाबा मंदिरात देवस्थानकबून तोकडे कपडे घालू नयेत अशी सूचना देणारा बोर्ड लावण्यात आलाय.तो बोर्ड काढण्यासाठी तृप्ती देसाई पुण्यातुन शिर्डीला जाण्यासाठी निघाल्यात तर आनंद दवे आणि ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या कालपासूनच त्या बोर्डच रक्षण करण्यासाठी शिर्डीमधे तळ ठोकून आहेत. अहमदनगर पोलिस तृप्ती देसाईंना शिर्डीमधे न जाऊ देता आधीच अडवणार आहेत परंतु ब्राम्हण महासंघाच्या आनंद दवे यांनी तृप्ती देसाईंना समोरासमोर भेटु द्यावे अशी मागणी केलीय. त्यामुळं पोलिसांकडून त्यांनाही नोटीस बजावण्यात आलीय.
लोकसभा व विधानसभेच्या उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ,

पूर्वी लोकसभा निवडणुकीची खर्च मर्यादा 70 लाख होती ती वाढवून 77 लाख करण्यात आली ,
विधानसभा निवडणुकीची खर्च मर्यादा 27 लाख होती ती वाढवून 30 लाख 80 हजार करण्यात आली आहे
फी न भरल्यास ऑनलाईन शिक्षण बंद करणार, लॉकडाऊन पासून पालक फी भरत नसल्याची स्कूल असोसिएशनची तक्रार, स्कूल असोसिएशनने शिक्षण उपसंचालकाना पुढे मांडले गाऱ्हाणे, गेल्या आठ महिन्यांपासून फी न भरलेल्या विद्यार्थ्याचे ऑनलाईन शिक्षण पुढील 7 दिवसात बंद करणार, विद्यार्थ्याचे प्रवेश खंडित केले जाणार नाही मात्र फी वसूल करणार, शिक्षकांचे पगार देण्यासाठी पालकांनी फी भरणे गरजेचे
रायगड: अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्रकिनारी दिसल्या निळ्या लाटा, बुधवारी रात्रीच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी पहिल्यांदाच पाहिल्या अशा लाटा
शिर्डी : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येऊन साई संस्थानाने लावलेले आवाहनाचे फलक काढण्याचा इशारा दिला होता. आज तृप्ती देसाई थेट शिर्डीत जाऊन बोर्ड काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. याचपार्श्वभूमीवर सकाळपासून शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मंदिर परिसरात लावलेल्या फलकांजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जलयुक्त शिवार योजना बीड जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी एन मिसाळ आणि तालुका कृषी अधिकारी बी बी बांगर निलंबित, बीड जिल्ह्यातील योजनेत 35 कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार आहे, एकूण 138 ठेकेदारांवर आतापर्यंत गुन्हे दाखल
पुण्यातील रानगवा मृत्यूनंतर नाशिक जिल्हा प्रशासन सतर्क,

