LIVE UPDATES | यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या

'नितीन, भारत माता की जय म्हणणारे..' आईच्या सलामीने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी, शहीद नितीन भालेराव अनंतात विलीन बंदुकीचा धाक दाखवत जळगाव कारागृहातून पलायन, चार महिन्यांनी आरोपी जेरबंद मध्य प्रदेशच्या आमदाराचं जेवणाचं निमंत्रण विद्या बालनने नाकारलं; 'शेरनी'च्या टीमला गेटवरच अडवलं आटपाडीत जनावरांच्या बाजारात आला तब्बल दीड कोटींचा मोदी बकरा! दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Nov 2020 11:18 PM
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील जतेगाव येथील घाटात त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करून रेखा जरे यांची हत्या करण्यात आली.रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. रेखा जरे या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील जतेगाव येथील घाटात त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करून रेखा जरे यांची हत्या करण्यात आली.रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. रेखा जरे या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या.
नाशिकच्या वडाळागाव मधील मेहबूब नगर परिसरात आग
- प्लस्टिक, भंगाराच्या गोडावून ला लागली आग
-आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
- 5 ते 6 आगीचे बंब घटनास्थळी दाखल
- परिसरात दाट लोकवस्ती असल्यानं आग आटोक्यात आणण्यात अडचण
राज्यातील आघाडी सरकारला बैलाची उपमा देवून स्वतःची कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्याच केंद्रातील सरकारच्या कारभारा बाबत कदाचित अनभिद्न्य आहेत, केंद्रातले सरकार हे शेतकऱ्यांना अतिरेक्यांची उपमा देत आहेत , शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला नेस्तनाबूत करणाऱ्या रानडुकरासारखे हे केंद्र सरकार काम करत आहे आणि गडकरी हे त्यांच्या सोबत आहेत , बैल किमान शेतकऱ्यांचा मित्र तरी असतो , आघाडी सरकार बैलासारखे असले तरी शेतकऱ्यांचे मित्र आहेत मात्र आपण रानडुकराची भूमिका बजावणाऱ्या सरकारचा भाग आहात तेव्हा आधी आपले पहा असा टोला लगावत शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यानी गडकरी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची शीतल आमटे यांच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे. मुनगंटीवार म्हणाले, "शीतल आमटे यांच्या मृत्यूची बातमी अतिशय धक्कादायक आणि वेदनादायक आहे. ज्या आनंदवनाने अंध-अपंगांचे दुःख हलके केले तिथे ही घटना होणे मनाला वेदना देणारी आहे. आमटे परिवारावर हा मोठा आघात आहे, ईश्वर त्यांना हा आघात सहन करण्याची शक्ती प्रदान करो."
मुंबई-पवई परिसरातील म्हाडा इमारतीत भीषण आग
सर्व देशवासियांना देव दिवाळीच्या शुभेच्छा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
गंगा आरतीसाठी पंतप्रधान मोदी राजघाटावर
गंगा आरतीसाठी पंतप्रधान मोदी राजघाटावर
राणेंच्या बकवासगिरीला उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही अशा शब्दात विनायक राऊत यांनी राणेंवर टीका केलीय. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केलीय. महाराष्ट्राचा रथ विकासाकडे घेऊन जाणारा ड्रायव्हर मुख्यमंत्री आम्हाला चालेल. पण नारायण राणे सारखा डराव डराव करणारा बेडूक आम्हाला नको अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केली. नारायण राणे म्हणजे नेमकं रसायन काय हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे राणेंच्या बकवासगिरीला उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही.
चंद्रपुर : जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या CEO डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या... आनंदवन येथील राहत्या घरी विष घेवून केली आत्महत्या, काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावरील महारोगी सेवा समितीच्या लोकांवर केलेल्या आरोपांमुळे उडाली होती खळबळ, डॉ.विकास, प्रकाश, मंदा आणि भारती यांनी पत्र काढून त्यांचे आरोप फेटाळले होते.
चंद्रपूर : शीतल आमटे यांचे पार्थिव चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी दाखल
उर्मिला मातोंडकर लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्या दुपारी उर्मिला मातोंडकर यांची पत्रकार परिषद होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संत श्री गुरु नानक यांना जयंतीनिमित्त अभिवादन, जन्मोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा,

'शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरू संत श्री गुरु नानक यांची आज जयंती.'ईश्वर एकच आहे आणि तो चराचरात आहे' असा संदेश त्यांनी दिला. प्रत्येकाशी सन्मानाने आणि प्रेमपूर्वक आदराने वागण्याची त्यांची शिकवण आजच्या काळात खूप महत्त्वाची आहे. संत श्री गुरु नानक यांना जयंतीनिमित्त त्रिवार प्रणाम आणि त्यांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा', असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा येथे रात्री 2 वाजता धावती ट्रॅव्हल्स पेटली, 52 प्रवाशांचा जीव वाचला, तिवसा पोलीस ठाण्या समोरील घटना,
दोन तास चालले मदतकार्य. तीन अग्निशमन दलाच्या वाहनाने आग आटोक्यात.. ट्रॅव्हल जळून खाक; दोन तासानंतर वाहतूक पूर्ववत.
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा येथे रात्री 2 वाजता धावती ट्रॅव्हल्स पेटली, 52 प्रवाशांचा जीव वाचला, तिवसा पोलीस ठाण्या समोरील घटना,
दोन तास चालले मदतकार्य. तीन अग्निशमन दलाच्या वाहनाने आग आटोक्यात.. ट्रॅव्हल जळून खाक; दोन तासानंतर वाहतूक पूर्ववत.
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील सहाययक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यावर फलटण येथे गोळीबार, दरोड्याचा तपासासाठी गेले असता झाला गोळीबार, फलटण तालुक्यातील वडले गावात झाला गोळीबार, गोळीबारात कोणीही जखमी नाही, फलटण पोलीस अधिक तपास करीत आहेत
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापूरच्या नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा झाला. भाविकांनी लावलेल्या हजारो दिव्यांनी हा कृष्णाकाठ उजळून निघाला आहे. कोरोना संकटात मंदिरे खुली झाल्यानंतरचा हा पहिलाच सोहळा असल्याने भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती. पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी दत्तगुरुंचे दर्शन घेत केलेल्या जल्लोषाने कृष्णाकाठ दणाणून गेला.
पुण्यात नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात सुमारे आठ गाड्यांची धडक. तर अपघातात एका मोठ्या कंटेनरने पेट घेतला होता. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. मृत व जखमी किती याची माहिती पोलीस घेत आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल.
शहीद नितिन भालेराव अनंतात विलीन, लहान भाऊ सुयोग भालेरावने दिला मुखाग्नी
शहीद नितिन भालेराव यांचे पार्थिव थोड्याच वेळात नाशिक शहरात राजीवनगर परिसरातील त्यांच्या घरी दाखल होणार
भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. पोलिसांना विधानसभेत उलटं टांगू, अशी धमकी ऑडिओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकरांनी दिली आहे.
नागपूर -

नागपूर पोलिसांच्या पथकाने काल मध्यरात्री दोन लाऊंज आणि रेस्टॉरन्ट्समध्ये धाड टाकून दोन्ही लाऊंजचे व्यवस्थापक यांच्यासह एकूण 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सिव्हिल लाईन्स परिसरातील पाब्लो लाऊंज एन्ड रेस्टॉरन्ट्स तसेच लक्ष्मीभवन चौक परिसरातील बॅरल लाऊंज अॅन्ड रेस्टोरेन्ट वर धाड टाकली.

दोन्ही ठिकाणी वेळ संपल्यानंतर ही ग्राहकांना सर्व्हिस दिली जात होती, कोरोना संदर्भातल्या नियमांचा सर्रास उल्लंघन करत गर्दी करण्यात आली होती. मास्क लावण्यासंदर्भातले नियम पायदळी तुडविले जात होते.

