Coronavirus LIVE UPDATES | औरंगाबादमध्ये 50 लाखांचं बनावट सॅनिटायझर जप्त,अन्न-औषध प्रशासनाची मोठी कारवाई

देश-विदेशातील कोरोना व्हायरसचे सर्व अपडेट

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Mar 2020 10:11 PM
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या अन्न-औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 50 लाखांचं बनावट सॅनिटायझर जप्त, सॅनिटायझरची एक्सपायरी डेट आणि किंमत बदलून सुरू होता फसवणुकीचा प्रयत्न,वाळूज परिसरातील युरोलाईफ हेल्थ केअर कंपनीवर कारवाई
कोरोनामुळे अकलूजमधील प्रसिद्ध सुफी संत हजरत राजबागसवार यांचा उरूस रद्द
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील भाविकांच्या दृष्टीने श्रद्धेचा असलेला अकलूज येथील सुफी संत हजरत राजबागसवार दर्ग्यातील उरुस रद्द करण्यात आला आहे. अकलूज येथे असलेल्या या दर्ग्याच्या उरुसासाठी हजारो भाविक चार दिवस अकलूज येथे येत असतात. या दर्ग्यात 1760 च्याही पूर्वीपासून हा उरुस केला जातो. कोरोनाच्या भीतीमुळे प्रशासनाने सर्व जत्रा उरुस आणि यात्रा बंद करण्याचे आदेश दिल्याने सर्व हिंदू मुस्लीम भाविकांनी एकत्र येत यंदाचा उरूस रद्द करण्याचा निर्णय घेत, तसं पत्र प्रशासनाला दिलं आहे. या उरुसात प्रवचन देण्यासाठी हैदराबाद येथून अहमद नक्षबंदी साहेब हे जेष्ठ मुस्लिम संत येणार होते मात्र आता हा सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरवर्षी उरुसाच्या चार दिवसात चार ते पाच लाख भाविक येथे दर्शनाला येत असतात.
परभणीच्या मानवत शहरातील 3 कोरोना संशयित रुग्णालयात


परभणीच्या मानवत शहरातील काही जण गेल्या आठवड्यात सौदी अरेबिया येथील परिसरात गेले होते. 4 मार्च रोजी ते शहरात परत आल्यानंतर या नागरिकांची तपासणी होणे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे होते.मात्र तसे झाले नाही त्याच कुटुंबातील एका महिलेला सर्दी, खोकला असल्याने उपचारासाठी ही महिला आज दुपारी एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गेली असता या खाजगी डॉक्टरला संशय आल्याने त्यांनी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना व्हाट्सअप वर संदेश पाठवून या रुग्णांची माहिती दिली.  जिल्हाधिकारी मुगळीकर या मॅसेजची गंभीरपणे दाखल घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागरगोजे यांना त्यांच्या अधिनस्त असलेल्या  ग्रामीण रुग्णालय व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शंकर देशमुख यांच्या अधिनस्त असलेल्या तालुका आरोग्य अधिकारी या दोन्ही कार्यालयांना तात्काळ त्या रुग्णांची भेट घेऊन त्यांची प्रतिबंधात्मक तपासणी करण्यात यावी असे आदेश दिले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद लंगोटे यांच्या नेतृत्वात एका पथकाने सदर रुग्णांच्या घरी जाऊन  त्यांची तपासणी केली. या कुटुंबातील चार सदस्यांपैकी एक महिला आणि दोन पुरुष या तिघा जणांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.  त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात असलेल्या आयसोलेशन कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.
पुण्यात कोरोनाचे एकूण 16 रूग्ण
पुणे - आज एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 16 रुग्ण झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
पिंपरी- चिंचवड भागातील ही व्यक्ती जपानला जाऊन आली होती. त्या व्यक्तीची 14 मार्चला चाचणी करण्यात आली, तिचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. या एका रुग्णाची भर पडल्याने राज्यातला आकडा 33 वर पोहोचला आहे.
शिर्डी परिक्रमा आयोजकांवर गुन्हा दाखल, शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, परवानगी नसताना परिक्रमा फेरी काढल्याचं प्रकरण, भारतीय दंड संहिता 1860नुसार कलम 188, 177 नुसार गुन्हा दाखल, परिक्रमा महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांवर गुन्हे दाखल
कर्नाटकातील कलबुर्गी येथील वीस जणांना खबरदारीचा उपाय म्हणून सोलापूरला हलविले आहे. सोलापुरातील विलगीकरण केंद्रात निगराणी खाली ठेवण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
कलबुर्गी येथील कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या संपर्कात असलेल्या वीस जणांना सोलापुरातील आयसोलेशन केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.
मालेगाव महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना उद्यापासून 31 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली, महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून पत्रक जाहीर, मात्र थिएटर, मॉल अद्याप सूचना नसल्याने थिएटर मालक, चालक संभ्रमात
#Corona LIVE UPDATE | बीड : एबीपी माझाचं बनावट ग्राफिक्स करुन खोटी पोस्ट तयार करून कोरोना झाल्याची अफवा पसरवणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, बीड जिल्ह्यातल्या आष्टी शहरामध्ये कोरोनाचा रूग्ण आढळल्याची खोटी पोस्ट व्हायरल करणे पडले महागात
कोरोनामुळे अकलूजमधील प्रसिद्ध सुफी संत हजरत राजबागसवार यांचा उरूस रद्द
महाराष्ट्र , आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील भाविकांच्या दृष्टीने श्रद्धेचा असलेला अकलूज येथील सुफी संत हजरत राजबागसवार दर्ग्यातील उरूस रद्द करण्यात आला आहे. अकलूज येथे असलेल्या या दर्ग्याच्या उरुसासाठी हजारो भाविक चार दिवस अकलूज येथे येत असतात. या दर्ग्यात 1760 च्याही पूर्वीपासून हा उरूस केला जातो. कोरोनाच्या भीतीमुळे प्रशासनाने सर्व जत्रा उरुस आणि यात्रा बंद करण्याचे आदेश दिल्याने सर्व हिंदू-मुस्लीम भाविकांनी एकत्र येत यंदाचा उरुस रद्द करण्याचा निर्णय घेत, तसं पत्र प्रशासनाला दिलं आहे. या उरुसात प्रवचन देण्यासाठी हैदराबाद येथून अहमद नक्षबंदी साहेब हे जेष्ठ मुस्लीम संत येणार होते. मात्र आता हा सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी उरुसाच्या चार दिवसात चार ते पाच लाख भाविक येथे दर्शनाला येत असतात.



कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 19 मार्च ते 31 मार्चपर्यंत सर्व सिनेमा, टीव्ही शो, अॅड शो, वेब शोजचं शूटिंग बंद करण्याचा निर्णय, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोशिएशनच्या बैठकीत निर्णय
अहमदनगर : आदर्श गाव हिवरेबाजार येथे बाहेरून येणाऱ्यांना बंदी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवरेबाजारला येणाऱ्या अभ्यासक आणि पर्यटकांना गावात येण्यास मज्जाव, ग्रामसभेत घेतला निर्णय, कोरोनाचं संकट कमी झाल्यावर ग्रामसभा घेऊन गावातील पुन्हा प्रवेश खुला होणार
अहमदनगर : आदर्श गाव हिवरेबाजार येथे बाहेरून येणाऱ्यांना बंदी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवरेबाजारला येणाऱ्या अभ्यासक आणि पर्यटकांना गावात येण्यास मज्जाव, ग्रामसभेत घेतला निर्णय, कोरोनाचं संकट कमी झाल्यावर ग्रामसभा घेऊन गावातील पुन्हा प्रवेश खुला होणार
पनवेल महानगरपालिकेतर्फे परदेशातून आलेल्या लोकांसाठी एक सेंटर तयार करण्यात आले आहे. खारघर येथील ग्रामविकास भवन येथे सेंटर तयार करण्यात आले आहे. दुबई येथून रात्री आलेल्या 9 लोकांना या सेंटर मध्ये ठेवण्यात आलेले आहे. आज आणि उद्या येणाऱ्या परदेशातील लोकांना याच सेंटरमध्ये 14 दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 32 वर, त्यातील 9 जण कस्तुरबा गांधी रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल, एकूण 80 संशयित रुग्ण कस्तुरबामध्ये दाखल, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
Coronavirus Live Updates : राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढला, औरंगाबादमधील 59 वर्षिय महिलेला कोरोनाची लागण, पीटीआयचं वृत्त, राज्यातील आकडा 32 वर
LIVE UPDATE : मुंबईकरांचा नियमित दिनक्रम सुरु, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची मरिन ड्राईव्हवर गर्दी
जोतिबा मंदिराच्या शेवटच्या खेट्यावर कोरोनाचा परिणाम झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरीतील जोतिबाचे दर्शन मध्यरात्रीपासून बंद करण्यात आले आहे. कोरोनाचा पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
इराणमधल्या 234 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विमान मध्यरात्री परतलं, तर इटलीतले भारतीय नागरिकही भारताच्या दिशेने, सर्वांना 14 दिवस देखरेखीखाली ठेवणार

पार्श्वभूमी

 




    1. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात, रुग्णांचा आकडा तब्बल ३१ वर, नागपूर, यवतमाळ, रायगड, पिंपरीमध्ये नवे रुग्ण आढळल्यानं खळबळ



 




    1. ग्रामपंचायत क्षेत्र सोडून राज्यातल्या सर्व शाळा आणि कॉलेज 31 मार्चपर्यंत बंद, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय, खासगी क्लासेस आणि मॉल्सही बंद ठेवण्याचे आदेश



 




    1. शक्य असल्यास लग्न आणि समारंभ पुढे ढकला, पुणे विभागीय आयुक्तांचं आवाहन, पुढील आदेशापर्यंत शासकीय, धार्मिक, व्यावसायिक कार्यक्रम रद्द करण्याचे सरकारचे निर्देश



 




    1. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टात विनाकारण गर्दी करू नका, प्रभारी मुख्य न्यायमूर्तींचे आदेश



 




    1. इराणमधल्या 234 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विमान मध्यरात्री परतलं, तर इटलीतले भारतीय नागरिकही भारताच्या दिशेने, सर्वांना 14 दिवस देखरेखीखाली ठेवणार





 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.