जिल्हा प्रशासनाने घेतला मोठा निर्णय,

जिल्ह्यात वन्यप्राणी निदर्शनास आला तर तत्काळ संचारबंदी लागू करणार,

केवळ वन विभाग, पोलीस आणि त्या क्षेत्रातील तज्ञांनाच प्राणी पकडण्याची मुभा
ज्येष्ठ पत्रकार अशोक याळगी यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. एक निर्भिड पत्रकार आणि सडेतोड लेखन करून त्यांनी पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटवला होता. सर्च लाईट,काटेरी मखमल हे तरुण भारत मध्ये प्रसिध्द होणारे त्यांचे सदर गाजले होते.अनेक विषयांना त्यांनी आपल्या सदरातून वाचा फोडली होती.सीमा आंदोलनात देखील त्यांचा मोठा सहभाग होता.विविध क्षेत्रातील मंडळींशी त्यांचा घनिष्ट परिचय होता.सीमाभागातील अनेक साहित्य संमेलनाचे ते मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते.बेळगावच्या साहित्यिक क्षेत्रात ते नेहमी उत्साहाने आपला सहभाग नोंदवत असत. वांगमय चर्चा मंडळ आणि लोकमान्य ग्रंथालयाच्या माध्यमातून ते सदैव कार्यरत होते.लोकमान्य वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढीस लागावी म्हणून विविध उपक्रम त्यांनी राबवले होते.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.दुपारी बारा वाजता त्यांच्यावर सदाशिव नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
काल संध्याकाळच्या अहवालानुसार हिंगोलीत एकही नवा रूग्ण आढळला नाही. औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड, लातूरमध्ये एकही मृत्यू झाला नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण, सातारा आणि पुण्याच्या दौऱ्यावर.. विविध विकास प्रकल्पांच्या कामाची पाहणी करणार आहेत..
सांगली : जत संस्थानच्या राजमाता श्रीमंत किर्तीमालीनीराजे डफळे यांचे रात्री वृध्दापकाळाने निधन, जत संस्थानचे राजे कै. श्रीमंत अनिलराजे डफळे यांच्या मातोश्री तसेच श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांच्या त्या आजी होत.
पालघर
माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्यावर वाडा येथे दुपारी बारा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपाचे जेष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील त्याचप्रमाणे भाजपाचे राज्यातले काही आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत
बेळगाव : ज्येष्ठ पत्रकार अशोक याळगी (82) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. एक निर्भिड पत्रकार आणि सडेतोड लेखन करून त्यांनी पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटवला होता. सर्च लाईट,काटेरी मखमल हे तरुण भारत मध्ये प्रसिध्द होणारे त्यांचे सदर गाजले होते.अनेक विषयांना त्यांनी आपल्या सदरातून वाचा फोडली होती.सीमा आंदोलनात देखील त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. दुपारी बारा वाजता त्यांच्यावर सदाशिव नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचं निधन. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने उपचार सुरू होते.
बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या चिखली रोड स्थित कार्यालयावर सशस्त्र हल्ला झाल्याची खळबळजनक घटना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. रविकांत तुपकर आपल्या कार्यकर्त्यांसह कार्यालयात बसले असताना त्यांच्याच (सावळा) गावातील जनार्धन गाडेकर नामक व्यक्तीने हातात कुर्‍हाड घेऊन तुपकर यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याची माहिती आहे. यावेळी तुपकर यांच्यावर वार करण्यापूर्वी त्यांचे अंगरक्षक आणि स्वीय सहाय्यकमध्ये आल्याने अनर्थ टळला. पण, झटापटीत तुपकर यांच्या स्वीय सहाय्यकाला छातीत मार बसल्याची माहिती आहे. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशन बुलढाणा येथे फिर्याद नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संगीतकार नरेंद्र भिडे यांचे पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, अंत्यदर्शन सकाळी 9.30 वाजता Dawn Studios, Pune इथे, आणि 11 वाजता वैकुंठ येथे अंत्यसंस्कार होतील.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा डीएनए तपासण्याची गरज. आता आम्ही केंद्र सरकारकडेच मागणी करणार आहे की रावसाहेब नेमके कुठले राज्यमंत्री आहेत? : बच्चू कडू
दिल्लीतील रस्ते जाम करणार, देशात आंदोलन तीव्र करू
तीन कायदे रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार- शेतकरी नेते
ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आढळला आहे. वॉट्सअपच्या स्टेटस द्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. लक्षणे दिसत असल्याने मी कोव्हिड टेस्ट करून घेतली होती, ती पॉजिटीव्ह आढळली असून संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी या द्वारे केले आहे.
शेतकरी आंदोलन सुरू राहणार, शेतकरी नेत्यांची भूमिका,