विशेष म्हणजे पाब्लो लाऊंज एन्ड रेस्टोरेन्ट तर गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे..
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुण्यात राज्यस्तरीय निर्णायक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा आरक्षणावर स्थगिती असल्याने महाराष्ट्र सरकार कश्याप्रकारे मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि नोकरी किंवा इतर बाबतीत न्याय देऊ शकेल या बाबत वकील , तज्ञ , मराठा आरक्षण अभ्यासक यांनी तयार केलेले मुद्दे या बैठकीत मांडले जाणार आहेत. तसेच यापुढील आंदोलनाची दिशाही निश्चित केली जाणार आहे, या बैठकीत छत्रपती संभाजीराजे हे 12 वाजता दिल्ली येथून लाईव्ह व्हिडीओ च्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. राज्यभरातले मराठा समाजातील पदाधिकारी या बैठकीत सहभागी झाले आहेत.
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले नितिन भालेराव यांचं मुळ गाव निफाड तालुक्यातील देवपूर हे असून सध्या नाशिक शहराच्या राजीव नगर परिसरातील श्रीजी सृष्टी अपार्टमेंट मध्ये आपल्या कुटुंबासमवेत ते राहत होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, आई आणि एक मुलगी असा परिवार आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या पार्श्वभूमीवर मराठा सातारा जिल्ह्यातील काही मराठा समाजाच्या संघटनेचे कार्यकर्ते उदयनराजे भोसले यांना भेटण्यासाठी जलमंदिर परिसरामध्ये जमू लागले आहेत. पत्रकार परिषदेच्या पूर्वी उदयनराजे भोसले हे या कार्यकर्त्यांसोबत चर्चा विनिमय करणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजेत अशी ठोस भूमिका या कार्यकर्त्यांची आहे.
नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव हे छत्तीसगढमध्ये शहीद, त्यांचे पार्थिव रायपूर वरून विमानाने मुंबई येथे आणले जाईल व तिथून ते नाशिक येथे आणले जाईल. त्यानंतर त्यांचे नातेवाईक निश्चित करतील त्या वेळेनुसार त्यांचा अंत्यविधी सरकारी इतमामाने केला जाईल, अशी माहिती नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
एबीपी माझाने अवैध वाळू उपशाविरोधात सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून मागच्या वर्षभरापासून परभणी जिल्ह्यातील रखडलेले वाळू लिलाव सुरु करण्याला शासनाने परवानगी दिलीय. 22 वाळू घाटांचे लिलाव करण्याची परवानगी शासनाने दिली असून येत्या 15 डिसेंबर पर्यंत ही प्रक्रिया पार पडणार आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता कमी दरात वाळू मिळणार आहे...

परभणी जिल्ह्यातील गोदावरी,दुधना,पुर्णा आदी नद्यांवरील 54 पेक्षा जास्त वाळू घाटांचे लिलाव मागच्या वर्षभरापासून रखडले होते. त्यामुळे वाळु माफियांकडून अवैध वाळू उपसा वाढला होता. परिणामी नागरिकांना बांधकाम करण्यासाठी वाळू ही 10000 रुपये प्रति ब्रासने तेही अवैध मार्गाने घ्यावी लागत होती. याच अवैध वाळू उपशाविरोधात एबीपी माझाने मोहीम हाती घेऊन या मागचं अर्थगणित समोर आणल्यानंतर शासनाने त्याची दखल घेत अनेक जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव करण्याला परवानगी दिलीय. त्यामुळे आता शासनाचा बुडणारा महसुल आता अडचणीच्या काळात शासनाला मिळणार आहे आणि सामान्य नागरिक,बांधकाम व्यवसायिकांना कमी दरात वाळू मिळणार आहे.