14 तारखेला धरणे आंदोलन होणार

, जयपूर-दिल्ली हायवे 12 तारखेपर्यंत रोखणार
Maratha Reservation : राज्य सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे. त्यासाठी स्वतंत्र एसईबीसी वर्ग तयार करू त्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनुसारच मुंबई उच्च न्यायालयानं हा कायदा योग्य ठरवला होता - रोहतगी
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला असला तरी अद्याप सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील सुनावणी सुरु आहे. मुकूल रोहतगी राज्य सरकारची बाजू न्यायालयासमोर मांडत आहेत.
पुणे शहरातील कोथरूड येथील महात्मा सोसायटीत शिरलेल्या त्या रानगव्याचा पाच तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान मृत्यू झालाय. वन विभाग, अग्निशमन दलासह पोलीस प्रशासनाने पाच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर रेस्क्यू ऑपरेशन राबवत बेशुद्ध करून त्याला ताब्यात घेतले होते. त्याचे चारही पाय बांधून ताब्यात घेऊन ट्रकमध्ये नेले. परंतू त्यानंतर उपचार सुरु असताना या गव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मराठा आरक्षण प्रकरणी सुनावणीला सुरूवात, मुकुल रोहतगी युक्तिवाद करत आहेत, आधीच्या खंडपीठाने दिलेली स्थगिती कशी योग्य नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, सहसा घटनापीठाकडे जाताना कुठला अंतरीम निर्णय दिला जात नाही, पण या केसमध्ये तो दिला, राज्य सरकारतर्फे मुकूल रोहतगींचा युक्तिवाद सुरू, हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करताना त्रिसदस्यीय पूर्णपीठाला अंतरिम आदेश देण्याची गरज नव्हती, प्रकरण तसंच घटनापीठापुढे वर्ग करायला हवं होतं - रोहतगी
स्थगितीपूर्वाच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली.
प्रताप सरनाईक उद्या मुलगा विहंगसोबत ईडी कार्यालयात चौकशीसाठी 11 वाजता हजर राहणार, स्वत: प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील नामांकित आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख होती असे किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह आज पहाटे पलासद जवळ संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडालेली आहे. कुंझरकर यांनी कोरोनाच्या महामारीच्या काळात गरीब मुलामुलींना घरोघरी जाऊन शिक्षण दिले होते. नेहमी समाजसेवेत अग्रेसर असणारे किशोर पाटील कुंझरकर यांची नुकतीच शिक्षक संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झालेली होती. खान्देशला हा बहुमान पहिल्यांदाच मिळालेला होता.किशोर पाटील कुंझरकर हे राज्यातील विविध शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य महासचिव होते. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. गालापूर येथील जिल्हापरिषद शाळेत मुख्याध्यापक असलेल्या पाटील यांचा आज सकाळी मृतदेह पलासद जवळ आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. किशोर पाटील यांच्या अंगावरील कपडे फाटलेले आढळून आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा घातपात झाला आहे का? आणि नेमके या ठिकाणी पाटील का आले होते ? याबद्दल पोलीस प्रशासन तपास करीत आहे.
मराठा आरक्षणावरील स्थिगिती हटवण्यास तूर्तास नकार देण्यात आला आहे. स्थगितीपूर्वीच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला परवानगी देण्यात आलेली नाही.
औरंगाबाद : अजिंठा लेणीचं नऊ महिन्यानंतर कुलूप उघडलं. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कुलूप उघडलं असून उद्यापासून लेणी पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहे. लेणीची साफसफाई आज केली जात आहे.
मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास खंडपीठानं तूर्तास नकार दिला आहे. परंतु, मुकुल रोहतगी खंडपीठाला अंतरिम स्थगिती हटवणं किती महत्त्वाचं आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
नाशिक - बालगृहात अल्पवयीन पीडितेवर अत्याचार करणाऱ्या दोघांना दहा वर्षांची सक्तमजुरी आणि 20 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने सुनावली आहे. बालगृहाच्या अधीक्षिका आणि त्यांचा मुलाला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 2015 मध्ये दिवाळीच्या निमित्ताने अल्पवयीन मुलीला दिवाळी निमित्ताने अतुल अलबाड याने पीडितेला अधीक्षक कार्यालयात बोलावून तिच्यावर अत्याचार केला होता. यानंतर पीडितेने अधीक्षिका सुशिला अलबाड यांना सर्व घटना सांगितली. मात्र त्यांनी मुलीवरच आरोप करत कारवाईची धमकी दिली. त्यानंतरही आरोपीने  पीडितेवर अत्याचार केले. मुलगी सज्ञान झाल्यावर तिची शासकीय वसतीगृहात रवानगी झाल्यानंतर तिने वरिष्ठांना हा प्रकार सांगितला आणि त्यानंतर अत्याचाराच्या घटनेची उकल झाली तब्बल 5 वर्षांनी अधीक्षिका आणि तिच्या मुलाला शिक्षा सुनावण्यात आलीय.
केंद्र सरकारचा दहा टक्के आर्थिक आरक्षणाचा प्रश्न सुद्धा न्यायालयाच्या अखत्यारीत आहे. मात्र त्याला स्थगिती दिलेली नाही. मग केवळ याच आरक्षणाला स्थगिती का? असं मुकुल रोहतगी यांनी खंडपीठाला सांगितलं. परंतु, तो प्रश्न वेगळा असल्याचं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे.
कृषी कायद्यावर बदलांचा लिखित प्रस्ताव सरकार शेतकरी संघटनांना अकरा वाजता देणार,

शेतकरी संघटना कालच्या बैठकीनंतर म्हणत होते आम्हाला तोच प्रस्ताव दिला जात आहे,

पण आता सरकारच्या सूत्रांच्या वतीने अजून एक विशेष बाब नमूद करण्यात आली आहे आम्ही काही अधिकचं सुद्धा या प्रस्तावात देऊ शकतो..

त्यामुळे काय प्रस्ताव असणार याची उत्सुकता,
मराठा आरक्षणावरची स्थगिती हटवण्यास तूर्तास सर्वोेच्च न्यायालयाचा नकार, मराठा आरक्षणावर पुन्हा जानेवारीत सुनावणी
प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा,

तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे ईडीला निर्देश,

ईडीच्या कारााईविरोधात सरनाईकांनी केली होती सर्वोच्च न्यायालयात याचिका,

अन्य एका प्रकरणासोबत सरनाईकांचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्तास कारवाई न करण्याचे निर्देश,
या आधीही काही राज्यांनी 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे, रोहतगींचा युक्तिवाद
काल दिल्लीत झालेल्या शेतकरी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बैठकीत अमित शाह यांनी कृषी कायदे रद्द करण्यास नकार दिल्याचं समजतंय. कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव त्यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे तर कायदे मागे घेण्याच्या आपल्या भूमिकेवर शेतकरी ठाम असल्याचं दिसून येतंय.