परभणी जिल्ह्यातील गाळेगाव,पेनूर,धनगर टाकळी,कळगाव,धानोरा मोत्या,मुंबर,पिंपळगाव सारंगी,पिंप्री झोला,महातपुरी,भांबरवाडी,आनंदवाडी,लोहिग्राम,पोहडुळ,जोडपारळी, नांदगाव खुर्द,पिंपळगाव टोंग,वांगी,मोरेगाव,काजळी रोहिना,वझुर,दुटका,धनेवाडी या वाळु घाटांचे लिलाव होणार आहेत.
पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानीवरी जवळ कारला अपघात झाला असून प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. आस्था चॅनलच्या आदर्श तिवारी यांच्या कारला अपघात झाला आहे. हरिद्वारहून मुंबईकडे जाताना अपघत झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
चंद्रपूर : 90 वर्षीय वृद्धेवर युवकाचा अतिप्रसंग, चिमूर तालुक्यातील घटना, घटनेतील 34 वर्षीय आरोपी युवक अटकेत, वृद्धेच्या पतीने पोलीस ठाणे गाठून केली तक्रार, भिसी पोलीस करत आहे प्रकरणाचा अधिक तपास
आष्टी तालुक्यामध्ये मागील चार दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून दोघांनी बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले आहेत. आज रात्री पुन्हा बिबट्याने दिंडे वस्तीवरील मायलेकरावर हल्ला केल्याची घटना घडलीय.
एमएचटी-सीईटी 2020 परिक्षेचा निकाल आत्ता रात्री 11 वाजता जाहिर करण्यात आला आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रामांच्या प्रवेशांसाठी एमएचटी-सीईटी ही सामायिक प्रवेश परिक्षा यावर्षी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. एमएचटी-सीईटी परिक्षेत पीसीएम आणि पीसीबी पर्सेंटाईल गटात पुण्याच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. पीसीएम पर्सेंटाईल गटात पुणे जिल्ह्यातील सानिका गुमास्ते ही राज्यातून प्रथम आली आहे तर पीसीबी पर्सेंटाईल गटात पुण्याचा अनिश जगदाळे राज्यातून प्रथम आला आहे. सर्व परिक्षार्थींना त्यांच्या लॉगइनमधून निकाल बघता येणार आहे.
दिवंगत आमदार भारत भालके यांचे पार्थिव पंढरपूर शहराच्या प्रदक्षिणा मार्गावरून फिरून मंगळवेढ्याकडे गेले . मंगळवेढा शहरातून फिरवून त्यांच्या सरकोली या गावी अंत्यसंस्कारासाठी ठेवणार
28 लाखाच्या रोकडसह एसबीआय बँकेचं एटीएम चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना जालन्यात घडली आहे. जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचं नागेवाडी शाखेलगत एटीएम आहे. आज पहाटे दोनच्या सुमारास चोरट्यांनी पांढऱ्या रंगाच्या स्काॅर्पिओ गाडीत एटीएम पळवून नेलं. या ATM चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर वाढदिवसाचा फोम स्प्रे मारतानाचे दृश्यही यात कैद झालं आहे. सलग दोन दिवस बँकेला सुट्टी असल्याने मोठी रक्कम या एटीएममध्ये ठेवण्यात आली होती. या एटीएममध्ये रोख 28 लाख 67 हजार 600 रुपये चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन चंदनझिरा पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड कारखाण्याचा गाळप परवाना रद्द करण्यात आल्याने गुट्टेंनी रास्ता रोको आंदोलन केले आहे.गंगाखेड मधील परळी नाक्यावर रस्त्यावर ऊस टाकत वारकऱ्यांना सोबत घेऊन गुट्टे हे रस्त्यावर उतरले आहेत.गुट्टेंच्या या आंदोलनामुळे परभणी-गंगाखेड,परळी-गंगाखेड या दोन्ही महामार्गवरील वाहतूक ठप्प झालीय. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.आंदोलनस्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलाय
औरंगाबाद शहरामध्ये आता लग्नासाठी कुटुंबियांना महानगरपालिकेची आणि पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार.कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावानंतर निर्णय.परवानगी नातररच लग्न करता येणार. 50 पेक्षा अधिक लोक लग्नात असू नयेत.एसी हॉल वापरता येणार नाही.मंगल कार्यालयाचे दरवाजे खिडक्या उघड्या ठेवाव्या लागणार.
महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांचे आदेश.
शहीद जवान यश देशमुखचे पार्थिव चाळीसगावातील पिंपळगाव या त्याच्या गावी पोहोचले
शहीद जवान यश देशमुखच्या अंत्यविधिला जळगाव, चाळीसगावसह गावागावाहून अंदाजे 5 हजाराहून अधिक नागरिक दाखल..
प्रवीण दरेकर यांच्या 'ही कसली वचनपूर्ती' या ठाकरे सरकारच्या कारकीर्दीवरच्या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
नागपूर पोलिसांच्या प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने मेट्रो व्हिसन बिल्डकॉन इंडिया लिमिटेड कंपनीच्या रियल ट्रेड योजनेच्या घोटाळ्यात 68 लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे...