मुंबई शेअर बाजाराने उसळी घेतली असून तो 45 हजार 800 अंकापर्यंत पोहचला आहे. हा मुंबई शेअर बाजाराचा नवा विक्रम ठरला आहे.
करमाळा परिसरातील नरभक्षक बिबट्याला शोधण्यासाठी स्निफ्फर डॉग स्कॉड दाखल, खासदार रणजित निंबाळकर यांनी बिबट्याच्या शोधासाठी केली हेलिकॉप्टरची मागणी
पुणे : चाकणमध्ये अल्पवयीन मुलीचा 18 वर्षीय मुलाने खून केल्याचं समोर आलंय. साक्षी मोहिते असं मृत मुलीचं तर आरोपीचं माऊली असं नाव आहे. आंबेठाण लगतच्या गोणवडीत मोहिते कुटुंबीय राहतं. मूळचा नाशिकचा असलेला माऊली हा त्यांच्याच घरी राहून, त्यांची जनावरं राखतो. काल देखील लगतच्या पडजमिनीत माऊली जनावरं घेऊन गेला, तेव्हा सोबत साक्षी आणि तिची 6 वर्षांची बहीण होती. त्यावेळी माऊली आणि साक्षीमध्ये बाचाबाची झाली. यातूनच माउलीने हातातील काठी साक्षीच्या गळावर आडवी ठेऊन ती जोराने दाबली आणि तिचा खून केला. त्यानंतर तो पसार झालाय. घडलेल्या घटनेसंदर्भात साक्षीच्या लहान बहिणीने सांगितलं आहे. चाकण पोलीस माऊलीचा शोध घेत आहेत.
औरंगाबाद : औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नवी पाणी पुरवठा योजना आखण्यात आली आहे. 1680 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचं 12 तारखेला भूमिपूजन केलं जाणार आहे. औरंगाबाद शहराला सध्या 5 दिवसांआड पाणी मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. योजना पूर्ण झाल्यास औरंगाबाद करांना चोवीस तास पाणी मिळणं शक्य आहे.
मुंबई : लोखंडवाला, ओशिवारामध्ये एनसीबीकडून छापेमारी करण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणी रिगल महाकाल नावाच्या व्यक्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रोकडही जप्त केली आहे.
अहमदाबादमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग आहे. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
बुलढाणा : स्थानिक गुन्हा शाखेने रात्री गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर परिसरात काही इसम दरोडा टाकण्याच्या आणि चोरी करण्याच्या उद्देशाने मुक्ताईनगर पारिसरातून येत असल्याच्या महितीवरुन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर सापळा रचून चार दरोडेखोरांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून घातक शस्त्र, तलवार असे साहित्य जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना 11 डिसेंबर पर्यंत शिर्डीमधे येण्यास बंदी घालण्यात आलीय . तशी नोटीस तृप्ती देसाई यांना त्यांच्या पुण्यातील घरी जाउन अहमदनगर पोलिस आणि प्रशासनाकडून बजावण्यात आलीय . मात्र तरीही आपण दहा तारखेला सकाळी साडे आठ वाजता शिर्डीला जाण्यासाठी निघणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी सांगितलंय . शिर्डीच्या साई बाबा मंदिरात देवस्थानकडून दर्शनाला येणार्या भाविकांनी तोकडे कपडे घालू नयेत अशी सूचना देणारा बोर्ड लावण्यात आलाय.तो बोर्ड आपण स्वतच्या हातांनी काढणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी सांगितलंय . तर आम्ही तो बोर्ड काढु देणार नाही असं म्हणत ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे आणि त्यांच्या महिला आघाडीच्या सदस्या यांनी त्या बोर्डच रक्षण करण्यासाठी आजच शिर्डीला जाण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यातील लाल महलातील जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करून ब्राम्हण महासंघाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आज शिर्डीला रवाना होणार आहेत.
पुणे : पुण्यातील कोथरुड भागातील महात्मा सोसायटीत आज सकाळी गवा सदृश्य प्राणी आल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. एरवी घनदाट जंगलात आढळणारा गवा शहराच्या मध्यवर्ती भागात कसा पोहचला असावा अशी चर्चा महात्मा सोसायटीतल लोकांमध्ये रंगलीय. वन विभागाकडून या प्राण्याला पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मनरेगा आणि राज्य योजनेच्या एकत्रिकारणातून 'शरद पवार ग्रामसमृद्धी योजना' सुरू होणार आहे. शरद पवारांच्या 80 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकाराची मोठी घोषणा करण्यात येणार आहे.
शरद पवारांच्या ग्रामविकासातील योगदानाची अनोखी दखल. उद्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.

जगप्रसिद्ध वेरूळ आणि अजिंठ्याची लेणी उद्या पासून उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांसाठी परवा लेणी उघडणार आहे. रोज 2 हजार पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे. सकाळच्या सत्रात 1 हजार आणि दुपारच्या सत्रात 1 हजार पर्यटकांना लेणी पाहता येणार आहे. या साठी ऑनलाईन नोंदणी पर्यटकांना करावी लागणार आहे. तिकीट काउंटरवर तिकीट मिळणार नाही.
नागपुरात एका तरुणीवर भर रस्त्यात चाकू हल्ला करण्यात आला आहे... या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहे... पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदनवन पोलिस स्टेशन अंर्तगत केडीके कॉलेज जवळ परिचारिका असलेल्या २५ वर्षीय तरुणीवर आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास हल्ला झाला... केडीके कॉलेज जवळ ती तरुणी आपल्या मैत्रिणीला भेटायला आली असता
विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी सोहळा, मुख्यमंत्री विधानभवनात दाखल
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित जेष्ठ पत्रकार बाळ बोठेचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज, अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर दुपारी दोन नंतर सुनावणी होणार आहे. या सूनावणीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
विधानपरिषदेच्या 5 नवनिर्वाचित आमदारांनी आज सदस्यपदाची शपथ घेतली, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना शपथ दिली, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडीचे मंत्री आणि आमदार उपस्थित होते, शपथ घेतलेल्यांमध्ये अरुण लाड, जयंत आसगावकर, सतीश चव्हाण, अभिजित वंजारी, किरण सरनाईक यांचा समावेश
लातुर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांची बदली व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बियाणे महामंडळ, अकोला येथे करण्यात आली आहे. पृथ्वीराज बी पी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी यांची बदली जिल्हाधिकारी लातूर येथे करण्यात आली आहे.

रिलायन्स इंडियाचे चेअरमन मुकेश अंबानीनी 'इंडिया मोबाईल कॉंग्रेस 2020' मध्ये बोलताना सांगितलं की 2021 साली रिलायन्स जिओकडून 5जी सुविधा सुरु करण्यात येत आहे. त्यांच्या या योजनेला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळण्यासाठी रिलायन्सकडून 5जी सुविधा असलेल्या रिलायन्स जिओ मोबाईलचेही लॉन्चिंग करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : केवळ बीड किंवा सांगलीच नाही तर आता बेस्टच्या सेवेकरता मुंबईत गेलेल्या कोकणातील एसटी कर्मचाऱ्यांचे देखील हाल होत असल्याची व्यथा एका कर्मचाऱ्यानं मांडली आहे. सध्या आमचे प्रचंड हाल होत असून आम्ही वडापाव खातोय आणि जगतोय. आमच्याकडे कुणाचंही लक्ष नसून आता आत्महत्या हाच पर्याय असल्याचं हा कर्मचारी सांगत आहे. आत्मदहन किंवा गेट वे ऑफ इंडियाजवळ पाण्यात उडी घेत जीवन संपवणं हाच शेवटचा पर्याय असल्याचं या व्हिडीओमध्ये हा कर्मचारी सांगत आहे. मी देवरूख एसटी आगाराचा कर्मचारी असल्याचं या व्हिडीओमध्ये हा कर्मचारी सांगत आहे. दरम्याम, सध्या व्हॉट्सअपवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात फिरतोय.
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा भर रस्त्यावर कोयत्याने केक कापल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी दोघांवर भोसरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. समीर बागसीराज अटकेत आहे, तर त्याचा मित्र आणि बर्थडे बॉय सोहेल शेखचा शोध सुरु आहे.
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करणार एक दिवसाचे उपोषण. उद्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर अण्णांनी हा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी गर्दी न करता अहिंसात्मक मार्गाने एक दिवसीय आंदोलन करून शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन अण्णांनी केले आहे. देशभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अण्णांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी तंत्रशिक्षण विभागाच्या MBA/MMS व B.Arch तर उच्च शिक्षण विभागाच्या BA/B.Sc.-B.Ed.(Integrated) व B.Ed.-M.Ed.(Integrated) अशा एकूण चार अभ्यासक्रमांचे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरूवात उद्या 8 डिसेंबरपासून होत आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी आनंदाची बातमी आहे. शहरातील कोरोना बाधित झालेले 525 पोलीस कोरोनामुक्त झालेत. पैकी तीन पोलिसांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालाय.
उद्याच्या 'भारत बंद'ला बँक कर्मचाऱ्यांचाही पाठिंबा. 4 लाख कर्मचारी बिल्ला परिधान करून ग्राहक आणि आम जनतेला संदेश देतील. देविदास तुळजापूरकर यांची माहिती.
शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यास पाठिंबा. परंतु, दुकाने बंद राहणार नाहीत : पुणे व्यापारी महासंघाचा निर्णय. शेतकरी आंदोलनास पाठिंबा म्हणून विविध राजकीय पक्षांनी उद्या भारत बंद पुकारला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांना पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले असल्याने दुकाने बंद ठेवणे शक्य नाही. दुकाने बंद न ठेवता मोर्चामध्ये सामील होण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
करमाळा तालुक्यातील चिखलठाण परिसरातील शेतात ऊस तोडणी सुरू असताना मजुरांच्या लहान मुलीवर बिबट्याने केला हल्ल्याचा प्रयत्न मात्र ग्रामस्थ काठ्या फिरवत ओरडत धावून आल्याने बिबट्या पळाला .. वन विभागाचे टीम व शार्प शूटर घटनास्थळाकडे रवाना
नवी मुंबई : 8 कोटींचा उद्यान घोटाळा प्रकरण, पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची मोठी कारवाई, महानगरपालिका उद्यान घोटाळा प्रकरणी 3 अधिकारी निलंबित
रायगड :

अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्रकिनारी झालेल्या बैलगाडी शर्यतीविरोधात गुन्हा दाखल..