सोनू श्रीखंडे नावाच्या आरोपीच्या सौंसर ( मध्यप्रदेश ) येथील घरात आरोपीच्या शोधात पोलीस गेले असता सोनू च्या कुटुंबियांनी स्वतःहून आपल्या बँक खात्यातून 68 लाख रुपये पोलिसांच्या स्वाधीन केले..

सोनू श्रीखंडे याने कुटुंबियांना तो नागपूरात एका मल्टी नेशनल कंपनीमध्ये काम करतो, तिथून मिळालेली ही रक्कम आहे, असे सांगून कुटुंबियांच्या बँक खात्यात ठेवली होती...

पोलिसांनी रक्कम जप्त केली असून सोनू श्रीखंडे चा शोध घेत आहे..

या प्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपी विजय गुरनुले सह 11 आरोपी अटकेत असून 1 कोटी 72 लाखांची रक्कम जप्त झाली आहे...

रियल ट्रेड घोटाळयात 25 हजार पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची 100 कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाली आहे...
'मुंबई शिवसेनेची, शिवसेनेची मुंबई', शिवसेनेकडून मुंबईत होर्डिंग, महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीवर शिवसेनेचा भाजपला इशारा, शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी सरकारचं अभिनंदन करणारे होर्डिंग लावले, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकावर झेंडा फडकवण्याचा निर्धार केला आहे. भाजपनं मुंबईत पालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु केलीय अशात शिवसेनेकडून होर्डिंग लावून भाजपला इशारा देण्यात आलाय
औरंगाबाद - पैठण तालुक्यातील जुने कावसन येथे तीन जणांची हत्या. पैठण- जुने कावसन भागातील घटना. अज्ञातांनी केले चार जनावर तीक्ष्ण हत्याराने वार. राजू उर्फ संभाजी निवारे त्यांची पत्नी अश्विनी संभाजी निवारे , मुलगी सायली संभाजी निवारे यांचा मृत्यू तर मुलगा सोहम हा जखमी आहे. रात्रीची घटना, पैठण पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल
आज परत ईडी सरनाईकांच्या घरी

,प्रताप सरनाईक यांच्या घरी आज पुन्हा ईडीचा छापा

,जवळपास ८ तास ईडीनं केली सरनाईक यांच्या कार्यालयाची तपासणी

,८ तास तपासणी अखेर हाती काहीच लागलं नाही

,दोन दिवसांपूर्वीच ईडीनं सरनाईकांच्या कार्यालयावर टाकली होती रेड

,विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी घेतलं होतं ताब्यात

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावरती पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत . भारत भालके यांना कोरोना झाल्यानंतर आधी पंढरपूर मध्ये त्यांच्यावरती उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती खालावत गेल्याने दोन आठवड्यांपूर्वी त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचारांसाठी भरती करण्यात आलं. रूबी हॉल क्लिनिक मध्ये त्यांना निमोनिया झाल्याचं निदान झालं. गेल्या काही दिवसांपासून भारत भालके हे व्हेंटीलेटर सपोर्टवर आहेत.
ठाकरे सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विरोधी पक्ष भाजप राज्यभरात पत्रकार परिषदांचा सपाटा लावून सरकारच्या अपयशाची पोलखोल करणार. उद्यापासून पुढचे तीन दिवस प्रत्येक जिल्ह्यात होणार पत्रकार परिषदा. उद्या दुपारी 11 वाजता मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेने करणार सुरुवात. त्यानंतर प्रमुख नेत्यांपैकी उद्या नागपुरात 3 वाजता सुधीर मुनगंटीवार, 5 वाजता नितेश राणे परभणीत, 29 नोव्हेंबरला 1 वाजता चंद्रकांत पाटील पुण्यात, 3 वाजता रावसाहेब दानवे औरंगाबादेत, 4 वाजता केशव उपाध्याय कोल्हापुरात. तर 30 नोव्हेंबरला प्रवीण दरेकर नांदेडला वाचून दाखवणार ठाकरे सरकारच्या कारकिर्दीचा पाढा. तसेच महाविकास आघाडी सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी जिल्ह्या जिल्ह्यातील प्रमुख नेते घेणार पत्रकार परिषदा.
शंभर देशांचे राजदूत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार होते. परंतु, त्यांचा दौरा अचानक रद्द झाला आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरती लस तयार केली जात आहे. लस निर्मितीच्या प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी हे राजदूत 27 नोव्हेंबरला सीरम इनस्टीट्युटला भेट देणार होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शनिवारी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं ठरल्याने शंभर देशांच्या राजदूतांचा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. बदललेल्या दौर्यानुसार हे राजदूत 4 डिसेंबरला सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार होते. परंतु, आता या राजदुतांचा दौरा रद्दच झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
विदेशी चलन प्रकरणात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ED कडून चौकशी. अविनाश भोसले ईडीच्या कार्यालयात असून त्यांची अजूनही चौकशी सुरू आहे. विदेशी चलन प्रकरणात अविनाश भोसले यांची चौकशी सुरू असल्याची ईडीच्या अधिकाऱ्याची माहिती. सकाळी दहा वाजता अविनाश भोसले ईडी झोन 2 कार्यालयात दाखल झालेले आहेत. आठ तासांहून अधिक अविनाश भोसले चौकशी सुरू आहे.
प्रताप सरनाईक यांच्या घरी आज पुन्हा ईडीचा छापा. जवळपास 8 तास ईडीनं सरनाईक यांच्या कार्यालयाची तपासणी केली. 8 तास तपासणी अखेर हाती काहीच लागलं नाही. दोन दिवसांपूर्वीच ईडीनं सरनाईकांच्या कार्यालयावर रेड टाकली होती. विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.
ही मुख्यमंत्र्यांची मुलाखत नसून भाजपला धमकवण्यासाठी दिलेली मुलाखत आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सामनातील मुलाखतीवर दिली.
कंगना रनौतच्या कार्यालय तोडफोडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला झटका, महापालिकेद्वारे पाठवलेली नोटीसही हायकोर्टाकडून रद्द, कंगनाला कार्यालयाचा ताबा घेण्यास परवानगी
बुलढाणा : कापड गुनवत्तीसाठी आयएसआयचा दर्जा लागू नसताना, शालेय शिक्षण विभागाने 13 नोव्हेंबरच्या एका परिपत्रकानुसार, विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आयएसआय स्टँडर्डच कापड खरेदी करण्याचे निर्देश दिल्याने शिक्षकांसह शाळा व्यवस्थापन समित्या संभ्रमात पडल्या आहेत. बाजारात असे कापड कुठे मिळते अशी विचारणा आता शिक्षाकांकडून केल्या जात आहे. आयएसआय दर्जाचं कापड उपलब्ध न झाल्यास लेखा परिक्षणाच्या वेळी मुख्याध्यापकांना अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे आयएसआय मानांकनाच कापड कोणत्या मिलच, कोणत्या ब्रँडच आणि कोणत्या दुकानात उपलब्ध होते, याबाबत शासनाच्या संबंधित यंत्रनेने माहिती द्यावी अशी मागणी आता शिक्षाकांकडून होत आहे.
मुंबई : बोरिवली आरटीओ बनावट स्टॅम्प प्रकरणात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. आरटीओ अधिकाऱ्यांचे सही शिक्का वापरुन गाड्या पास करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरटीओ अधिकाऱ्यांची बनावट सही आणि शिक्का असलेली कागदपत्रं समोर आली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. सरफराज चौहान नावाच्या व्यक्तीने हा काळाधंदा केला होता. आरोपी हा नालासोपारा येथील रहिवासी असून तो आरटीओ एजंट आहे, अटक झालेल्या आरोपींचे किती साथीदार आहेत आणि यापूर्वी त्यांनी अशा घटना घडल्या आहेत की नाही याबाबत एमएचबी पोलीस तपास करत आहेत. आरोपी सरफराज सलीम चौहान याच्याविरूद्ध सीआर क्रमांक 769/2020 आयपीसी कलम 465, 467, 468, 471,472, 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : काल दिवसभरात साताऱ्यात 226 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर आज 4 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 50 हजार 755 वर पोहोचला आहे. तर एकूण 1703 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 48,078 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेमधील पहिला सामना आज सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने मागील ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला वनडे सीरिजमध्ये 2-1ने पराभूत केलं होतं. दरम्यान, त्यावेळी खेळण्यासाठी बंदी घातल्यामुळे स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर भारताविरुद्ध खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात सहभागी नव्हते. हे दोन्ही खेळाडू परत आल्यामुळे यजमान संघाचं पारडं जड झालं आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कोरोनामुळे आलेली महामारी, निसर्ग चक्रीवादळ, मराठा आरक्षणाला स्थगिती, अनलॉकच्या प्रक्रियेत विविध सुरु करण्यासाठी झालेली आंदोलनं, वाढीव वीज बिल आंदोलन अशा विविध आव्हानांना ठाकरे सरकारला तोंड द्यावं लागलं. उद्या या सरकारची वर्षपूर्ती होत आहे. या निमित्ताने ठाकरे सरकारचा एक वर्षातील कार्याचा आढावा आणि महाराष्ट्राच्या भवितव्याविषयीचं सरकार आणि दिग्गज नेतेमंडळींचं व्हिजन जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सरकारमधील मंत्र्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांचं महाराष्ट्रासाठी व्हिजन काय हे आज दिवसभरात जाणून घ्यायचं आहे.