गेल्या दोन दिवसांपूर्वी किहीम समुद्रकिनाऱ्यावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले..

छुप्या पद्धतीने घेण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीविरोधात गुन्हा दाखल..

अज्ञात बैलगाडीवाल्यांविरोधात मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ..

सामाजिक संघटनेने केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल..
बिबट्याच्या हल्ल्यात ऊस तोडणी मजुरांच्या 8 वर्षीय मुलीचा मृत्यू, करमाळ्यात तिसरा मृत्यू
दिल्लीतील आंदोलनामुळे कांदा प्रश्न सोडवण्यात अडचण, भाजप खासदार भारती पवार यांचा दावा,
दिल्लीत कृषी विधेयकाच्या प्रश्नावरून सुरू असणाऱ्या आंदोलनावर तोडगा काढण्यात कृषीमंत्री आणि वाणिज्य मंत्री व्यस्त,
त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठविण्या संदर्भात निर्णय घेता येत नाही,
पुढील 2-3 दिवसात केंद्राकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, पवार यांचं मत
कोविड लसीबाबत लवकरच खुशखबर मिळणार आहे. 22 ते 26 डिसेंबर दरम्यान कोविड लसीची घोषणा होण्याची शक्यता आहे. 25 डिसेंबरनंतर कोविड लस वापरासाठी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लस वाटपाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी लसीची घोषणा होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः यासंदर्भात घोषणा करु शकता, अशी माहिती.सूत्रांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनी सोमवारी शेतीमालाची तोड करू नये, मंगळवारी बाजार समितीत शेतीमाल आणू नये, देशव्यापी बंदमध्ये सहभागी व्हावे, नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती सभापतींचे आवाहन, केंद्र सरकारच्या विधेयका विरोधात बाजार समिती बंद , नाशिक बाजार समिती सभापती माजी खासदार देविदास पिंगळे यांनी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय केला जाहीर,
राज्यातील सर्वच बाजार समिती बंद ठेवण्याचं आवाहन
अवघे सहा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना परळीत उघडकीस आली. तिच्या पाठोपाठ पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. मात्र, माझ्या मुलीचा तिचा पती आणि इतरांनी हुंड्यासाठी छळ केल्यानेच तिने आत्महत्या केल्याची तक्रार वडिलांनी परळी ग्रामीण ठाण्यात दिली. त्यानंतर मयत पतीसह पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. प्रियंका सायस पंडित (रा. पांगरी ‌कॅम्प, ता. परळी) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. प्रियंकाचा विवाह जून महिन्यात सायस विलास पंडित याच्या समवेत झाला होता.
सातारा : कराड चिपळूण रोडवर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एक तरुणीने भरधाव वेगात गाडी चालवत वाहनांचे नुकसान केलं आहे. या परदेशी तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेची प्रक्रिया करुन तिला आज न्यायालयात हजार करणार आहे. या तरूणीने अंमली पदार्थाच सेवन केल्याची चर्चा आहे. तसेच पोलीस ठाण्यात फक्त अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
केज तालुक्यातील मस्सजोग येथील बहूचर्चित प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपी सुदर्शन देशमुख,संजीवन देशमुख, कृष्णकांत देशमुख, चंद्रशेखर देशमुख, महादेव देशमुख, कृष्णा जाधव, अतुल दसपुते यांनी शेतीच्या वादावरून वरील आरोपींनी फिर्यादी शीतल देशमुख हिच्यावरील आरोपी विरुद्ध तिला व तिचे सासू सासरे याना कुऱ्हाड कोयता आणि गजाने मारहाण करून विनयभंग केला म्हणून कैज पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला होता.यातील आरोपीना केज न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय.
उद्याच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मार्गावरील एसटीची वाहतूक बंद राहणार, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेण्याचे एसटीच्या सर्व आगारांना प्रशासनाचे निर्देश

पार्श्वभूमी

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


Corona Vaccine | भारतात 8 कोरोना लसींवर क्लिनिकल ट्रायल सुरु; कोणत्या टप्प्यांत पोहोचली लसींची चाचणी?