पार्श्वभूमी

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


'नितीन, भारत माता की जय म्हणणारे..' आईच्या सलामीने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी, शहीद नितीन भालेराव अनंतात विलीन


शहीद नितीन भालेराव अनंतात विलीन झाले आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात शनिवारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात भालेराव यांना वीरमरण आले होते. डोळ्यात पाणी आणि नितीनला सलामी देत 'नितीन भारत माता की जय म्हणणारे' अशी हाक नितीन यांच्या आईने देताच प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले होते. नितीन यांची चिमुकली वेदांगी हिने देखील आपल्या वडिलांना सलामी देताच स्मशानभूमीत यावेळी एकच शांतता पसरली होती. लहान भाऊ सुयोग भालेरावने शहीद नितिन भालेराव यांना मुखाग्नी दिला.


आज दुपारी रायपूरहून त्यांचे पार्थिव ओझर विमानतळावर आणण्यात आले होते. त्यांनतर नाशिक शहरातील राजीवनगर परिसरातील त्यांच्या राहत्या घरी पार्थिव आणण्यात आले होते. भालेराव यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय लोटला होता. राजीवनगरपासून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होऊन साईनगर चौफुली, द्वारका मार्गे अमरधामला पार्थिव नेण्यात आले. राज्य राखीव दलाच्या जवानांकडून त्यांना सलामी देण्यात आली. पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी, राज्य राखीव दलाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस आयुक्तांसह ईतर शासकीय अधिकारी आणि भालेराव कुटुंबाकडून नितीन यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.


बंदुकीचा धाक दाखवत जळगाव कारागृहातून पलायन, चार महिन्यांनी आरोपी जेरबंद


जळगाव कारागृहात असताना बंदुकीचा धाक दाखवत पलायन केलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. महत्त्वाचं म्हणजे संबंधित आरोपी हा बडतर्फ पोलीस कर्मचारी आहे. सुशील मगरे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. पोलीस दलात असताना दरोड्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं आढळल्याने त्याला बडतर्फ करुन जळगावच्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं.


25 जुलै 2020 रोजी सकाळी सुशील मगरेने कारागृहातील अन्य तीन कैद्यांच्या मदतीने कारागृहाच्या गेटवर असलेल्या सुरक्षारक्षकाला बंदुकीचा धाक दाखवत, साथीदारांसह पलायन केलं होत. या घटनेनंतर त्याच्यासोबत असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं. मात्र बडतर्फ पोलीस कर्मचारी असलेला आणि दरोड्यात सहभागी असलेल्या सुशील मगरे मोकाट असल्याने पोलीस खात्यावर मोठी टीका झाली होती. त्यातच मुळात गुन्हेगारी जगताशी हातमिळवणी केलेल्या सुशील मगरेकडून अजून गंभीर गुन्हे होण्याची शक्यता पाहता त्याला पकडणं आवश्यक होतं.