जगभरातील सर्वच लोक कोरोना व्हायरसवरील प्रभावी लसीकडे डोळे लावून बसले आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. अशातच सर्व देशांचं लक्षं भारताकडे लागलं आहे. भारतात पुढिल काही दिवसांतच कोरोना वॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली जाऊ शकते. भारतीय ड्रग्ज कंट्रोलरच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, कमीत कमी तीन वॅक्सिन आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यासाठी विचारात घेतल्या जात आहेत. पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट आणि हैदराबादची औषध कंपनी भारत बायोटेकनं याआधीच ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडे कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.


सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गेनाइजेशन (सीडीएससीओ) च्या एक तज्ज्ञ कमिटीच्या वतीने सीरम आणि भारत बायोटेकच्या वतीने करण्यात आलेल्या अर्जाचं विश्लेषण करण्यात आलं. त्यानंतर अतिरिक्त सुरक्षा आणि लस कितपत प्रभावी आहे, त्यासंदर्भात अधिकची माहिती संबंधित कंपन्यांकडे मागण्यात आली आहे. अमेरिकन औषध कंपनी फायझरनेही भारतात लसीच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालय सध्या सुरु असलेल्या लसींच्या चाचण्यांसाठी तिनही कंपन्यांना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली जाऊ शकते.


युपीए प्रमुख करणार ह्या बातमीत तथ्य नाही, शरद पवार यांची एबीपी माझाला माहिती


राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने विरोधक एकत्र येताना दिसत आहेत. विरोधी राष्ट्रीय पक्ष आणि इतर प्रादेशिक पक्ष एकत्र येणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याचं नेतृत्व करणार असल्याच्या बातम्या माध्यमांधून येत आहेत. मात्र, युपीए प्रमुख करणार ह्या बातमीत तथ्य नसल्याचे खुद्द शरद पवार यांनी एबीपी माझाकडे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या चर्चेवर आता पडदा पडला आहे.


केंद्र सरकारने तीन कृषी कायदे आणले आहेत. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी या कायद्याविरोधात दिल्लीच्या वेशीवर येऊन केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहे. असं असताना देशातील विरोधी पक्ष मात्र अजून एकत्र येत असल्याचे चित्र नाही. कालच विरोधी पक्षातील शरद पवार, राहुल गांधी, सीताराम येचुरी आणि डी.राजा यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. यात पंजाबमधील अकाली दलाचा समावेश मात्र नव्हता.


दुसरीकडे पंजाब मधील अकाली दल देशातील विविध प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अकाली दलातील नेत्यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. असं असलं तरी सर्व पक्ष अजूनही शेतकरी कायद्याविरोधात ही एकत्र येताना दिसत नाहीये.


नरभक्षक बिबट्याने करमाळ्याच्या सांगवी भागात केला हल्ल्याचा प्रयत्न, आमदार रोहित पवार यांनी दिली घटनास्थळी भेट


करमाळा तालुक्यात तीन जणांचे बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्याने आज दुपारी बाराच्या सुमारास नरसोबावाडी सांगवीजवळ भागात शेतात काम करणाऱ्या दिनकर पाटील यांच्या पत्नीवर झडप मारली. यावेळी त्यांनी बिबट्याची झडप चुकवली यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी दगडाचा भडीमार संबंधित नरभक्षक बिबट्या व केल्यानंतर तो बिबट्या तिथून पळून गेला.


पळून गेल्यानंतर तो बिबट्या रामचंद्र महादेव कदम यांच्या उसाच्या शेतात गेला दुपारी दीड वाजल्यानंतर ही बातमी वन विभाग अधिकाऱ्यांना कळाली. वन विभागाच्या 70-80 कर्मचाऱ्यांनी या या उसाच्या पाच एकराच्या फडाला घेराव घातला असून शार्प शूटर सायंकाळी सहाच्या पुढे उसाच्या फडात घुसले आहेत. रात्री 9 वाजेपर्यंत विभागाने प्रयत्‍न करून त्याला जेरबंद करण्याच नियोजन केले पण त्यांना यश आले नाही.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.