मध्य प्रदेशच्या आमदाराचं जेवणाचं निमंत्रण विद्या बालनने नाकारलं; 'शेरनी'च्या टीमला गेटवरच अडवलं


सध्या विद्या बालनची मुख्य भूमिका असलेल्या शेरनी चित्रपटाचं चित्रिकरण मध्यप्रदेशच्या गोंदिया भागात चालू आहे. तिथे बालाघाट टायगर फॉरेस्टमध्ये विद्यासह सिनेमाची टीम चित्रिकरणासाठी गेली होती. त्यावेळी मध्यप्रदेशचे आमदार विजय शाह यांनी विद्या बालनला रात्रीच्या जेवणासाठी निमंत्रित केलं. पण विद्याने त्याला नकार दिल्यानंतर घडलेला हा प्रकार समोर आला आहे. शेरनीचं तिथलं शूट संपल्यानंतर ते युनिट परतल्यानंतर हा घडला प्रकार समोर आला आहे. संबंधित आमदार मात्र या घडल्या घटनेला नकार देत आहेत.


घडलं असं की, विद्या बालन काही दिवसांपासून शेरनी या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. या चित्रपटातला काही भाग बालाघाटच्या व्याघ्र प्रकल्पात शूट होणार होता. त्यासाठी चित्रपटाच्या टीमने सर्व परवानग्या काढल्या. 30 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर असं याचं शूट ठरलं. त्यानुसार विद्या चित्रिकरणासाठी बालाघाटमध्ये आली. त्यानंतर 8 आणि 9 नोव्हेंबरला आमदार विजय शाह यांनी विद्यला भेटण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानुसार 8 तारखेला सकाळी 11 ते 12 या वेळेत ही भेट ठरली. परंतु, हे आमदार महोदय विद्याला भेटण्यासाठी आले ते संध्याकाळी पाच वाजता. तिथे भेट झाल्यावर शाह यांनी विद्याला रात्री जेवणासाठी निमंत्रित केलं. पण विद्याला त्याचवेळी महाराष्ट्रातल्या गोंदिया येथे परतायचं होतं. त्यामुळे तिने हे निमंत्रण स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा या चित्रपटाचं युनिट चित्रिकरणासाठी बालाघाटमध्ये गेलं तेव्हा त्यांना गेटवरच आडवण्यात आलं. सर्व परवानग्या असूनही या सिनेमाच्या टीमला आत जाण्यापासून मज्जाव करण्यात आला. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. विद्याच्या युनिटला तिथल्या डीएपओच्या टीमने थांबवलं होतं. पण बड्या अधिकाऱ्यांनी फोनाफोनी करून सूचना केल्यानंतर डीएफओने या टीमला आत सोडण्यास सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या मुख्य सचिवांना यासाठी फोनफोनी करावी लागली.


आटपाडीत जनावरांच्या बाजारात आला तब्बल दीड कोटींचा मोदी बकरा!


मागील अनेक महिन्यापासून कोरोनामुळे अनेक व्यवहार ठप्प होते. तसे जनावराचे बाजार देखील बंद होते. मात्र आता हळूहळू बाजार सर्वत्र भरत आहेत. सांगलीच्या आटपाडीतील जनावरांचा बाजार देखील प्रसिद्ध आहे. याच आटपाडीमधील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजाराला यंदा मोठा प्रतिसाद मिळालेला दिसून येतोय. या बाजारात मेंढ्या, जनावरांबरोबरच तब्बल दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा विक्रीसाठी आला होता. हा बकरा या बाजारातील उत्सुकतेचा विषय ठरला होता. बाजारात या बकऱ्याला 70 लाखाची मागणी आली.


महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आटपाडी कार्तिक पौर्णिमेची यात्रा प्रसिद्ध आहे. आटपाडीत पशुपालक, मेंढपाळ मोठ्या संख्येने येत असतात. चालू वर्षी मात्र कोरोनामुळे यात्रा रद्द झाली. त्याऐवजी फक्त जनावरांचा बाजार रविवारी आणि सोमवारी भरविण्यात येत आहे. रविवारी मोठ्या उत्साहात हौशी मेंढपाळ, पशुपालक यांनी आपल्या जनावरांसह हजेरी लावली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.